Monday, December 22, 2025
Home Blog Page 5838

टेंशन वाढलं! देशभरात कोरोनाच्या बळींच्या संख्येत मोठी वाढ; २४ तासांत १९५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशातील कोरोनाचा संसर्ग थांबायचं नाव घेत नाही आहे. दिवसेंदिवस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून आता मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाने १९५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या २४ तासांत मृत्यू होण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. देशात एकूण १५६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून ही ४६ हजार ४३३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ९०० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आढून २७.४१ टक्क्यांपर्यंत वाढल्याने ही एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. गेल्या २४ तासांत १०२० जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. यानुसार आतापर्यंत एकूण १२ हजार ७२७ जण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा देशात १२ दिवस इतका आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

दरम्यान, काही राज्यांकडून कोरोना रुग्ण आणि त्यांच्या मृतांची आकडेवारी वेळेवर मिळत नाही आहे. आम्ही यासाठी सतत पाठपुरावा करत असून त्यांचे रिपोर्ट हाती आल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या असून मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. कोरोना रुग्ण आणि करोना नसलेल्या रुग्णांनाही सरकारी आणि खासगी हॉस्पटिल्समध्ये योग्य वेळी उपचार होतील याची दक्षता घेण्यात येत आहे. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यासाठी आरोग्य सेवा सुरळीत राहील, असा आरोग्य विभागाचा प्रयत्न असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

जेव्हा इरफानने बर्फासारख्या थंड पाण्यात उडी घेतली…मुलगा बाबीलने शेअर केला एक थ्रोबॅक व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे २९ एप्रिल रोजी निधन झाले. त्याच्या जाण्याने त्याच्या अनेक चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. कोलन इन्फेक्शननंतर या अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर बुधवारी इरफानने आपली पत्नी सुतापा आणि मुले बाबील आणि अयान यांना कायमचे सोडले.आता जेव्हा इरफान आपल्यात नाही आहे तेव्हा त्याच्या फॅमिलीबरोबर त्याच्या बर्‍याच आठवणी आहेत.इरफानचा मुलगा बाबील नेहमीच आपल्या वडिलांचे आपण न पाहिलेले क्षण सोशल मीडियावर शेअर करतोय आणि त्याच्या आठवणी जाग्या करतोय.

मंगळवारी, बाबिलने इरफान खानची बोल्ड बाजू दाखविणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे,ज्यात अभिनेता इरफान अतिशय थंड पाण्यात उडी मारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो स्वतःला बुडवून घेत असल्याचे आणि नंतर असे म्हणत आहे – “हे बर्फ आहे”.


View this post on Instagram

 

A post shared by Babil Khan (@babil.i.k) on May 5, 2020 at 12:24am PDT

 


View this post on Instagram

 

A post shared by Babil Khan (@babil.i.k) on May 5, 2020 at 12:24am PDT

 

यापूर्वी बबीलने इरफानचा पाणीपुरी खाण्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता.या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, बाबिलने लिहिले की- “जेव्हा आपण इतके दिवस डाएटवर असता आणि मग शूटिंग संपते आणि आपल्याकडे पाणी पुरी येते”.हा व्हिडिओ लवकरच व्हायरल झाला आणि चाहत्यांनी हे पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले. एका युझरने लिहिले, “तुम्ही नेहमीच आमच्याबरोबर रहाल.”


View this post on Instagram

 

When you’re on diet for so long and then the shoot ends and you can have pani puri.

