Monday, December 22, 2025
Home Blog Page 5845

दारूच्या दुकानाबाहेर तळीरामांची तौबा गर्दी! आनंद गगनात मावेना

मुंबई । राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी दारुची दुकाने सुरू करण्यास सरकारने परवानगी दिल्यानंतर तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून घशाला कोरड पडलेल्या तहानलेल्या या तळीरामांनी आज सकाळी सकाळीच वाईन शॉपची दुकाने गाठली. वाईन खरेदीसाठी सर्वात आधी आपला नंबर लागावा म्हणून अनेकांनी थेट दुचाकीवरून वाईनशॉप गाठले. त्यामुळे ठिकठिकाणी वाईन शॉपबाहेर तुफान गर्दी होऊन वाहतुकीची कोंडीही झाल्याने पोलिसांना दंडुक्याच्या प्रसादाचे वाटप सुद्धा करावं लागत आहे.

राज्यात रेड झोनमधील कंटेन्मेंट परिसर वगळता इतर ठिकाणी दारू विक्रीस परवानगी देण्यात आल्याने आज मुंबई, पुणे ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तळीरामांनी दारू विकत घेण्यासाठी दारुच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी दारुच्या दुकानाबाहेर मंडप टाकण्यात आले होते. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून लोकांना उभं राहण्यासाठी दुकानाबाहेर ठरावीक अंतरावर गोल रिंगण करण्यात आलं होतं. या रिंगणात उभे राहिलेल्यांनाच दारूच्या बाटल्या दिल्या जात होत्या. अनेक ठिकाणी तर तळीरामांनी स्वत:च सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दारूच्या बाटल्या विकत घेतल्या. काही ठिकाणी तर पोलिसांना बळाचा वापर करत नियमांची अंमलबजावणी करावी लागत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राहुल देव बनला पाकिस्तान हवाई दलातील पहिला हिंदू पायलट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच, हिंदू युवकाला हवाई दलात पायलट म्हणून निवडण्यात आले आहे.राहुल देव नावाच्या या युवकाची पाकिस्तानी हवाई दलात जीडी (जनरल ड्यूटी) पायलट अधिकारी म्हणून भरती झाली आहे.पाकिस्तानी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. राहुल देव हा सिंध प्रांतातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या थारपारकर मधील आहे. पाकिस्तानमधील थारपारकर हे असे स्थान आहे जेथे मोठ्या संख्येने हिंदू समुदाय राहतात.या विकास-वंचित भागातील राहुल हा पाकिस्तान हवाई दलात पोहोचणारा पहिला हिंदू आहे.

राहुल देव बने...- India TV

अखिल पाकिस्तान हिंदू पंचायत सचिव रवी दवानी यांनी राहुलच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.ते म्हणाले की,या अल्पसंख्याक समाजातील बरेच सदस्य नागरी सेवेत तसेच सेनेच्या इतर भागातही सेवा बजावत आहेत. देशातील अनेक बडे डॉक्टर,हे विशेषत: हिंदू समुदायाचे आहेत. ते म्हणाले की, सरकारने या अल्पसंख्याकांवर लक्ष केंद्रित केले तर आगामी काळात असे बरेच राहुल देव देशाची सेवा करण्यास तयार असतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

किम जोंग समोर येताच उत्तर कोरियाच्या सैनिकांकडून सीमेवर गोळीबार,दक्षिण कोरियानेही दिले प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या ३ आठवड्यांपासून कोरियन प्रायद्वीपात शांतता होती आणि लोकांचे सगळे लक्ष फक्त किम जोंग उनकडेच होते.उत्तर कोरियाचा हुकूमशहा असलेल्या किम जोंग याच्या आरोग्याबद्दल जगभरातील लोक अनेक अनुमान लावत होते.मात्र,शनिवारी सुमारे २० दिवसांनंतर तो प्रथमच सार्वजनिक ठिकाणी दिसून आला आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे रविवारी उत्तर कोरियाच्या सैन्याने साऊथ कोरियाच्यासीमेवर गोळीबार केला.मिळालेल्या वृत्तानुसार दक्षिण कोरियाच्या सैनिकांनीही उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या या कारवाईवर पलटवार केला.

