Monday, December 22, 2025
Home Blog Page 5839

BoysLockerRoom : शाळेतल्या मुलांचे अश्लिल चॅट व्हायरल; एका विद्यार्थ्याला अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने इन्स्टाग्रामवरील बॉईज लॉकररूमवरील अश्लील चॅटच्या तपासाची स्वत: दखल घेतली आहे.या ग्रुप प्रकरणात एक शालेय विद्यार्थी पकडला गेला आहे.जवळपास सर्व २१ सदस्य ओळखले गेले आहेत.आता या सर्वांची चौकशी केली जाईल.दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने इन्स्टाग्राम चॅट रूमवर दिल्लीतील शाळकरी मुलांवर बलात्काराचा प्रचार करत असल्या संबधीची कारवाई केली आहे.

Boys Locker Room: Plan for Gang Rape Over Instagram Groups ...

पकडलेल्या मुलाची चौकशी केली जात आहे
पकडलेल्या विद्यार्थ्याचा मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आला असून त्याचा शोधही घेण्यात येत आहे.आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ही शाळकरी मुले मेसेज वरून मुलींच्याबद्दल अश्लीलतेपासून बलात्कारापर्यंतच्या गोष्टी बोलत होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दिल्लीच्या महिला आयोगाने इंस्टाग्रामसह दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे आणि ८ मे पर्यंत इन्स्टाग्रामला काही माहिती देण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. पोलिसांना कठोर कारवाई करण्यास सांगताना या प्रकरणात गुंतलेल्या आरोपींविरोधात एफआयआरचा तपशीलही ८ मेपर्यंत मागविण्यात आला आहे.

Delhi Crime News: #boyslockerroom के खिलाफ सोशल ...

संपूर्ण प्रकरण कसे उलगडले?
वास्तविक #boyslockerroom सोमवारी सकाळी ट्विटरवर ट्रेंड होत होता. ज्यामध्ये या ग्रुपमधील बर्‍याच चॅटचे स्क्रीनशॉट्स शेअर केले जात होते.बॉईज लॉकर रूम हे इन्स्टाग्रामवर तयार केलेल्या एका अकाऊंटचे नाव आहे. यावर काही शालेय विद्यार्थी केवळ अश्लील चॅट करत नव्हते तर इथे ते मुलींचे फोटोज शेअर करून सामूहिक बलात्काराबद्दल बोलत होते.एका ट्वीटर वापरकर्त्याने या ग्रुपचे काही स्क्रीनशॉट्स घेतले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

BoysLockerRoom: Chat Groups Casually Body-Shaming And Sexualising ...

അവളെ എളുപ്പത്തില്‍ ബലാത്സംഗം ...

News about #boyslockerroom on Twitter

पोलिस काय म्हणाले?
एका अहवालानुसार, दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, इन्स्टाग्रामवर तयार झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या या ग्रुपमध्ये हे विद्यार्थी छोट्या मुलींचे फोटो शेअर करत होते. एवढेच नव्हे तर ते अश्लील बोलत होते आणि त्यात त्यांनी आक्षेपार्ह शब्दही वापरले होते. आश्चर्याची बाब म्हणजे या ग्रुपमधील बहुतेक विद्यार्थी शाळांमध्ये अभ्यास करतात.डीसीपी अनेश राय म्हणाले की, स्वयंचलित संज्ञानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर क्राईम सेल करीत आहे. यासह, या ग्रुपशी संबंधित सर्व माहिती इन्स्टाग्रामला एक पत्र लिहून मागितली गेली आहे.इन्स्टाग्रामकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

महिला आयोगाने कोणती माहिती विचारली?
या प्रकरणात, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी इन्स्टाग्रामला ग्रुप ऍडमिन आणि इतर सदस्यांची माहिती तसेच त्यांचे युझर्स नेम आणि हँडलचे नाव, ईमेल आयडी, आयपी ऍड्रेस,स्थळ आणि इतर माहिती मागितली आहे.यात कमिशनने म्हटले आहे की सोशल मीडिया कंपनी असल्याने इंस्टाग्रामद्वारे अशा कामावर नजर ठेवली गेली असती आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली असावी. याबाबत आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदविली आहे.