A post shared by Babil Khan (@babil.i.k) on May 1, 2020 at 6:42am PDT

 

इरफान खानला २०१८ मध्ये न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या दुर्मिळ आजाराचे निदान झाले होते आणि तो लंडनमध्ये उपचारासाठी गेलेला होता. तो गेल्या वर्षी अंग्रेजी मीडियम या त्याच्या शेवटच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी परतला होता. मृत्यूच्या चार दिवस आधीच इरफानने आपली आई सईदा बेगम यांना गमावले होते.या अभिनेत्याने हे जग सोडल्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी सुतापा सिकंदरने एक भावनिक पोस्ट शेअर केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

पट्ठ्यानं खरेदी केली तब्बल ५२ हजारांची दारू; बिल व्हायरल होताच विक्रेता आला गोत्यात

बेंगळुरू । दारूची दुकान सुरु झाल्यापासून गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सकाळपासूनच या दारू वेड्यांनी वाईन शॉपबाहेर लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. मात्र, अशाच एका तळीरामाला नियमबाह्य जास्तीचे मद्यविक्री करणाऱ्या बेंगळुरूतील एका मद्य विक्रेत्याविरोधात राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या विक्रेत्याने एका ग्राहकाला १३.५ लिटर दारू आणि ३५ लिटर बियर अशी एकूण ५२,८०० रुपयांची दारू विकल्याचा आरोप आहे. दारू खरेदी केल्याचे ५२,८४१ रुपयांचे बिल व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्यानंतर दारू खरेदीदार आणि दारू विक्रेता असे दोघेही आता अडचणीत आले आहेत.

बेंगळुरूत ५२,८४१ रुपयांची दारू विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परवागीपेक्षा अधिक दारूची विक्री केल्याबद्दल कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. सरकारने दारू विक्रेत्याला दिवसाला भारतीय बनावटीचे परदेशी दारू एका व्यक्तीला केवळ २.६ लिटर , तर १८ लिटर बियर विकण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणात दक्षिण बेंगळुरूतील तावरेकेरे येथे किरकोळ दारू विक्रेत्याने एका वेळेला एका ग्राहकाला १३.५ लिटर मद्य आणि ३५ लिटर बियर विकली. ज्या ग्राहकाने ही दारू खरेदी केली आणि आपले बिल सोशल मीडियावर पोस्ट केले तो ग्राहक मात्र अद्याप सापडलेला नाही. उत्पादन शुक्ल विभाग मद्य खरेगी करणाऱ्या ग्राहकावर देखील गुन्हा नोंदवू शकतात. याचे कारण म्हणजे एखादी व्यक्ती दिवसाला २.६ लिटरहून अधिक मद्य बाळगू शकत नाही, असा नियम आहे.

दरम्यान, दारू विक्रेत्याने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ही दारूची खरेदी एका व्यक्तीने केलेली नसून एकूण ८ जणांनी ती केली आहे. मात्र, त्यांनी पेमेंट एकाच कार्डाद्वारे केले, असे दारू विक्रेत्याचे म्हणणे आहे. उत्पादन शुक्ल विभाग विक्रेत्याचे म्हणणे खरे आहे का याची तपासणी करणार आहेत. दारू विक्रेत्याने दिलेले बिल व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर दारू विक्रेते सरकारी नियम कसे धाब्यावर बसवतात याची जोरदार चर्चा सुरू झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कर्वे समाज संस्थेतर्फे मजुरांसाठी समुपदेशन

पुणे प्रतिनिधी |पुण्यातील कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअॅबीलीटीज आणि पुणे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील क्रेडाच्या विविध लेबर रिलीफ कॅम्पमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कामगार व मजुरांना मानसिक आधार देण्यासाठी मानसिक समुपदेशन कार्यक्रम सुरु करण्यात आला असून याचा लाभ सुमारे तीन हजार मजुरांना होणार असल्याची माहिती कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक व प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी दिली.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अनुसरून राज्यातील विविध लेबर रिलीफ कॅम्पमध्ये लॉकडाऊन मुळे अडकून पडलेल्या सर्व बांधकाम कामगार व मजुरांना कोविड १९ बाबत शास्त्रशुद्ध माहिती पुरविणे, कामगार व मजुरांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करून त्यांना मानसिक समुपदेशन करणे बंधनकारक असल्याने महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य संचालनालयाने राज्यातील जिल्हा रुग्णालये, मेडिकल कॉलेज व समाजकार्य महाविद्यालयाच्या मदतीने मजुरांना मानसिक समुपदेशन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून याचाच एक भाग म्हणून कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअॅबीलीटीजच्या वतीने समाजकार्य व समुपदेशन अभ्यासक्रमाचे ३५ विद्यार्थी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील क्रेडाच्या विविध लेबर रिलीफ कॅम्पमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या मनोविकार तज्ञ डॉ मधुमिता बहाले व मानसोपचार तज्ञ मिलिंद कारंजकर यांच्या मदतीने प्रत्यक्षपणे जाऊन मजुरांना कोविड १९ बाबत शास्त्रशुद्ध माहिती पुरवित त्यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करून त्यांना मानसिक समुपदेशन करीत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअॅबीलीटीजचे चेअरपर्सन प्रा. चेतन दिवाण यांनी दिली.