दोन्ही देशांकडून तणावपूर्ण गोळीबार
दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ यांनी म्हटले आहे की त्यांच्या आणि उत्तर कोरियाच्या सैनिकांमध्ये सीमेवर तणावपूर्ण गोळीबार झाला आहे. त्यांनी सोलमध्ये सांगितले की रविवारी स्थानिक वेळेनुसार रात्री ०७:४१ वाजता उत्तर कोरियाच्या सैन्याने दक्षिण कोरियाच्या सीमा रक्षणाच्या चौकीवर गोळीबार केला. लष्कराने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, उत्तर देताना चेतावणी देण्यासाठी दक्षिण कोरियाने २ फेऱ्या उडावल्या. निवेदनात असेही म्हटले आहे की या गोळीबारात दक्षिण कोरियामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मात्र,उत्तर कोरियाच्या सैन्याने गोळीबार का केला हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाहीये.

Kim Jong-un returns to 'thunderous cheers at North Korean factory ...

किम जोंग उनला २० दिवसांनंतर पाहिले गेले
उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उन याला शनिवारी,२० दिवसांनंतर सार्वजनिकरित्या पहिले गेले आणि त्याने आपल्या आरोग्याशी संबंधित चाललेल्या सर्व तर्कवितर्कांना आळा घातला. त्याच्या एक दिवसाने रविवारी सीमेवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.किमचे प्रथमच सार्वजनिकरित्या प्योंगयांगजवळील एका खताच्या कारखान्याचे उद्घाटन झाले तिथे दिसून आला.तथापि,त्याची पुढची भेट उत्तर कोरियाच्या ‘अ‍ॅम्यूनेशन फॅक्टरी’ येथे झाली त्यानंतर जगाचे लक्ष पुन्हा तिकडे लागून रहिले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना हाहाकार ! औरंगाबादेत कोरोनाचा दहावा बळी

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील बीड बायपास रोडवरील देवळाई परिसरातील कोरोना बाधित असलेल्या 55 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा जिल्ह्यातील कोरोनाचा हा १० वा बळी आहे. या घटनेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या या रुग्णाचा रविवारी रात्री 11 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. तीन दिवसांपासून रुग्णास खोकला, चक्कर येने असा त्रास होत होता. अतिशय गंभीर स्थितीत त्यांना घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे ऑक्स‍िजनचे प्रमाण केवळ 54 टक्के होते. अतिदक्षता ‍विभागात त्यांच्यावर कृत्रिम श्वास व कोविड संबंधी उपचार सुरू होते. त्यांना दोन्ही फुफ्फुसांचा न्यूमोनिआ, मधुमेहाचा आजार होता, असेही डॉ. येळीकर यांनी सांगितले.

दरम्यान, सोमवारी सकाळी नऊ कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढल्याने आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 291 झाली आहे. संबंधित नवे कोरोनाबाधित रुग्ण पंचशील दरवाजा, किलेअर्क (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), देवळाई (1),  पुंडलिक नगर (2), नंदनवन कॉलनी (1), जय भीमनगर (3) या परिसरातील आहेत. असेही डॉ. येळीकर यांनी सांगितले.

Jioचे अच्छे दिन! अमेरिकेतील ‘सिल्वर लेक’ कंपनीची तब्बल 5 हजार 656 कोटींची गुंतवणूक

मुंबई । दोनच आठवड्यांपूर्वी जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यानंतर आता रिलायन्स ग्रुपचे सेर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी अजून एका कराराची घोषणा केली आहे. हा करार जिओ प्लॅटफॉर्म्स आणि अमेरिकेची खासगी इक्विटी कंपनी सिल्वर लेक यांच्यात झाला आहे. करारानुसार तब्बल 5 हजार 656 कोटी रुपयांची गुंतवणूक सिल्वर लेक कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्मसकडून आज याबाबत माहिती देण्यात आली.

