Monday, December 22, 2025
Home Blog Page 5846

टीम इंडियाचा प्रशिक्षक बनायला आवडेल-शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशां दरम्यान क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये.अशा परिस्थितीत केवळ आयसीसीच्या स्पर्धेतच हे दोन्हीही संघ एकमेकांविरूद्ध खेळताना दिसतात.मात्र पाकिस्तानने भारताविरुद्ध मालिका खेळवण्याची अनेकदा मागणी केली आहे,परंतु त्यांच्या या मागणीला बीसीसीआय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय सहमती देणार नाही.

अलीकडेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने कोविड -१९ च्या लढाईसाठी पैसे उभे करण्यासाठी भारत-पाक मध्ये मालिका खेळविण्याविषयी बोलले होते, ज्यावर त्याला अनेक माजी भारतीय खेळाडूंकडून तीव्र प्रतिक्रियेचा सामना करावा लागला. आता याच अख्तरने टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Shoaib Akhtar - Wikipedia

होय, अलीकडेच सोशल मीडिया अ‍ॅप ‘हॅलो’ वर आपल्या चाहत्यांची संवाद साधताना शोएब अख्तर म्हणाला की, जर त्याला कोचिंगची संधी मिळाली तर तो टीम इंडिया आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये त्याच्या आधीच्या टीम कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) प्रशिक्षक व्हायला आवडेल.

त्याचबरोबर अख्तर म्हणतो की जर त्याची बायोपिक बनली तर त्याचे पात्र बॉलिवूडमधील दबंग सलमान खानने भूमिका साकारली पाहिजे.अख्तर पुढे म्हणाला की, “कधीही माझी बायोपिक बनली तर त्यात सलमान खानने मुख्य भूमिका करावी अशी मला इच्छा आहे.”

हार्दिक पांड्याबद्दल बोलताना अख्तर म्हणाला की तो जगातील एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होऊ शकतो. यासोबतच त्याने हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांचे सर्वोत्तम मित्र म्हणून वर्णन केले आहे.

Thanks for the love: Shoaib Akhtar after Sunil Gavaskar lauds his ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कराड तालुक्यात २ नवे कोरोनाग्रस्त, जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या ७९ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या 2 नागरिकांचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यात 68 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 9 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 79 बाधित रुग्ण आढळले आहेत.

कराड तालुक्यात कोरोना कसा फोफावला? जाणून घ्या पहिल्या रुग्णापासून आजच्या ५७ पर्यंतचा पूर्ण प्रवास

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 5, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 152, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 9 असे एकूण 171 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५९ पोहोचली आहे. कराड हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मराठी भाषेच्या विकासासाठी MKCL चं ‘आय.टी.त मराठी’ अॅप

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | १ मे २०२० म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षाची सुरुवात. गेल्या ६० वर्षांत आपले राज्य आणि आपली मराठी भाषा दोन्हीची परिस्थिती बदलली आहे. आज मोबाईल, इंटरनेट आणि कंप्यूटर म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाशिवाय दैनंदिन कामे जवळ जवळ अशक्य आहेत, हे आपण अनुभवतो आहोत. अनेक प्रकारच्या डिजिटल उपकरणांवर मराठी भाषा वापरण्याचे प्रमाणही वाढत आहे. नागरिकांना मातृभाषेतून तंत्रज्ञान वापरता आल्यामुळे आता उच्च शिक्षित-टेक्नोसॅव्ही आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील डिजिटल दरी कमी होऊन वेळ-पैसे तर वाचतच आहेत आणि नवीन संधीही मिळत आहेत. ज्ञानाची देवाण-घेवाण माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेतून व्हावी, तसेच इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी भाषेतून उपलब्ध व्हावे, या करिता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) प्रयत्नशील आहे. त्यासाठी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून MKCL तर्फे ‘आय.टी.त मराठी’ या अभिनव अॅपची निर्मिती केली गेली आहे. जागतिकीकरणाच्या या जमान्यात मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी, विकासासाठी, समृद्धीसाठी, अस्मितेसाठी आणि उन्नतीसाठी ‘आय.टी.त मराठी’ हे अॅप सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

