Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5823

भारताच्या विकासासाठी गरिबांमध्ये गुंतवणूक आवश्यकच

थर्ड अँगल | जायन जोस थॉमस 

औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात Leicester framework ने इंग्रज कामगारांमधील गरिबीला सूचित केले होते. त्याने १८१७ मध्ये एक ठराव केला होता, “…जर देशभरात सर्वसाधारणपणे मेकॅनिकला उदार वेतन दिले गेले असते, तर आपले गृहोपयोग उत्पादन तात्काळ दुप्पट झाले असते आणि निरंतर सर्व हातांना पूर्ण रोजगार मिळाला असता” (E.P.Thompson’s The Making of the English Working Class, 1963 मध्ये उद्धृत). आजच्या भारतातील एक चल दृश्य म्हणजे covid -१९ च्या उद्रेकानंतरच्या काळात स्थलांतरित कामगारांना अचानक त्यांच्या कामाच्या ठिकाणी उजाड वाटू लागले आणि ते जीवावर उदार होऊन त्यांच्या गावी परत जाऊ पाहत आहेत. छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या कामगारांच्या असहायतेमधून जाणवते की आपण मूलगामी पुनर्विचार केला पाहिजे. आपण समर्थ आर्थिक वाढीसाठी योजना करणे आवश्यक आहे, स्थिरतेसाठी नाही. वेतन आणि  विकासाचे मॉडेल केवळ शहरांपुरते न राहता सर्वत्र पसरले पाहिजे.  

गरिबांच्या हातातील पैसा उत्पादनक्षमता वाढवायला मदत करेल.

अपूर्ण माहिती – भारताच्या एकूण ४७१.५ दशलक्ष (जवळपास ४८ कोटी) कर्मचाऱ्यांपैकी १२.३% कर्मचारी हे नियमित आहेत. ज्यांना एखाद्या प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळते आहे. उरलेले प्रासंगिक कामगार अथवा छोटे उत्पादक आहेत जे असंघटित क्षेत्रात विविध अंशात जगत आहेत (२०१८ ची आकडेवारी). प्रचंड मोठया संख्येने स्थलांतरित कामगार हे असंघटित प्रासंगिक प्रकारात मोडतात. भारतातील स्थलांतरित कामगारांच्या संख्येचा उपलब्ध डाटा अपूर्ण आहे. २०११च्या जनगणनेनुसार, देशातील ५४.३ दशलक्ष लोक (कामगार तसेच कामगार नसलेले) एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालेले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्यप्रदेश सारख्या प्रमुख राज्यांतील मिळून ४८.९% लोक हे आंतरराज्यीय स्थलांतरित आहेत. संपूर्ण भारताची लोकसंख्या पाहिल्यास हे प्रमाण  खूपच जास्त (३६.८%) आहे.  

कामगार गावांमधून शहरी केंद्रांकडे स्थलांतरित होतात कारण, ग्रामीण भागात उत्पन्नाचा वेग कायम राहत नाही. तरुणांची वाढती संख्या आणि त्यांच्या महत्वकांक्षा तिथे पूर्ण होत नाहीत. यु.पी., बिहार, राजस्थान, मध्यप्रदेशमधील जे लोक शेती आणि त्याच्याशी संबंधित कामांमध्ये व्यस्त होते त्यांचे प्रमाण २०१८ साली ४९.१% इतके घसरले आहे. जे २००५ साली ६४.१% होते. याचा अर्थ असा आहे की, २००५ ते २०१८ मध्ये या चार राज्यांतील १९.३ दशलक्ष लोकांनी शेती सोडली आणि ते इतरत्र नोकरीच्या संधीच्या शोधात गेले. जर ग्रामीण भागात नवीन आर्थिक संधी निर्माण झाल्या नाहीत तर कामगार शेती व्यवसाय सोडून बाहेर पडतील आणि त्यांच्या गावाबाहेरील वस्ती वाढविण्याच्या 
गतीत वाढ होईल. बहुसंख्य कामगार जे गाव सोडून शहरात येतात ते स्वतःला शहरी अर्थव्यवस्थेचा अगदी शेवटचा भाग समजतात. त्यांची कमाई खूप अनिश्चित असते आणि ते ड्राइव्हर, कारखाना कामगार, सुरक्षा रक्षक, घरगुती मदतनीस अशी कामे करतात. त्यांचा उदरनिर्वाह हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या भारत आणि परदेशातील जे तुलनेने मागणीची पूर्तता करतात अशा संपन्न आर्थिक क्रियाकल्पांशी जोडलेला असतो. (जसे की जे माहिती तंत्रज्ञान उद्योगात अत्याधुनिक उत्पादने तयार करतात). 