कोविड १९ या महामारीपासून सर्वप्रथम स्वतःचे संरक्षण करणे, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे, सुरक्षित सामाजिक –शारीरिक अंतर ठेवणे, तोंडावर मास्क बांधणे, सतत साबणाने हात धुणे, सॅनिटायझर चा वापर करणे, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम करणे तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी कोरोनाबाबत विनाकारण मनामध्ये येणारे निरनिराळे विचार टाळणे, चिंता, भीती, उदासी आदी समस्यांपासून दूर राहण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे या व अशा अनेक विषयांवर यावेळी मजुरांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे प्रा. चेतन दिवाण यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आमदार त्रिपाठींवर पत्नीचा खून केल्याचा आरोप; प्रेयसीचा मर्डर केल्याप्रकरणी वडीलही तुरुंगात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील महाराजगंजच्या नौतनवा सीटवरील अपक्ष आमदार अमनमणि त्रिपाठी यांना पोलिसांनी त्यांच्या सात समर्थकांसह अटक केली आहे. त्याला बिजनौर जिल्ह्यात अटक करण्यात आली. सीएम योगी यांच्या सूचनेवरून पोलिसांनी अमनमणि विरोधात साथीच्या आजार अधिनियम यासह आयपीसीच्या विविध कलमांतर्गत कारवाई केली आहे. लॉकडाऊन दरम्यान अमनमणि डोंगरावर फिरायला निघाला होता.त्याची एक क्लिप नुकतीच व्हायरल होत आहे,ज्यामध्ये तो हिमवृष्टीबद्दलही विचारत आहे.अमनमणि त्रिपाठी हे आपल्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

बद्रीनाथ, केदारनाथला ११ जणांच्या ताफ्यासह जात होते
लोकडाऊन दरम्यान अमनमणि ११ जणांचा ताफा घेऊन देहरादूनहून बद्रीनाथ तसेच केदारनाथला जात होता.जाताना रविवारी रात्री त्याला चामोली सीमेवर अडविण्यात आले, पण नंतर त्याला यूपी सीमेवर सोडण्यात आले. बिजनौर येथे सोमवारी अमनमणिसह सात जणांना अटक करण्यात आली. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बिजनौरचे एसपी म्हणाले की, यूपी सरकारने अमनमणिला उत्तराखंडला जाऊ दिले नाही. तो अनावश्यकपणे बाहेर होता तसेच त्यांच्याकडे वैध पासही नव्हता. या लोकांना क्वारंटाईन ठेवणे आणि त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. या लोकांवर कारवाईही केली जाईल.

 

पिता अमरमणि याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे
बाहुबली मंत्री असलेले अमरमणि त्रिपाठी यांचे पुत्र अमनमणि त्रिपाठी वडिलांच्या राजकीय वारशामुळे विधानसभेच्या उंबरठ्यावर पोचले होते अमनमणि त्रिपाठी हा त्याचे वडील अमरमणि त्रिपाठी यांच्या पाउलांवर पाऊल ठेवून वाटचाल करीत आहे. मधुमिता खून प्रकरणात त्याचे वडील जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत, तसेच त्याच्या कारनामांमुळे मुलालाही अटक करण्यात आली आहे. लखनौच्या लेखिका मधुमिता शुक्ला यांच्या हत्येचा आरोप त्याचे पिता अमरमणिवर आहे.