Delhi Crime Information: #boyslockerroom के खिलाफ ...

महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल काय म्हणाल्या?
महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही याबाबत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.ज्यामध्ये त्या म्हणाल्या की, ‘इन्स्टाग्रामवर काही मुलांनी बॉईज लॉकररूम नावाचा एक ग्रुप तयार केला आहे. या गटात ते छोट्या मुलींचे फोटो शेअर करत आहेत.ते त्यांच्यावर अश्लिल कमेंट्सही देत आहेत आणि या ग्रुपमध्ये ते अल्पवयीन मुलींवर बलात्कार कसे करायचे याचा विचारही करीत आहेत. हे अत्यंत भयानक आणि धक्कादायक आहे. दिल्ली महिला आयोगाने इन्स्टाग्राम आणि दिल्ली पोलिसांना याबाबत नोटीस बजावली आहे.कारण या मुलांना त्वरित अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी अशी आमची इच्छा आहे.

News about #boyslockerroom on Twitter

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

समजून घ्या! राज्याचं दारुचं गणित; दररोज ‘किती’ लिटर ढोसली जाते दारू

मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी तळीरामांची दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. दारुविक्रीच्या निर्णयामुळे व्यसनाधिनता वाढेल आणि यातून घरगुती अत्याचारांत वाढ होईल, अशी मतं दारुबंदी समर्थकांनी व्यक्त केली आहेत. तर दारुसाठी उसळलेल्या गर्दीतील दर्दींनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. राज्याच्या महसूलवाढीच्या दृष्टीने दारुविक्रीचं समर्थन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचं दारुचं गणित काय आहे? त्याची आकडेवारी जाणून घेऊया

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार राज्यात वर्षभरात ८६.७ कोटी लिटर इतकी दारुची विक्री होते. ही आकडेवारी पाहता राज्यात दररोज सरासरी २४ लाख लिटर दारु मद्यपी ढोसतात. राज्यातील वर्षभरात विक्री होणाऱ्या ८६.७ कोटी लिटर दारुसाठ्यापैकी, सर्वाधिक ३५ कोटी लिटर देशी दारुची विक्री होते. तर विदेशी दारु २० कोटी लिटर इतकी विकली जाते. बिअर ३१ कोटी लिटर इतकी विकली जाते. तर वाईन मात्र सर्वात कमी म्हणजे ७० लाख लिटर इतकी विकली जाते. रोज २४ लाख लिटर दारु विक्री होत असलेल्या महाराष्ट्रात गतवर्षी म्हणजे २०१९-२० या आर्थिक वर्षात १५ हजार ४२८ कोटी इतका महसूल राज्य सरकारला दारु विक्रीतून मिळाला होता. त्यामुळे महिन्याला सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा महसूल राज्याला दारु विक्रीतून मिळतो.

दरम्यान, राज्यातील दारूची दुकान झाल्यानंतर सोमवारी १७ कोटी रुपयांची दारु विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मोठा कर आकारूनही राज्यात मोठ्या प्रमाणात दारुविक्री आधीपासूनच होते. तर हे सर्व दारू गणित पाहता दारूपासून मिळणार महसूल आणि राज्यातील व्यसनाधीनतेचं प्रमाण एकमेकास पूरक असल्याचं दिसून येत. म्हणून लॉकडाऊनमुळं आर्थिक अडचणीत सापडलेल्या देशातील वेगवेगळया राज्यांनी दारूची दुकान सुरु करण्याची परवानगी दिली. दिल्ली सरकारनं तर दारावर ७० टक्के अतिरिक्त कर अकरायला सुरवात केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाउन तरी पेट्रोल, डिझेलचे ‘भाव’ वाढले..