कामगारवर्ग हाच देशाचा कणा आहे.

मागणीच्या पायाचे रुंदीकरण – जरी बऱ्याचदा त्यांनी खूप शोषणात्मक वातावरणात, खूप वेळ काम केले तरी हे असंघटित कामगार त्यांच्या वेतनाचे व्यवस्थापन करतात आणि त्याचा खूप कमी वापर करतात. अधिकृत वापर आणि खर्चाच्या सर्वेक्षणानुसार (२०११-१२) शहरी भारतातील टिकावू वस्तूंच्या (जसे की फर्निचर आणि रेफ्रिजरेटर) एकूण वापरापैकी सर्वात श्रीमंत ५% लोक ६४.४ % खर्च करतात आणि ५०% गरीब लोक केवळ १३.४% खर्च करतात. covid -१९ च्या साथीने सध्याच्या सुविधा असणाऱ्या काही लोकांच्या मागणीच्या रचनेमध्ये प्रदीर्घ काळ व्यत्यय आणला आहे. आर्थिक क्रिया या काही आठवड्यापासून थांबल्या आहेत. त्याला कोणतीच सीमा नाही आहे, ज्यामुळे निर्यातीची मागणी कमी होत आहे. याची सुरुवात यु.एस आणि चीनच्या व्यापारी तणावापासून झाली. भारतातील आणि इतरत्रही संचारबंदी  उठल्यानंतरही व्यवसायांना चिंता आहे.  कारण त्यांना कमी झालेल्या मागणीच्या परिस्थितीत त्यांच्या स्थापित क्षमतांच्या कमी क्षमतेत काम करावे लागेल. केवळ मागणी स्त्रोतांचे रुंदीकरण करूनच या आर्थिक संकटावर मात करता येईल. गरीब लोकांसाठी गुंतवणूक आणि त्यांचा वापरामध्ये वाढ केल्यास हे होऊ शकेल. उदाहरणार्थ, अन्न प्रक्रिया किंवा परवडणारी गृहयोजना यांच्याशी निगडित उद्योगांची ग्रामीण भागात स्थापना करणे. अशा गुंतवणुकीचा प्रभाव खूप अधिक असेल.

अन्न प्रक्रिया शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करेल. अन्न खराब होण्याचे प्रमाण कमी होईल, गावभागात रोजगार वाढेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गरजू लोकांना पौष्टिक अन्न उपलब्ध होईल. मागणीचा पाया विस्तृत करण्यासाठी पारंपरिक आर्थिक संकल्पनेपासून मूलभूतरित्या भिन्न अशा धोरणांची आवश्यकता आहे. मुख्य प्रवाहातील युक्तिवाद हा कंपन्यांनी वेतन खर्च पिळून किंमती कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा आहे. पण वेतन कमी केल्यास बाजारपेठा संकुचित होऊन या नैराश्याच्या काळात संकट आणखी खोल होईल. त्याऐवजी कंपन्यांनी कामगारांचे वेतन आणि उत्पन्न वाढविण्यास मदत केली पाहिजे. त्याद्वारे बाजारपेठा आकुंचित केल्या पाहिजेत. अगदी जास्त वेतनासह नफ्याचा दर कमी होणार नाही. कारण जास्त मागणीमुळे कंपन्या त्यांच्या क्षमतांचा चांगला उपयोग करू शकतील. 

सरकारी खर्च वाढवा – मागणीच्या पुनरुज्जीवनासाठी, पायाभूत सुविधा आणि नावीन्यासाठी सरकारने अर्थव्यवस्थेवरील खर्च वाढविणे चिंताजनक आहे. सरकारी खर्चामुळे खाजगी गुंवणूकदारांच्यातील “पाशवी प्रवृत्ती” वाढेल, असे जॉन मेनार्ड केन्स याने १९३० च्या नैराश्याच्या काळात सूचित केले होते. केन्स आणि त्याच्या अनुयायांच्या या कल्पनेमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात १९४५ च्या दुसऱ्या महायुद्धनंतर ३ दशके अभूतपूर्व आर्थिक भरभराट होण्यास मदत झाली.