पत्नी साराच्या हत्येचा आरोप अमनमणि त्रिपाठीवर
आमदार अमनमणि त्रिपाठी याच्यावरही आपली पत्नी सारासिंगची हत्या केल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर हा गुन्हा लपवण्यासाठी अमनमणिने तो एक अपघात असल्यासारखे दाखविल्याचा आरोप आहे.एका कार अपघातात अमनमणि त्रिपाठीची पत्नी साराच्या मृत्यूची घटना तिची आई सीमा सिंह यांनी केली होती. यानंतर या प्रकरणी सीबीआय चौकशी झाली आणि त्याला अटक करण्यात आली. सध्या त्याची जामिनावर सुटका झाली आहे,पण खटला चालू आहे. वडील अमरमणि यांना आपल्या मैत्रिणीच्या हत्येबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे, तर मुलगा अमनमणि त्रिपाठी याने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. यानंतरही हे बाहुबली त्रिपाठी कुटूंबियांच्या राजकीय कारकिर्दीवर याचा काही परिणाम झालेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

महसूलच हवाय तर आमदारांचे ६ महिण्याचे पगार रद्द करा; दारुची दुकाने उघडणे हा पर्याय नाही – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील ग्रील,ऑरेंज, रेड अशा तिन्ही झोनमध्ये दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल असेही बोलले गेले. यापार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महसूलच हवाय तर आमदारांचे ६ महिण्याचे पगार रद्द करा; दारुची दुकाने उघडणे हा पर्याय नाही असं म्हणत देसाई यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

वा रे सरकार तेरा खेल अब लॉक डाऊन होगा फेल असं म्हणत लॉक डाऊन फेल होण्याआधी आणि कोरोनाचे पेशंट वाढण्याआधी तातडीने दारूची दुकाने बंद करण्यात यावीत अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. जर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर सरकारसाठी हा घातक निर्णय ठरेल आणि धोक्याची घंटा असेल असंही देसाई यांनी सांगितले आहे. राज्यात कालपासून मद्यविक्रिसाठी परवानगी देण्यात आली आहे. यापार्श्वभुमीवर देसाई यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत आपला विरोध दर्शवला आहे.

दारु विक्री बंद करावी कारण त्यामुळे घरगुती हिंसाचार वाढेल, गुन्हेगारी वाढेल, पोलिसांवरील हल्ले वाढतील असं मत देसाई यांनी व्यक्त केले आहे. महसूल हवा आहे तर आमदारांचे सहा महिन्याचे पगार बंद करा आणि इतर चैनीच्या वस्तू वरील कर दोन टक्क्याने वाढवा, जास्त महसूल राज्य सरकारला मिळेल असा सल्लाही देसाई यांनी दिला आहे.

पण महिलांचे शाप असणारा पैसा महसूल म्हणून स्वीकारू नका अन्यथा सरकारला तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी तृप्ती देसाई यांनी दिला आहे. सुप्रियाताई सुळे, रश्मीजी ठाकरे, नीलम ताई गोर्हे याना महिलांच्या समस्या माहीत असूनही आणि यांचे सरकार असूनही असा निर्णय घेण्यात आला आहे, याचे वाईट वाटत असल्याचे देसाई यांनी म्हटले.

‘हे’ राज्य सुरु करणार दारूची ‘होम डिलिव्हरी’

रायपूर । देशातील विविध राज्य सरकारांनी कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांची गर्दी दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. दारूच्या दुकानांवर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगढ सरकानं राज्यातील ग्रीन झोनमध्ये मद्यविक्रीच्या होम डिलिव्हरीसाठी एक वेब पोर्टल लॉन्च केलं आहे.

लॉकडाउनदरम्यान मद्यविक्रीच्या दुकांनावर मोठी गर्दी होऊ नये यासाठी छत्तीसगढ सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. मंगळवारी सरकारकडून याबाबत माहिती देण्यात आली. हे पोर्टल राज्य छत्तीसगढ सरकारद्वारेच चालवलं जाणार आहे. तसंच याचं छत्तीसगढ स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नावावरच ठेवण्यात आलं आहे. ही कंपनी राज्यातील मद्यविक्रीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते.