नवी दिल्ली । देशात कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नसताना लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार आहे. लॉकडाऊन वाढवला असला तरी परिस्थिती पाहून झोननुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. एकीकडे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असताना दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडणार आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक राज्यांच्या महसुली उत्पन्नात घट झाली आहे. अशावेळी कोरोनाच्या संकटकाळात राज्याचा आर्थिक गाडा कसा चालवायचा असा प्रश्न राज्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातूनच वाट काढत दिल्ली सरकारने पेट्रोलचे दर १.६७ रू प्रती लिटरने वाढवण्याचा निर्णय घेतला असून डिझेलच्या दरात ७.१० रू प्रती लिटर वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच नव्या दरानुसार दिल्लीत आज पेट्रोलचे दर ७१.२६रू प्रती लिटर तर डिझेलचे दर ६९.२९ रू प्रती लिटर इतके आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत एप्रिल महिन्यात पेट्रोलची विक्री ६१ टक्के तर डिझेलची विक्री ५७ टक्क्यांनी घसरली. शिवाय इंधनांवर लागणारे कर देखील वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे नागालँड,आसाम आणि मेघालय या तीन राज्यांमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. नागालँडमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर कोरोना टॅक्स लावण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘BoysLockerRoom’ नक्की आहे काय? अश्लिल चॅट ट्विटरवर ट्रेंडिंगला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉईज लॉकर रूमच्या वादानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जावी, असा बहुतेकांचा विश्वास आहे.चला तर मग जाणून घेऊयात बॉईज लॉकर रूम म्हणजे नक्की काय आहे,त्यामुळे दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिस तसेच इंस्टाग्रामला नोटीस दिली असून ८ मे पर्यंत यासंबंधी जाब विचारला आहे.

BoysLockerRoom: Chat Groups Casually Body-Shaming And Sexualising ...

बॉईज लॉकर रूमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुलींच्या फोटोंवर अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट केल्या जातात.यावर बरेच विद्यार्थी चॅटिंगही करतात आणि या चॅटिंगला प्रतिक्रिया देखील मिळत आहे.यात मुलींविषयी असे अश्लील भाष्य केले जाते जे अत्यंत आक्षेपार्ह असून कारवाईच्या कक्षेत येते.ट्विटरवर व्हायरल झालेल्या या चॅटिंगच्या स्क्रीनशॉट्सनुसार या ग्रुप चॅटिंग दरम्यान मुलींसोबत असभ्य वर्तन करण्याचा कट रचला जात आहे.

Talking About Raping Girls To Sharing Their Photos, Delhi School ...

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बॉईज लॉकर रूम ग्रुप तयार झाला आहे.यात ग्रुप ऍडमिन सह एकूण डझनभर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये समाविष्ट झालेले हे विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमधील आहेत,जे अल्पवयीन वर्गात मोडतात.

BoysLockerRoom: Chat Groups Casually Body-Shaming And Sexualising ...

सोशल मीडियामुळे जिथे लोकांना भरपूर फायदे मिळाले आहेत,तिथेच त्याच्या चुकीचा वापर केल्याने बर्‍याचदा मोठी समस्या देखील उद्भवू शकते.असेच काहीसे या शाळकरी मुलांनी तयार केलेल्या या इन्स्टाग्राम ग्रुपद्वारे केले जात आहे.बॉईज लॉकर रूम नावाच्या या ग्रुपला इन्स्टाग्रामवर शालेय मुलींविषयी आणि त्यांच्यावर बलात्कार करण्याविषयी अश्लील टिप्पण्या दिल्या जात होत्या.

BoysLockerRoom: दिल्ली महिला आयोग ने ...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर तयार केलेला हा शालेय विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आहे. ज्यामध्ये शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींचे फोटोज शेअर करतात आणि त्याविषयी अश्लील बोलतात.तसेच, मुले बलात्काराच्या अनेक पद्धतींबद्दलही चर्चा करतात.