“भांडवलशाहीच्या सुवर्णयुगाचे”उल्लेखनीय वैशिष्ट्य  म्हणजे वास्तविक वेतन वाढतच राहिले. ज्या लोकांना युद्ध आणि नैराश्याच्या वर्षांमध्ये सहन करावे लागले होते अशा गरजू कामगारवर्गाला यामुळे जगणे सुकर झाले. अत्याचारी आर्थिक प्रणालीच्या त्रासामुळे आणि आता अंदाज न येणाऱ्या विषाणूमुळे भारताचा कामगार वर्ग हा दीर्घ दिलासा आणि आरामास पात्र आहे. सरकारी खर्चात विस्तारित वाढ होण्याची गरज आहे. ज्यामुळे कामगारांची कौशल्ये वाढतील तसेच त्यांच्या उत्पन्न आणि खरेदी शक्तीही वाढतील. यामध्ये आरोग्यक्षेत्रातील गुंतवणूक, शिक्षण, रस्ते, ग्रामीण पायाभूत सुविधा, शेतीविषयक संशोधन, सार्वजनिक वाहतूक इत्यादीचा समावेश असेल. कदाचित दुसऱ्या महायुद्धनंतर पाश्चिमात्य देशांनी पुनर्निर्माणासाठी जे प्रयत्न केले आहेत अगदी त्याप्रमाणेच. भविष्यातील वृद्ध लोकांच्या संख्येची रचना हे एक गंभीर आव्हान, भविष्यातील विकास अडवण्याचा प्रयत्न जगातील बहुतेक भागामध्ये करणार आहे. यासंदर्भात भारतातील विशेषतः उत्तर आणि पूर्व राज्यातील तरुणांची वाढती संख्या पुढची काही दशके अर्थव्यवस्था टिकवून ठेवू शकतील अशा संभाव्य मागणीचा नवीन स्त्रोत देऊ करेल. वेतनवाढ आणि थकलेल्या भारतीय कामगारांचा जोश वाढविणे हा भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्था आनंदित करण्याची केवळ एक लस असू शकते. 

जायन जोस थॉमस हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथे शिकवतात. ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. अधिक प्रतिक्रियांसाठी – 9146041816.

वाघांनो असं रडताय काय? पंकजा मुंडेंचं नाराज कार्यकर्त्यांना ‘हे’ आवाहन

बीड प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची उमेदवारी डावलून नवीन चेहर्‍यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली. यानंतर मुंडे यांच्या कार्यकर्त्यांत नाराजी पसरली. दिवसभर पंकजा मुंडे यांना अनेकांनी फोन केले मातंर मुंडे यांनी कोणाचेही फोन उचलले नाहीत. आता मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक ट्विट केले आहे. त्यात वाघांनो असं रडताय काय? असं म्हणत मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उत्तर दिलंय.

आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय? असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला आहे. मी आहे ना, ‘तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत असं म्हणत मुंडे यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, दिवसभर फोन उचलले नाही. कुणाकुणाला उत्तर देऊ? असं म्हणत भाजप पक्षाने माझी उमेदवारी डावलून नव्या चेहर्‍यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचा निर्णयाने मला धक्का अजिबात बसलेला नाही असं स्पष्ट केले आहे. तसेच भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद! असं म्हणत मुंडे यांनी अखेर आपला अबोला सोडला आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कौतुकास्पद! ८०० किमी पसरलेल्या २०० बेटांवरील ६९८ भारतीयांना घेऊन INS जलाश्वा मालदीवहून भारताकडे

वृत्तसंस्था । मालदीव येथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी घेऊन येण्यासाठी आयएनएस जलाश्वा काळ मालदीवला रवाना झाली होती. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आता आयएनएस जलाश्वा आज माले, मालदीव येथून ६९८ भारतीय नागरिकांना घेऊन परत येण्यासाठी निघाली आहे. मालदीवहून परत आणण्यात आलेल्या ६९८ भारतीय नागरिकांमध्ये १९ गरोदर महिलांचा समावेश आहे. तसेच या जहाजात ५९५ पुरुष आणि १०३ महिला आहेत. अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.