सिल्वर लेक फर्मची जगातील मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांसोबत भागीदारीचा शानदार रेकॉर्ड राहिलाय. टेक्नॉलॉजी आणि फायनान्समध्ये सिल्वर लेक कंपनी लोकप्रिय आहे. सिल्वर लेक टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीत ग्लोबल लीडर आहे. यापूर्वी सिल्वर लेकने अलीबाबा ग्रुप, एअरबीएनबी, डेल टेक्नॉलॉजी, अँट फायनान्शियल , अल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटर यांसारख्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. कमालीची बाब म्हणजे केवळ १ टक्के हिस्सेदारीसाठी सिल्वर लेकने जिओमध्ये तब्बल 5 हजार 656 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीये. या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्यू 4.90 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइज व्हॅल्यू 5.15 लाख कोटी झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.

रेल्वे मंत्रालयाचा यु-टर्न! मजुरांकडून तिकिटाचे पैसे आकारलेच नाहीत

नवी दिल्ली । काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत घरी परतणाऱ्या श्रमिकांचा रेल्वे खर्च उलचलण्याची तयारी दाखवल्यानंतर रेल्वे मंत्रालयावर स्पष्टीकरण देण्याची नामुष्की ओढवली. भारतीय रेल्वे नाही मजुरांकडून नाही तर राज्य सरकारकडून पैसे वसूल करत असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयानं केला. गरीब आणि असहाय्य मजुरांकडून आपल्या घरी परतण्यासाठी केंद्र सरकार तिकीट खर्च वसूल करत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं मोदी सरकारवर टीका करण्यात आली. इतकंच नाही तर घरी परतणाऱ्या मजुरांचा रेल्वे तिकीटाचा खर्च काँग्रेसकडून करण्यात येईल, असं सोनिया गांधींनी जाहीर केलं. यांनतर रेल्वे मंत्रालयाने सरकारकडून तत्काळ प्रतिक्रिया देत रेल्वे थेट मजुरांकडून तिकीटाचे पैसे घेतच नसल्याचा दावा केला. शिवाय या तिकीटाचा खर्च राज्य सरकारकडून करत असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं.

दरम्यान, कमालीची बाब म्हणजे ‘श्रमिक रेल्वे’साठी रेल्वे मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या दिशा-निर्देशानुसार, या विशेष रेल्वेच्या तिकीटांची जेवढी मागणी राज्य सरकारकडून केली जाईल, तेवढीच तिकीटं छापण्यात येतील. राज्य सरकार ही तिकीटं प्रवाशांना सोपवतील आणि तिकीटाचे पैसे वसूल करून (collect ticket fare) ही रक्कम रेल्वेकडे सोपवतील, असं म्हटलं गेलं होतं. आता, मात्र रेल्वेनं घुमजाव करत रेल्वे थेट मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतलेच नसल्याचा दावा केला. ‘प्रवासी मजुरांना रेल्वे थेट तिकीट विक्री करत नाही. याची वसुली राज्य सरकारकडून केली जाते आणि तेही केवळ एकूण खर्चाच्या १५ टक्के असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. राज्यांच्या यादीनुसारच नागरिकांना प्रवासाची परवागी देण्यात येते असही रेल्वे म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

अबब! भुकेल्या अजगाराने गिळून टाकलं संपुर्ण हरिण; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या एका अजगरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.ज्यामध्ये त्याने एका हरणाला अतिशय निर्दयतेने गिळंकृत केले आहे.हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील दुधवा नॅशनल पार्कमधील आहे. हा व्हिडिओ मागील वर्षातील आहे,पण आयएफएस अधिकारी परवीन कसवान यांनी नुकताच दोन दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतरचा पुन्हा एकदा तो व्हायरल झाला.

नॅशनल जिओग्राफिकच्या मते,बर्मीज अजगर पृथ्वीवरील सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे.ते त्यांच्या शिकारीला तोपर्यंत सोडत नाहीत जोपर्यंत त्यांचा गुदमरुन जीव जात नाही.त्यांच्या जबड्यांचा आकार असतो की ते अगदी सहजपणे त्यांची शिकार पूर्णपणे गिळून टाकु शकतील.

कसवान यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की या बर्मीज अजगराने एक हरिण कसे पकडले आहे आणि ते गिळत आहे. दुधवा नॅशनल पार्कमध्ये मागील वर्षी हा व्हिडिओ वाईडलेन्स इंडियाने शूट केला होता.