അവളെ എളുപ്പത്തില്‍ ബലാത്സംഗം ...ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रोहित पवारांनी गर्दी करणाऱ्या तळीरामांना दिला हा मोलाचा ‘सल्ला’

मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांची गर्दी दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोल्हापूरमध्ये तर दारू मिळवण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. नाशिकमध्ये तर पोलिसांना मदिरा मंदिराबाहेर तळीरामांना लाठीचा प्रसाद वाटप करावा लागावा.

दिवसभरातील राज्यातली ही वाईट परिस्थिती बघितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत तळीरामांना मोलाचा सल्ला दिला आहे. ‘सरकारने अनेक दुकानांना परवानगी दिली, पण विशिष्ट दुकानांपुढेच लागलेल्या रांगा पाहून वाईट वाटलं’, असं रोहित पवार म्हणाले आहेत. ‘मित्रांनो… जीवनमरणाचा प्रश्न आहे. आज घरात बसा. तुम्हाला ‘बसायचंच’ असेल तर ‘घरच्या’ परवानगीने पुढे आयुष्यभर निवांत ‘बसता’ येईल ना!’ एवढी घाई का करताय? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, तळीरामांनी दारू मिळवण्यासाठी दारूच्या दुकानांबाहेर गर्दी केल्यामुळे नाशिकमध्ये अनिश्चित काळासाठी दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तर औरंगाबादमध्येही दारूची दुकानं उघडली नसल्यामुळे काही दारूवेड्या नागरिकांचा हिरमोड झाला. राज्य सरकारने घेतलेल्या दारूविक्रीच्या या निर्णयाचा सामाजिक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.  दारुविक्रीच्या निर्णयामुळे व्यसनाधिनता वाढेल यापासून ते घरगुती अत्याचारांत वाढ होईल, अशी मतं दारुबंदी समर्थकांनी व्यक्त केली आहेत. तर दारुसाठी उसळलेल्या गर्दीतील दर्दींनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोज देण्यास नकार; कराड पालिकेचे घंटा गाडीवरील कर्मचारी संपावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरात घंटा गाडीवर काम करणाऱ्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोज देण्यास नकार ल्याने दिल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हात जोडून सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोजची मागणी करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून काम करायचे असेल तर करा अन्यथा नका येऊ..माझ्याकडे बरेच लोक आहेत असे उत्तर मिळाल्याने याबाबत अनेकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

कराड शहरातील विविध पेठा व छोट्या मोठ्या वस्तीतून नागरिकांच्या घरातून कचरा गोळा करण्याचे काम पालिकेच्या घंटा गाडीतर्फे केले जात आहे. या कामाचा ठेका पालिकाने युनिर्व्हसल सर्व्हिसेस कंपनीला दिला आहे. कोरोनाच्या महामारीमध्येही घंटा गाडीवरील कर्मचारी जीव धोक्यात घालून शहरातील कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत. यामध्ये 18 घंटा गाडीवर 40 कर्मचारी काम करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या कर्मचार्‍यांनी ठेकेदाराकडे कोरोनापासून सुरक्षा व बचाव व्हावा म्हणून सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोज मिळावा अशी मागणी होती. मात्र ठेकेदाराने चक्क ही मागणी धुडकावून लावून ज्यांना काम करायचे आहे त्यांनी काम करा अन्यथा काम सोडून द्या, असे फर्मान काढल्याने कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. यामुळे मंगळवारपासून घंटागाडीवरील कर्मचार्‍यांनी संप पुकारला असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपयर्र्ंत संप सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले असून याबाबत प्रशासनाने गांभीर्याने निर्णय घेऊन या कर्मचार्‍यांचा सुरक्षेचाही विचार करावा, असे मत कर्मचार्‍यांनी व्यक्त केले आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/3199208876776264/

राज्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ कोटींची दारुविक्री

मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. तळीरामांच्या या दारूवेडामुळे दारू विक्रीच्या आकड्यांनी उचांक गाठला आहे. दिवसभरात सरासरी 17 कोटी रुपयांच्या दारूची विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