मालदीव येथे वास्तव्यास असणाऱ्या एकूण २७,००० भारतीयांनी परत प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यातील अंदाजे ४५०० भारतीयांना नौदलाकडून परत आणण्यात येणार आहे. मालदीव येथील सदर भारतीय समुदाय सुमारे ८०० कि.मी. मध्ये पसरलेल्या २०० पेक्षा जास्त बेटांवर विस्तारलेला आहे. माले, मालदीव येथे लॉकडाऊन असताना भारतीय नौदलाला सर्व भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, आयएनएस जलाश्वा आणि आयएनएस मगर यांनी एकूण १८००-२००० भारतीयांना मालदीवमधून बाहेर काढले आहे. एकूण ४ यात्रा केल्या जाणार असल्याचे समजत आहे. यातील 2 कोची आणि 2 टूटीकोरिन असे या यात्रांचे ठिकाण राहणार आहे. वैद्यकीय सेवक, ज्येष्ठ नागरिक, कौटुंबिक आपत्कालीन परिस्थिती आणि बेरोजगार अशा नागरिकांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्यात आज दिवसभरात १ हजार ८९ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णांची संख्या १९ हजार ६३ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ६३ झाली आहे. आज १०८९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १६९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३४७० रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख १२ हजार ३५० नमुन्यांपैकी १ लाख ९२ हजार १९७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह तर १९ हजार ६३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ३९ हजार ५३१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ७३१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील १०, जळगाव जिल्ह्यात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १९ पुरुष तर १८ महिला आहेत. आज झालेल्या ३७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहेत. ३७ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १२,१४२ (४६२)
ठाणे: १०१ (२)
ठणे मनपा: ७२४ (८)
नवी मुंबई मनपा: ७१६ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २८४ (३)
उल्हासनगर मनपा: १५
भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा भाईंदर मनपा: १९२ (२)
पालघर: ४६ (२)
वसई विरार मनपा: १९४ (९)
रायगड: ८१ (१)
पनवेल मनपा: १३२ (२)
ठाणे मंडळ एकूण: १४,६४८ (४९७)

नाशिक: ४७
नाशिक मनपा: ६०
मालेगाव मनपा: ४५० (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ८२ (१२)
जळगाव मनपा: १४ (२)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण: ७५७ (३२)

पुणे: ११० (४)
पुणे मनपा: १९३८ (१३२)
पिंपरी चिंचवड मनपा: १२९ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: १७९ (१०)
सातारा: ९४ (२)
पुणे मंडळ एकूण: २४५६ (१५१)

कोल्हापूर: १० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
सिंधुदुर्ग: ५
रत्नागिरी: १७ (१
कोल्हापूर मंडळ एकूण: ७३ (३)

औरंगाबाद: ५
औरंगाबाद मनपा: ४१८ (१२)
जालना: १२
हिंगोली: ५८
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ४९५ (१३)

लातूर: २५ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २९ (२)
लातूर मंडळ एकूण: ६१ (३)

अकोला: ९ (१)
अकोला मनपा: ११२ (९)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ७६ (१०)
यवतमाळ: ९५
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ३२१ (२२)

नागपूर: २
नागपूर मनपा: २१० (२
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: २१८ (२)

इतर राज्ये: ३४ (८)
एकूण: १९ हजार ६३ (७३१)

(टीप – आय सी एम आर पोर्टलवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक ७ मे २०२० रोजी दाखविण्यात आलेल्या १४६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आय सी एम आर टेस्ट आय डी १४४५०१८ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांची आकडेवारी डेटा क्लिनिंगनुसार आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ११३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १३ हजार ५५२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५२.६४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

औरंगाबादच्या रेल्वे अपघाताच्या ‘त्या’ घटनेने व्यथित झालो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर अपघातात मरण पावलेल्या मजुरांमुळे व्यथित झालो असल्याचे सांगितले.
ते म्हणाले कि, ”आज आपल्याशी बोलताना मी काहीसा व्यथित आहे. औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर जो अपघात झाला त्यामुळे मी मनातून दुःखी झालो आहे. जे मजूर इतर राज्यातले घरी जायला निघाले आहेत आपण त्यांना आजही सांगतो आहे की राज्य सरकार तुमच्यासोबत आहे असा विश्वास त्यांनी राज्यातील परप्रांतीय कामगारांना दिला.

ते पुढे म्हणाले कि, ”इतर राज्यातल्या सुमारे ६ लाख मजुरांची सोय आपण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केली आहेत. इतर राज्यातही ट्रेन सुरु करुन केंद्र सरकार, आपलं राज्य आणि ज्या राज्यात त्या मजुरांना जायचं तिथल्या सरकारसोबत बोलणी करुन मजुरांना पाठवण्यात येतं आहे. या सगळ्यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला त्रस्त होण्याचं कारण नाही. तुम्ही थोडासा संयम बाळगा आम्ही तुमच्यासोबत आहोत” असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. घरी जाण्यासाठी मजुरांनी गर्दी करु नये, संयम राखावा अन्यथा सर्व ठप्प होईल. अस्वस्थ होऊ नका असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी मजूर कामगारांना केले.

अफवेला बळी पडू नका. मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार अशी एक अफवा पसरली आहे. लष्कर कशाला पाहिजे? आत्तापर्यंत जे काही केलं ते तुम्हाला सांगून करणार आणि तसंच करणार आहे. त्यामुळे मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार नाही. महाराष्ट्रातले सगळे नागरिक हे सैनिकांसारखेच आहेत. कोरोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे हे विसरु नका” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोनाचं संकट गंभीर पण सरकार खंबीर आहे हे विसरु नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करत राज्यातील जनतेला कोरोनाच्या संकटात राज्य सरकार काय करत आहेत याची माहिती देत राज्यातील जनतेला आश्वस्त केले.