MKCL चं नवीन मोबाईल ऍप्लिकेशन

सध्याच्या परिस्थितीत जगावर म्हणजेच प्रत्येक माणसावर कोरोना व्हायरसमुळे महा भयंकर असे संकट ओढवले आहे, त्यामुळे घरी राहून आय.टी. तंत्रज्ञानाचा वापर हा महत्त्वाचाच ठरत आहे, हे नक्की. थोडक्यात आय.टी. तंत्रज्ञान हे जनसामान्यांच्या हातचे साधन बनले आहे. तरी केवळ भाषेची अडसर या कारणामुळे कोणी यात मागे पडू नये. संगणकावर व स्मार्टफोनवर मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी ‘आय.टी.त मराठी’ या अॅपची खूप मदत होऊ शकते.

‘आय.टी.त मराठी’ या अॅपमधील ठळक उपक्रम :
१. गुगलचा वापर करून माहिती शोधणे व मराठी टायपिंग करायला शिकणे.
२. टंकलेखनापेक्षा मोबाईलवर मराठीत बोलून संदेश लिहिणे – Voice Typing
३. मराठीतून इतर कोणत्याही भाषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे – Translate
४. मराठीतून ई-लर्निंगसाठी वेगवेगळ्या अॅप आणि वेब साईटचा वापर.
५. मराठीतून दैनंदिन जीवन आणि व्यवस्थापन यासाठी वेगवेगळ्या अॅप आणि वेब साईटचा वापर.
६. मराठी वर्तमानपत्र ऑनलाईन वाचणे, सोशल मीडियावर मराठी वापरणे, मराठी भाषकांसाठी विविध उपयुक्त अॅप्स, मराठी ऑडियो बुक्स, मराठी कवितासंग्रह, मराठी शब्दकोश, इ.

विविध आयटी सुविधा, टूल्स व अॅप्स आपण मराठी भाषेतून वापरली तरच जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषा जगात ऐटीत राहू शकेल, म्हणून ‘जर ‘आयटी त मराठी (तरच) ऐटीत मराठी’!

MKCL चा अभिनव उपक्रम

www.mkcl.org/itmarathi या लिंकवरून तुम्ही हे अॅप डाऊनलोड करू शकता किंवा आय.टी.त मराठी’ असे टाईप करून हे अॅप गुगल प्ले-स्टोअरवरून विनामूल्य डाऊनलोड करू शकता. तसेच www.mkcl.org/marathi या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला याचा लाभ ऑनलाईनही घेता येईल.

उत्तराखंडच्या दुर्गम भागात कोरोनाशी लढतेय ‘मऱ्हाटमोळी डॉक्टर’

चंपावत (उत्तराखंड) | कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आपण सगळेच एकंदरीत त्रासलो आहोत. महिना होऊन गेला सगळे खुराड्यात कोंडल्यासरखे झालेत. परंतू एक डॉक्टर असल्याने माझ्या डॉक्टरी कर्तव्याच्या पूर्ततेसाठी म्हणून मी भ्रमंतीवर आहे.

प्रथम उत्तराखंडविषयी सांगेन. एक तर हा भाग तसा जरा तुटून आहे भारताच्या इतर राज्यांपासून, याचं विशेष कारण म्हणजे इथली भौगोलिक परिस्थिती आणि हवामान. संपूर्णतः डोंगराळ असल्याने वाहतूक मुळात खूप कमी आणि गैरसोयीची आहे. आधीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फार सक्षम नाही आणि त्यातल्या त्यात गावं दूर-दूर आणि दुर्गम. लोकसंख्येची घनता सुध्दा कमी. पण जितका मानवी हस्तक्षेप कमी, तितकंच या जागेचं सौंदर्य मात्र विलक्षण आहे.