केंद्र सरकारकडून लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यानंतर राज्यांमध्ये सोमवारपासून मद्यविक्रीला सुरूवात झाली. परंतु यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवण्यात येत नसल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसून आलं होतं. तर दुकानांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. छत्तीसगढची राजधानी रायपुरमध्येही तसंच अन्य जिल्ह्यांमध्येही हेच चित्र होतं. ही गर्दी कमी व्हावी या उद्देशानं सरकारनं मद्याची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

अशी करता येईल दारू ऑर्डर
छत्तीसगढ राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलेल्या CSMCL च्या वेबसाईट वरून किंवा कंपनीच्या अपवरून ग्राहकांना आपली ऑर्डर देता येईल. परंतु होम डिलिव्हरी केवळ ग्रीन झोनमध्येच करण्यात येईल. रायपुर आणि कोरबा परिसरात ही सुविधा उपलब्ध नसेल,” असं राज्याच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं. ग्राहकांना ऑनलाइन ऑर्डरसाठी आपला मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि पत्ता रजिस्टर करावा लाहमार आहे. त्यानंतर ओटीपीद्वारे व्हॅलिडेशन करण्यात येईल. त्यानंतर एका व्यक्तीला ५ हजार मिलिलीटरपर्यंत ऑर्डर करता येईल. यासाठी १२० रुपये डिलिव्हरी चार्ज द्यावा लागणार असल्याचंही सांगण्यात आलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

ऋषी कपूर यांच्या रिसेप्शनची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर भलतीच व्हायरल ! तुम्ही पाहिली का ?

मुंबई | दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी नुकताच जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांचा अभिनय आणि प्रसिद्ध गाणी यामधून यांनी लोकांच्या मनात जागा निर्माण केली होती. मात्र त्यांचं अचानक निधन झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. यामध्येच ४० वर्षापूर्वीची त्यांच्या रिसेप्शनची निमंत्रण ही आज व्हायरल होताना दिसत आहे.

 

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची जोडी अनेक तरुणांना आवडत होती. त्यांच्यात असणाऱ्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यावर त्यांनी १९८० साली लग्न केलं. त्यावेळी त्यांनी लोकांना निमंत्रण देण्यासाठी जे कार्ड छापले होते. ते कार्ड आता त्यांच्या निधनानंतर म्हणजे तब्बल ४० वर्षांनंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऋषी कपूर यांनी अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. यामध्ये नीतू कपूर या प्रचंड भावनिक झाल्या असून त्या सोशल मीडियावर ऋषी कपूर यांचे एक एक फोटो शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करत आहेत.

Rishi Kapoor and Neetu Singh's love story in Pictures | Bollywood ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

३९ हजार रुग्ण असताना दारूची दुकाने उघडली ! याला म्हणतात खतरों के खिलाडी…

मुंबई |५५० करोनाग्रस्त रुग्ण होते, तेव्हा लॉकडाऊन केल. आणि आता ३९ हजार रुग्ण आहेत, तेव्हा दारुची दुकानं सुरु करण्यात आली आहेत. यालाच म्हणतात खतरों के खिलाडी अस ट्विट करत अभिनेता एजाज खान याने सरकारचा समाचार घेतला आहे. सध्या करोनाग्रस्त रुग्णांनी थैमान घातलं आहे. त्यात आता लोक दारुसाठी दुकानासमोर गर्दी करत आहेत. ही गर्दी करणे देखील धोकादायकच आहे. त्यामुळे एजाज खान याने हे ट्विट केलं आहे.

दरम्यान करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील लॉकडाउन आणखी काही दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. मात्र या वाढीव लॉकडाउनमध्ये दारुची दुकानं सुरु करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. ही दुकानं सुरु होताच दारु खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली.