अफवांबाबत खुलासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या बाबतीत पसरत असलेल्या अफवांबाबत खुलासा केला. ते म्हणाले कि, ”मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार अशी एक अफवा पसरली आहे. लष्कर कशाला पाहिजे? आत्तापर्यंत जे काही केलं ते तुम्हाला सांगून करणार आणि तसंच करणार आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातले सगळे नागरिक हे सैनिकांसारखेच आहेत. कोरोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे हे विसरु नका” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या संकटात सर्वपक्षिय बैठकत एकजुटीचं दर्शन
मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल एक सर्वपक्षिय बैठक बोलावली होती. याबाबत ते म्हणाले कि, ”काल एक चांगली गोष्ट झाली, महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठक झाली. सगळ्यांना काय करतो आहोत त्याची कल्पना दिली गेली. त्यांच्याकडून सूचना घेण्यात आल्या. मला एका गोष्टीबद्दल समाधान आहे की सगळ्यांनी खूप चांगल्या सूचना दिल्या. काल जी बैठक झाली ते एकजुटीचं वेगळं दर्शन होतं. महाराष्ट्रातले सगळे नेते राजकारण बाजूला ठेवून एकवटले. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी दुणावला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एक वेगळी एकजूट काल पाहायला मिळाली.” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यानी केला औरंगाबादच्या घटनेचा उल्लेख..
”आज आपल्याशी बोलताना मी काहीसा व्यथित आहे. औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर जो अपघात झाला त्यामुळे मी मनातून दुःखी झालो आहे. जे मजूर इतर राज्यातले घरी जायला निघाले आहेत आपण त्यांना आजही सांगतो आहे की राज्य सरकार तुमच्यासोबत आहे. इतर राज्यातल्या सुमारे सहा लाख मजुरांची सोय आपण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केली आहेत. इतर राज्यातही ट्रेन सुरु करुन केंद्र सरकार, आपलं राज्य आणि ज्या राज्यात त्या मजुरांना जायचं तिथल्या सरकारसोबत बोलणी करुन मजुरांना पाठवण्यात येतं आहे. या सगळ्यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला त्रस्त होण्याचं कारण नाही. तुम्ही थोडासा संयम बाळगा आम्ही तुमच्यासोबत आहोत” असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोनाच्या संकटकाळात वडी गावच्या महिला सांभाळत आहेत कायदा सुव्यवस्था, घेत आहेत आरोग्याची काळजी

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

महिलांनी मनात आणले तर त्या गाव कारभार अत्यंत शिस्तीने कशा पध्दतीने करू शकतात याचे ताजे उदाहरण कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन चालू असलेल्या लॉक डाऊन मध्ये पाथरी तालूक्यातील वडी गावात पहायला मिळत आहे. गावाचा कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस पाटील, कोतवाल, ही पदे मागील अनेक वर्षापासून रिक्त असल्याने ही जबाबदारी गावच्या महिला सरपंच चंदाताई कुटे यांच्यावर आली असुन सध्या महिलांची टिम गावांमध्ये कायदा सुव्यवस्था व आरोग्याची जनजागृती करून गावांमध्ये वेगळ्या पद्धतीने आपल्या कामाचा ठसा निर्माण करत गाव दक्ष करण्याचं काम या महिलांनी केले आहे. यातून अँन्टी कोरोना वॉरीअर्स म्हणून त्या काम करत असल्याच ही दिसून येत आहे. पाथरी तालूक्यातील उपक्रमशील गाव म्हणुन वडी गाव प्रसिद्ध आहे. या गावचे गावकरी प्रत्येक सार्वजनिक प्रश्न एकोप्याने गावात सोडवण्याचा प्रयत्न करतात. मग तो निसर्गनिर्मित दुष्काळावर मात करण्यासाठी का असेना, निसर्ग जोपासना, पाणी अडवणे, गाव स्वच्छता असो कि शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सर्वच बाबतीत हे गाव अग्रेसर आहे.