 

कसवान यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ते दृश्य अविश्वसनीय आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यापासून २२,००० पेक्षा जास्त वेळा पाहिला गेलेला आहे.युझर्सनी बर्‍याच कमेंट तसेच प्रश्नेही विचारली आहेत.

एका युझरने विचारले होते की ते अजगराचे शिंग कसे काढू शकतो, ज्याला वाइल्डलेनने उत्तर दिले,अजगर शिंगेही पचविण्यास सक्षम असतात आणि ते बर्‍याचदा हरिणांची शिकार करतात.

गेल्या वर्षी गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील एका घराच्या मागील अंगणात नऊ फूट लांबीच्या अजगराने एक मांजराला गिळले होते आणि नंतर तिला बाहेरही काढले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

सोनिया गांधींची घोषणा! काँग्रेस उचलणार मजुरांचा तिकीट खर्च

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देशात विविध भागांत लाखो मजूर अडकून पडले. लॉकदौंमुळे काम बंद आणि घरी जाण्यासाठी कुठलंही प्रवासाचं साधन नाही. अशा कात्रीत अडकलेल्या मजुरांसाठी आता 40 दिवसांनी विशेष रेल्वेची व्यवस्था केंद्राकडून करण्यात आली. मात्र, आधीच लॉकडाऊनचे चटके सोसत असलेल्या या मजुरांना ‘श्रमिक स्पेशल’ रेल्वेचा खर्च भरावा, असे निर्देश मोदी सरकारकडून देण्यात आले आहेत. यावर विरोधकांसोबत अनेकांकडून चांगलीच टीका होत आहे. श्रीमंतांचा प्रवास मोफत मात्र गरीबांकडून प्रवासासाठी पैसे वसूल करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारवर काँग्रेसने कडाडून टीका केली आहे. सोबतच, वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या मजुरांच्या घरी परतण्यासाठीचा रेल्वे तिकिटाचा खर्च काँग्रेस करणार असल्याचं सोनिया गांधींनी जाहीर केलं.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी सोशल मीडियावर मजुरांच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचं जाहीर केलं. सोबतच केंद्रातील मोदी सरकारला खडे बोल सुनावले. ‘परदेशात अडकलेल्या भारतीयांना मोफत मायदेशात आणण्यात आलं पण गरीब कामगारांकडून मात्र तिकीटाचे पैसे वसूल केले जात आहेत. अशावेळी काँग्रेस कमेटीनं प्रत्येक गरजवंत श्रमिक आणि कामगाराचा घरी परतण्याचा रेल्वे खर्च स्वत:हून उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील’ काँग्रेसच्या ट्विटर हॅन्डलरवर जाहीर करण्यात आलेल्या सोनिया गांधींच्या वक्तव्यात म्हटलं गेलं आहे.

‘श्रमिक आणि कामगार हा देशाचा कणा आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यागामुळेच देशाचा पाया रचला गेलाय. केवळ चार तासांच्या नोटीसवर लॉकडाऊन सुरू झाल्यानं लाखो श्रमिक आणि कामगार आपल्या घरी परतू शकले नाहीत. १९४७ च्या विभाजनानंतर देशात पहिल्यांदाच अशी हृदयद्रावक परिस्थिती पाहायला मिळाली, जिथं हजारो श्रमिक आणि कामगारांवर शेकडो किलोमीटर पायीच आपल्या घरी परतण्याची वेळ आली. त्यांच्याकडे ना धान्य, ना पैसा, ना औषध, ना साधनं, पण केवळ आपल्या कुटुंबात परण्याची आस… त्यांची व्यथा विचार करूनच मनाला कापरं भरतं, आणि त्यांचा दृढ निश्चय आणि संकल्प प्रत्येक भारतीयाला कौतुकास्पद वाटतो. पण देशाचं आणि सरकारचं कर्तव्य काय आहे? आजही लाखो श्रमिकांना आणि कामगारांना संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून आपल्या घरी परतायचंय, पण साधनंही नाहीत आणि पैसेही…’ असं म्हणताना सोनिया गांधी यांनी गरीबांबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अ‍ॅलिस पेरी मुरली विजयसोबत डिनर डेटवर जाण्यासाठी तयार,मात्र ठेवली ‘ही’ अट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडेच भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजयने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अ‍ॅलिस पेरीबरोबर डिनर डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.वास्तविक, चेन्नई सुपर किंग्जच्या इन्स्टाग्राम पेजवरील लाईव्ह सेशन दरम्यान त्याला विचारण्यात आले होते की लॉकडाऊन संपल्यानंतर कोणत्या दोन क्रिकेटपटूंबरोबर तुला डिनरला जायला आवडेल.भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनसह मुरली विजयने या अ‍ॅलिस पेरीची निवड केली.