बाहेर असणाऱ्या जीवघेण्या विषाणूला न घाबरता दारुसाठी गर्दी करणाऱ्या या लोकांना अभिनेता एजाज खान याने ‘खतरों के खिलाडी’ असं म्हटलं आहे. एजाज खान सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो बिनधास्तपणे आपल मत मांडत असतो. अलिकडेच केलेल्या एका ट्विटमुळे त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

यंदाची पंढरीची आषाढी ‘वारी’ चुकणार?

पुणे  । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं लोकांच्या सार्वजनिक सण-समारंभ, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले. लॉकडाउनच्या काळात गुढीपाडवा, रमजान सारखे सण घरात बसून साजरे करण्याची वेळ आली. कोरोनाच्या संसर्गावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. अशातच लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला. मात्र अजूनही पुढे काय होणार यावर अनिश्चितता आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या पंढपूरच्या विठुरायाची आषाढी वारी कोरोनाच्या संकटामुळं होणार कि नाही यावर आता प्रश्नचिन्ह तयार झालं आहे. कारण ज्या पुणे, पिंपरी-चिंचवड भागातून आषाढी वारीची पालखी मार्गस्थ होते तो रेड झोनमध्ये आहे. तुकोबांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात मुक्कामी असते. ज्या ठिकाणी या पालख्यांचा मुक्काम असतो ते ठिकाण सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे पालखीचं स्वरुप कसं असावं यावर विचार होणं गरजेचं असल्याचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे.

चैत्रवारीपासून माऊलींच्या आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याची तयारी सुरु होते. पण यावर्षी ते सगळं ठप्प आहे. महाराष्ट्रभरातून येणारे दिंडी प्रमुख, वारकरी यांच्या मनात आषाढी वारीच्या नियोजनाबाबत संभ्रम आहे. त्यामुळे शासनाने यावर स्पष्टता द्यावी अशी मागणी होते आहे. यावर्षी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रस्थानाची तारीख 27 मे आहे. देहूमधील संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान नियोजित तारीख 12 जून आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान नियोजित तारीख 13 जून आहे. त्यामुळे अगदी तोंडावर आलेल्या या उत्सवाची रुपरेषा ठरवण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलावित असं वारकऱ्यांचं म्हणणं. यंदाची वारीचं स्वरूप हे शासनाच्या निर्णयावरचं अवलंबून असल्याचं वारकरी म्हणाले. याआधी लॉकडाउनच्या काळात गेल्या एप्रिल महिन्यात चैत्रवारी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आषाढीसाठी राज्यभरातून जवळपास 150 ते 200 पालखी सोहळे येत असले तरी यात प्रामुख्याने सात मानाच्या पालख्यांचे महत्त्व संप्रदायात असते. याच ७ पालख्यांसोबत जवळपास 10 ते 15 लाख वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. या प्रमुख पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे पुणे परिसरातून येतात. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे कोरोनाचे मोठे संकट असल्याने हा रेड झोन करण्यात आला आहे. त्यामुळं पालखी सोहळा आयोजनास मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच इतक्या मोठया संख्येत लोकांनी पालखी सोहळ्यानिमित्त एकत्र येणं म्हणजे कोरोनाच्या संसर्गाला चालना देण्यासारखी स्थिती निर्माण करणं.

दरम्यान, इतिहासाची पाने चाळून पाहिल्यास यापूर्वी 1896 साली प्लेगची साथ आली होती तेव्हा देखील ब्रिटिश सरकारने आषाढी आणि इतर पालखी सोहळे रद्द करुन प्रातिनिधिक स्वरुपाची यात्रा केल्याचं सांगितलं जातं. यंदाचा धोका खूपच मोठा आहे. पंढरपूर परिसरात कोरोनाला अद्याप शिरकाव करता आलेला नसला तरी सोलापूर शहरात कोरोनाचा फास आवळत चालला आहे. अशावेळी आषाढी यात्रेबाबत शासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे, जेणेकरुन राज्यभरातील लाखो भाविकांच्या मनातील संभ्रम दूर होऊन चित्र स्पष्ट होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”