सध्या कोरोणा संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देशभर लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आपलं गाव सुरक्षित राहावं इथला गावकरी सुरक्षित राहावा म्हणून सर्व गावकरी नियमांचे पालन करत आहेत. यामध्ये गावातील महिलांनी पुढाकार घेतला असून त्या दक्ष राहत, आरोग्यसंदर्भातील या संकटकाळी गावाची काळजी घेत आहेत. याचाच भाग म्हणुन गावात नवीन आलेल्या नातेवाईकांची चौकशी करून गावात त्यांना प्रवेश दिला जात आहे. जिल्हा बाहेरील आलेल्या व्यक्ती ना गावातील सर्वना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यामूळे गावात कोणी येत नाही व गावातील नागरीक देखील गावा बाहेर जात नाही. ऊस तोड कामगार व मजूर गावात आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. याबाबत गावात जनजागृती करून ‘व्हिलेज टास्क फोर्सची ‘ भूमिका तेवढ्याच पोटतिडकीनं त्या गावांमध्ये मांडत आहेत.

त्यामुळे गावातील सार्वजनिक ठिकाणी गावातील नागरिक देखील बसत नाही, माझ गांव माझं योगदान उपक्रमाचे युवक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे देखील गावामध्ये येऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे दिलेल्या सूचनांचे नागरिक तेवढ्याच तत्परतेने अंमलबजावणी करत आहेत. जे नागरिक होम क्वारंटाइन करण्यात आलेली आहेत त्या नागरिकांना जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी या सर्व महिलांनी गावात मदत फेरी काढत, जमा झालेल्या धान्यातून होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांना जेवणाची व्यवस्था गावातील शाळेत केली आहे.या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था तसेच लाईट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आलेले आहे त्या नागरिकांनीदेखील १४ दिवस त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आलेले नाहीत व गावातील इतर नागरिक देखील त्यांच्या संपर्कात येऊ दिलेले नाही. गावाच्या प्रवेशाच्या दारावर चौकशी नाका उभारला असून येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची सखोल चौकशी केल्यानंतरच गावात प्रवेश दिला जात आहे. गावात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चांगल्या पद्धतीने गाव हाताळण्याचे काम गावच्या सरपंच चंदाताई कुटे यांच्या नेतृत्वाखाली गावांमध्ये होतांना दिसत आहे. त्यांना या कामामध्ये त्याचे पती तथा साद ग्रामचे अध्यक्ष शिवाजी कुटे हे मदत करत असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.

अश्विनी भिडेंची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई ।  मुंबईत करोनाने थैमान घातले असताना प्रशासनात कोणताही गोंधळ असू नये म्हणून राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या जागी नगरविकास विभागाचे विद्यमान प्रधान सचिव इक्बाल चहल यांची बदली झाली असताना आणखी एक नियुक्ती पालिका प्रशासन स्तरावर राज्यशासनाने केली आहे. मेट्रो ३ च्या माजी व्यवस्थापकिय संचालक अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं आहे. जयश्री बोस यांच्या जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मेट्रो ३ च्या व्यवस्थापकिय संचालक पदावरुन जानेवारी महिन्यात त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोना विषाणू व्यवस्थपानाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांना मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमण्यात आलं आहे. आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात मतभेद झाले होते. आज मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांचीही बदली झाली. त्याचपाठोपाठ संजीव जैस्वाल आणि अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोना योद्धे | घाबरुन, सुट्टी काढून गावालाच यायचं होतं तर भरती कशाला झालो असतो..? आता कोरोनाला हरवूनच गावाकडं यायचं..!!

लढा कोरोनाशी | विकी पिसाळ

पोलीस भरती होताना शपथ घेतलीय, मग आता कोरोनाला घाबरून, सुट्टी काढून गावाला कसं जायचं? घाबरुन गावालाच यायचं होतं तर भरती कशाला झालो असतो..?? आता लढायचं, कोरोनाला हरवायचं..!

किरण पिसाळ

पीएसआय किरण पिसाळ (घाटकोपर, मुंबई) यांचा काही दिवसांपूर्वीचा हा फोनवरील संवाद. फोनवरील त्यांचा हा संवाद ऐकुन मी क्षणभर स्तब्ध झालो होतो. त्यांची काळजी वाटते म्हणुन खरंतर दोन दिवसाआड माझे फोन त्यांना चालु आहेत. कसा आहेस.. काळजी घेतोयस ना..शासनाने दिलेल्या गोळ्या रेग्युलर घेतोयस ना..वगैरे प्रश्न माझे रोजचे. खरंतर काळजी घेतोयस ना हे वाक्य आता गुळमुळीत झालय. पण त्याच वाक्याचा आधार आहे मनाला.