काल किरकोळ दारूची दुकानं सुरू झाली आहेत, यात काही जिल्ह्यात दुकानं बंदच आहेत, तर ज्या जिल्ह्यात सुरू आहेत तिथलीही सर्व दुकानं सुरू नाहीत. याशिवाय हॉटेलमधील विक्रीही बंद आहे. त्यामुळे काय दिवसभरात 15 ते 17 कोटी रुपयांची दारू विक्री झाली असण्याची शक्यता आहे. काही राज्यांनी दारू विक्रीवर जादा कर लावला आहे. मात्र आपल्या राज्यात दारूवर पूर्वीपासूनच जादा कर आकारला जातो. दिल्लीने 70 टक्के कर वाढवला असला तरी आपल्या राज्यातील कर सध्या त्यापेक्षाही जास्त आहे.

मात्र ही गर्दी जास्त दिवस राहणार नाही, आज किंवा उद्यापर्यंत ही गर्दी संपेल असा विश्वास राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला आहे. जिथे गर्दी होईल तिथली दुकानं काही काळासाठी बंद करण्याची कारवाई स्थानिक प्रशासन करत आहे. त्यामुळे नियम पाळले नाहीत तर दारूची दुकानं बंद होतील हे लक्षात घेऊन ग्राहकांनी शिस्त पाळावी असं आवाहन उमप यांनी केलं आहे. तसंच गर्दी टाळण्यासाठी दुकानांनी टोकन द्यावे अशा सूचना देण्यात येणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

.

केजरीवाल सरकारप्रमाणे ठाकरे सरकार राज्यात दारूवर कोरोना कर आकारणार?

मुंबई । कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाऊनमुळं देशातील राज्यांच्या तिजोरीत महसूल जमा होणं थांबला आहे. अशा वेळी कोरोनाच्या संकटात राज्य चालवायचं कसं हा प्रश्न प्रत्येक राज्यांना भेडसावत असताना अनेक राज्यांनी महसुलासाठी दारुची दुकानं पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली.मात्र, असं करताना दिल्लीतील केजरीवाल सरकारने दारुवर अतिरिक्त ७० टक्के कर लावला. महाराष्ट्राच्या तिजोरीत सुद्धा महसुलाचा ओघ हा थांबला आहे. म्हणून दिल्ली सरकारच्या या निर्णयानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील राज्य सरकारंही दारूवर मोठ्या प्रमाणात कोरोना कर आकारणी करणार का? याची उत्सुकता आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सगळ्याच राज्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. सगळेच उद्योग, व्यवसाय, व्यवहार ठप्प असल्याने कररुपाने मिळणारा महसूल बंद झाला आहे. एकीकडे कोरोना लढ्यात वाढता खर्च आणि आटलेलं उत्पन्न यामुळे राज्ये उत्पन्नासाठी नवनवे मार्ग शोधत आहेत. दारूवर कर हा त्यातीलच एक उपाय आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकारने तर दारुच्या किरकोळ विक्रीच्या कमाल किंमतीवर तब्बल ७० टक्के कर आकारला आहे. विशेष म्हणजे एवढा मोठा कर आकारल्यानंतरही मंगळवारी सकाळी दिल्लीत दारुसाठी मोठ्या रांगा लागलेल्या दिसल्या. काही दुकानांसमोर तर तब्बल दोन किलोमीटरच्या रांगा होत्या. त्यामुळे दारुतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याची आशा आहे.

सोमवारी पहिल्याच दिवशी दारु खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्यानंतर या निर्णयावर टीकाही सुरु झाली. त्यातच काही राज्यांमध्ये पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांची दारु विक्री झाल्याने त्याची चर्चाही रंगली आहे. कर्नाटकात पहिल्याच दिवशी ४५ कोटींची दारु विकली गेली, तर उत्तर प्रदेशात तब्बल ३०० कोटी रुपयांची दारुविक्री सोमवारी पहिल्याच दिवशी झाली. अनेक ठिकाणी दारु खरेदीसाठी काही किलोमीटर लांब रांगा लागल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल माध्यमांवर दिवसभर फिरत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दिल्लीत केजरीवाल सरकारचा दारुवर ‘कोरोना टॅक्स’!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आज दिल्लीत बऱ्याच ठिकाणी दारूची दुकाने उघडली गेली,पण त्यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा बोजवारा उडाला आहे. दरम्यान, सोमवारी दिल्ली सरकारने दारूवर ‘कोरोना टॅक्स’ लावला.त्यानंतर दिल्लीत दारू महागली. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार आता दिल्लीत दारूच्या एमआरपीवर ७०% कर आकारला जाईल.सरकारचा हा निर्णय उद्यापासून अंमलात येणार आहे.