मुरली विजय म्हणालाकी,”मला अ‍ॅलिस पेरीबरोबर डिनर करायला आवडेल. ती खूपच सुंदर आहे. आणि शिखर धवनबरोबर कधीही.तो खूप मजेदार आहे.तो हिंदीत बोलेल आणि मी तामिळमध्ये.”

मुरली विजयच्या या प्रस्ताव स्वीकारत अ‍ॅलिस पेरीने त्याला डिनरवर जाण्यासाठी एक मजेशीर अट घातली आणि सांगितले की पैसे विजय देईल.

Ellyse Perry and Shikhar Dhawan: Murali Vijay says he wants to ...

 

यावर सोनी सपोर्ट्सवरून इन्स्टाग्रामवर लाइव्ह चॅट दरम्यान उत्तर देताना पेरी म्हणाली,”मला आशा आहे की तो पैसे देईल.त्याचे कर्तव्य असेल.मी खूप आनंदी आहे.”

उल्लेखनीय म्हणजे एलिस पेरीने म्हटले आहे की जगभरातील कोविड -१९ या साथीचा हाहाकार पाहिल्यानंतर त्याचा महिला क्रिकेटवर फारसा परिणाम होणार नाही. अशी शक्यता आहे की कोरोनाला रोखल्यानंतर,खेळांच्या संचालक संस्था कमी स्पर्धात्मक महिला सामन्यांपेक्षा पुरुषांच्या स्पर्धेला प्राधान्य देतील.

Ellyse Perry wallpaper by Rajpoot99 - 1b - Free on ZEDGE™

कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत.कोरोनामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियासारख्या मंडळालाही आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे मंडळाला केवळ त्यांच्या कर्मचार्‍यांच्या पगारावरच नव्हे तर बर्‍याच जणांचीही कपात करावी लागली आहे.मात्र,पेरीचा असा विश्वास आहे की ऑपरेटिंग संस्थांना महसूल वाढविण्यासाठी नक्कीच काहीतरी नवीन मार्ग सापडतील.

ती म्हणाली, “खेळात मुळातच सर्वाना सावरण्याची क्षमता असते आणि मला त्यात दीर्घकाळ टिकणारा नकारात्मक प्रभाव दिसत नाही.” पेरी म्हणाली, “यामुळे संस्थांनी नक्कीच पुन्हा विचार करायला लावले असेल की ते त्यांचे खेळ कसे चालवतील.परंतु ही वाईट गोष्ट नाही. महिलांच्या खेळावर याचा परिणाम होईल असे मला तरी वाटत नाही. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशभरात मागील २४ तासांत 72 जण कोरोनाचे बळ, कोरोनाग्रस्तांची संख्या ४२ हजार पार

नवी दिल्ली । भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर टाकत आहे. मागील चोवीस २४ देशभरात कोरोनामुळे 72 जणांचा मृत्यू झाला असून 2 हजार 553 नवे रुग्ण आढळले आहेत. या नवीन रुग्णांनंतर देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 42 हजार 553 वर पोहचली असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे देशभरातील एकूण 42 हजार 553 करोनाबाधित रुग्णांपैकी 11 हजार 707 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यं 1 हजार 373 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला असला तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहनही करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कालच करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन वाढवण्यात आल्याची घोषणा केली. आणखी दोन आठवडे म्हणजेच १७ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन कायम असणार आहे. त्यानंतर काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”