कोरोना दिवसेंदिवस बळकट होत चालला आहे. आणि भावाला काळजी घे म्हणतानाही मन भरुन येतच. सुरुवातीला मुंबईत कांदिवली येथे बहिणीकडे थांबुन तुटपुंज्या पगारावर रिलायन्स या कंपनीत असताना तिथले काम पाहत, अभ्यास करत नंतर कित्येक भरत्या ट्राय करुन, कित्येकदा नाऊमेद होऊन चौदा वर्षापुर्वी मुंबई पोलिसमधे अफाट कष्ट करुन भरती झालेला किरण अखेर कॉन्स्टेबल झाला. पण फक्त कॉन्स्टेबल या पोस्टवरच तो समाधानी नव्हता. ते त्याने सुरुवातीलाच उघड बोलुन दाखवलं होतं. कॉन्स्टेबल या पदावर मुंबईत तो भरती होऊन त्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास चालुच ठेवलेला. वडील रेल्वेत कामाला. एकुण पाच बहीण भावंडं. लहानपणीची शाळा नायलॉनची, अगर कापडी पिशवीचे दप्तर बनवुन केली. पुढे सुरुवातीला चालत आणि नंतर सायकलवरुन रोजचं आठ किलोमीटर येवुन जाऊन कॉलेज कंप्लिट करणारा किरण. नावाप्रमाणेच त्याच्यासह कुटुंबात ही आशेचा किरण बनुन राहिलाय. हवं तर तो वडिलांच्या नंतर रेल्वेत जाऊ शकला असता..पण त्याने तो मार्ग सोडुन स्वत:च्या हिमतीचा मार्ग पत्करुन सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातुन सुरु झालेला त्यांचा कष्टप्रद प्रवास, भायखळ्यानंतर आज घाटकोपर येथे पीएसआय या पदापर्यंत येऊन पोहोचलाय.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात त्याच्याशी संपर्कात असताना त्यांनी कोरोनाची गंभीरता फोनवरुन सांगितली होती. मी म्हटलंही..मग आता सुट्ट्यांच काय रे तुझ्या? तो म्हणला.

लोक टेन्शनमध्ये आहेत. रोज पाहतोय. कोरोना लवकर आवरेल याची शक्यता कमीच, पोलिसांवरही भरपुर ताण वाढतोय, कित्येक पोलिस कोरोनाग्रस्त होतायत, अन मी या अशा काळात गावाला येऊन करु काय..याचा अर्थ सरळ होतो की मी कोरोनाला घाबरतोय. मग भरती का झालो इतका अभ्यास करुन..ते यासाठी? बरं आणि आलोच गावी. तर ती सल आयुष्यभर राहील. जी मला कधीच दुरुस्त करता येणार नाही. जे होईल ते होईल. माझ्यावर माझा पुर्ण विश्वासय. म्हणुन मी इथुन मुंबईतुन कुठेही हलणार नाही. मोठी जबाबदारी आहे माझ्याकडे. आता कोरोना संपेस्तोवर साप्ताहिक सुट्टीही घेणार नाही. अन गावी येण्याचा तर प्रश्नच नाही.

किरण पिसाळ

त्याचे हे उत्तर ऐकुन मी काळजीत पडलो. पण त्याचे उत्तर त्याच्या स्वभावाला साजेसे होते आणि त्याच्याबद्दल असलेला आजवरचा आदर त्याच्या या उत्तराने अजुन द्विगुणित झाला. सामान्य जनता कोरोनामुळे टेन्शनमध्ये आहे. कित्येक व्यावसायिक, नोकरदार, मंदिर मस्जिद,चर्च.., दळणवळण, व्यवहार..सगळच जागच्या जागी थांबलय. पण पोलिस मात्र आज या प्रसंगाला बेधडकपणे तोंड देत आहेत. कोरोना नव्हता, तेव्हाही त्यांना प्रचंड कामे होती. अन कोरोनामध्येही त्यांना प्रचंड ताण बाळगावा लागतोय. पण या अशा प्रसंगात ही खचुन न जाता, मानसिक स्वास्थ्य ढळु न देता उलट, मी भरती का झालो ते यासाठीच का? हा प्रतिप्रश्न विचारुन निरुत्तर करणारे पीएसआय किरण पिसाळ यांच्यासारखे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी समोरच्याच्या मनात एक नवा आशेचा किरण निर्माण करतायत हीच आपल्या सर्वांसाठी एक सकारात्मक गोष्ट आहे.

इतकी शांत मुंबई आजतागायत पाहिली नव्हती रे. पण जेव्हा गाडीतुन फिरतो तेव्हा ही शांत झालेली मुंबई पाहतो, रस्ते पाहतो, गल्लीबोळ पाहतो, समुद्र पाहतो तेव्हा वाटतं.. लवकरच हे सगळं पूर्ववत होईल आणि ही मुंबई पहिल्यासारखी गर्दीत हरवुन जाईल. किरण पिसाळ यांचा गावाइतकाच मुंबईवर फार जीव. ज्या मुंबईने आपल्याला सांभाळलं. आज तिच्यासाठी मागे हटायचं नाही. चल.. ठेवतो फोन.. राऊंड ला जायचय आता. एवढं बोलुन त्यांनी फोन ठेवला नी मी क्षणभर स्क्रिनवर त्याच्या नंबरकडे पाहत उभा होतो.