एमआरपीवर शासनाने ७०% ‘स्पेशल कोरोना टॅक्स’ लादला आहे
दिल्ली सरकारने सोमवारी ‘स्पेशल कोरोना टॅक्स’ नावाने दारूवर नवीन कर जाहीर केला आहे.त्यामुळे मंगळवारपासून दिल्लीत मद्य महाग होईल.दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार आता दिल्लीत दारूच्या एमआरपीवर ७०% कर आकारला जाईल. हा कर फक्त एमआरपीवर लागू होईल. म्हणजेच पाचशेमध्ये मिळणारी दारूची बाटली ही आता ८५० रुपयांना मिळेल.

 

दिल्लीत सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा उडाला
दिल्लीत सुमारे ४० हून अधिक दिवसांनी, सोमवारी दारूची दुकाने उघडली गेली आणि दुकांना बाहेर झालेल्या मोठ्या गर्दीमुळे त्यांना बंद करावे लागले कारण दुकानाबाहेर जमा झालेले लोक सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत नव्हते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज काही दुकानांबाहेर अनागोंदी पाहायला मिळाली हे आपले दुर्दैव आहे.आम्हाला शारीरिक अंतर आणि इतर नियमांचे उल्लंघन याबद्दल माहिती मिळाली तर त्या भागाला सील करावे लागेल आणि त्याठिकाणी सूट मागे घेतली जाईल.दुकान मालकांना ही जबाबदारी घ्यावी लागेल की एखाद्या दुकानात शारीरिक अंतराचे उल्लंघन केल्यास दुकाने बंद केली जाईल.मी दिल्लीच्या लोकांना असे आवाहन करतो की बाहेर जाताना मास्क घालावे,शारीरिक अंतर पाळावे आणि आपले हात धुवावेत.

दारूची दुकाने उघडण्याची वेळ वाढली
तत्पूर्वी, दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहून म्हटले होते की पोलिसं दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देत ​​नाही आहेत, कारण पोलिसांना दुकाने बंद ठेवण्यास सांगितले गेले आहे.दिल्ली सरकारच्या चार कॉरपोरेशनना दारू विक्रीस परवानगी देण्यात यावी, अशा सूचना फिल्डवरील पोलिसांना देण्यात याव्यात.सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०६:३० या वेळेत ही दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी.

Special corona fee': Delhi govt to charge 70% tax on liquor from ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी केलीय? विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करा

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या व नौकरीस इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करावे. असे आवाहन परभणीचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

नौकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नांव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा, सुविधा www.mahaswayam.gov.in या ऑनलाईन पध्दतीने संकेतस्थळाच्या माध्यमातुन देण्यात येत आहेत. राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी इच्छुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणुन सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता वाढ करणे , पत्ता , संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळया उद्योजकांनी वेळोवेळी अधिसुचीत केलेली रिक्त पदांची माहिती मिळवुन त्यासाठी उमेदवारांचा अर्ज सादर करणे अधिकबाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.

उद्योजकांच्या मागणीनुसार उमेदवारांचा याद्यामध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधार लिंक असणे आवश्यक आहे. अनेक बाबींचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीस आधारकार्ड जोडणी करणे गरजेचे आहे. असेही सहाय्यक आयुक्त , कौशल्य विकास , रोजगार व उदयोजकता , मार्गदर्शन केंद्र , परभणी यांनी कळविले आहे.