मित्रांनो आज अनेक पोलिस बांधवांची कुटुंबे गावाला आहेत. तर काहींची त्यांच्यासोबत आहेत. जेव्हा कोरोनाचा पेशंट यांच्या डोळ्यासमोर असतो तेव्हा पोलिस प्रशासनाची अवस्था काय होत असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. अनेक पोलिसांचे, पोलिस अधिकार्यांची कुटुंब ही गावाला असल्याने कित्येक पोलिसांना रात्री घरी आल्यावर जेवण नसते. किरण पिसाळही याला अपवाद नाहीत. येताना एखादे केळ..त्याला ही सॅनिटायजरचा हात लावुन, स्वच्छ करुन खाणे, एखादे सफरचंद रात्री.. कधी दुधाचे एक पॅकेट..इतक्यावरच किरण पिसाळ यांच्यासह कित्येक पोलिसांची रात्र या कोरोनामधे व्यतित करावी लागतेय. तर कधीकधी रात्री काहीच न खाताही झोपुन सकाळी पुन्हा ड्युटीवर पोहचावे लागत आहे. गावाकडे असलेल्या यांच्या कुटुंबियांनाही घशाखाली घास उतरत नाही. हे दिसतं तितकं सोप नाहीये मित्रांनो. त्यातुन कर्तव्याची जाण ठेवत, तुमची आमची काळजी घेत पोलिस प्रशासन आज कोरोना सारख्या महाभयंकर पसरलेल्या आजारात ही काम करतय. म्हणुनच आज पीएसआय किरण पिसाळ यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष व नेहमी सकारात्मक असणाऱ्या अधिकाऱ्यांना एक कडक सॅल्युट करावासा वाटतोय..

किरण पिसाळ यांच्यासारख्या अनेक अधिकाऱ्यांचे आणि पोलीस दलाचे आपण मनोबल वाढवुयात. त्यांच्या सकारात्मक भावनेला प्रोत्साहन देऊयात. खाकी वर्दीतल्या मातीशी इमान राखणाऱ्या स्वाभिमानी पोलिसांना आपण सर्वजण सलाम करुयात. जय हिंद. जय महाराष्ट्र.

लेखावरील प्रतिक्रियांसाठी संपर्क – (विकी पिसाळ) – 8275457453
तसेच किरण पिसाळ यांनाही संपर्क साधू शकता त्यांचा संपर्क क्रमांक – 797295 0231

मजुरांच्या रेल्वे तिकीट खर्चाविषयी निर्णय घ्या; हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई । लॉकडाऊनमुळे घरी जाणाऱ्या मजुरांच्या रेल्वे प्रवास तिकीटाच्या खर्चाविषयी निर्णय घेण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले. ‘सर्व हारा जन आंदोलन’ या स्वयंसेवी संस्थेसह अन्य काहींनी केलेल्या मजुरांच्या रेल्वे प्रवास तिकीटाच्या खर्चाविषयीच्या जनहित याचिकांवर न्या. गुप्ते यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज एकत्रित सुनावणी झाली. त्यावेळी मजुरांच्या रेल्वे प्रवासाच्या तिकीटाच्या खर्चाविषयी लवकर काही निर्णय घेण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले.

केंद्र सरकारने ८५ टक्के खर्चाची भरपाई करण्याची ग्वाही सर्वोच्च न्यायालयात दिली. मात्र, राज्य सरकारने अद्याप १५ टक्के खर्चाविषयी निर्णय घेतला नसल्याचे शुक्रवारच्या सुनावणीत समोर आले. त्यानंतर उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले. सरकारच्या उपायांची जनजागृती होत नसल्याने त्याबाबती माहिती मजुरांपर्यंत पोहोचतच नाही. आज पहाटे औरंगाबादजवळ मालगाडीखाली येऊन १५ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ही त्याचाच परिपाक आहे, असे जनहित याचिकादारांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मजूर, कामगारांची आरोग्य तपासणी आता मोफत असेल आणि प्रवासी वाहनात चढण्यापूर्वीच त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल, या नव्या निर्णयाची व्यापक प्रसिद्धी करा, जेणेकरून श्रमिकांना त्याची माहिती होईल, असे निर्देशही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”