या भौगोलिक परिस्थितीचा तोटा म्हणजे गोष्टी लोकांपर्यंत पोहचवणं हे जणू एक आव्हानच आहे. कोविड-१९ च्या संबंधी लोकांमध्ये जागृती आणि या साथरोगाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने आम्ही या विषयावर कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण सत्रे घेत आहोत. या अनुषंगाने खूप वेगवगळ्या भागात माझा प्रवास होतोय. यामुळे खूप समृद्ध असा अनुभव यातून येतोय. म्हणजे अगदी मूलभूत गोष्टींपासून ते अगदी वैश्विक पातळीवरचे विचार आणि परस्पसंबंध ग्रामीण लोक कसे स्थापन करतात याचं दर्शन होतंय. त्यांचे विचार आणि संकल्पना यांची पुरती कल्पना येतेय.

कोरोनाशी लढण्यासाठी म्हणून इथल्या प्रशासनाची विशेष अशी वेगळी तयारी नाही, पण जागरूकता मात्र आहे. विभागातील विविध खाजगी संस्थांशी प्रशासनाने संपर्क साधून कुठल्या प्रकारचे सहकार्य त्या करू शकतील याची नोंद करून ठेवली आहे, ज्या संस्था या वेळेतही कार्यरत आहेत त्यांचा उपयोग वंचित घटकांची माहिती मिळवण्यासाठी करत आहेत. याउलट परिस्थिती मात्र शहरांपासून लांब असलेल्या गावांमध्ये बघायला मिळतेय. दुर्गम व पर्वतीय भागातील ज्या लोकांवर कोरोनाच्या कामाची जबाबदारी प्रशासनाने सोपवली आहे त्यांचं प्रशिक्षण, आजाराबाबतीतलं ज्ञान, स्वतःच्या सुरक्षेसाठी घ्यावयाची दक्षता, जनजागृतीमध्ये त्यांची काय भूमिका आहे, याबद्दल त्यांना कितपत माहिती आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं. त्यांच्या भेटीतून कळून आलं की त्यांना या आजराबाबतीत पुरेशी कल्पना नाही आणि त्यासाठी काय सावधानी बाळगावी हेही त्यांना माहीत नाही. कोरोना नाव सर्वांनी ऐकलंय पण आजार नेमका काय आहे, कसा पसरतो, त्याचे काय काय दुष्परिणाम आहेत, बचावाचे आणि प्रतिबंधाचे उपाय काय आहेत, हातांची स्वच्छता ठेवायची पण ती कशी आणि का, मास्क लावायचा हे माहीत; पण तो कोणी वापरावा आणि कोणी वापरू नये, कसा आणि का लावावा, तो लावलेला असताना काय करावं आणि काय करू नये, त्याचं निर्जंतुकीकरण कसं करावं किंवा विल्हेवाट कशी लावावी याबद्दल या कार्यकर्त्यांना शून्य माहिती आहे. त्यांनी गावात कामासाठी जाताना स्वसुरक्षेसाठी काय काळजी घ्यावी, काय माहिती लोकांना द्यावी, त्यांच्याशी काय व कसं बोलावं हे सगळं त्यांना माहित नव्हतं.

प्रशासनाचा सहभाग म्हणलं तर फक्त एका WhatsApp ग्रुप एवढाच मर्यादित आहे. माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे की नाही किंवा ते त्या माहितीचा अर्थ काय लावताय या बाबत प्रशासन अतिशय निष्काळजी आणि निष्क्रिय दिसते आहे.
गावं इतकी दुर्गम आहेत की तिथवर इंटरनेटची रेंज अजूनही बऱ्याच ठिकाणी नाहीये. त्यांच्याशी बोलताना एक मात्र प्रकर्षानं जाणवलं. बातम्यांचा विशेष प्रभाव साऱ्या ग्रामीण जनतेवर आहे. मग बातमीचा स्त्रोत काय, ती कितपत खरी किंवा मनण्यायोग्य आहे याची पडताळणी तर होत नाहीच याउलट तिचा प्रसार मात्र प्रचंड वेगाने होतो. आणि या बातम्यांद्वारे अफवाही पसरत आहेत. या ग्रामीण दुर्गम भागात अजून कोरोना पोचला नाही पण जर ती या भागात पसरला तर इथली कमकुवत आरोग्यव्यवस्था पाहता त्याचा मुकाबला करणे कठीण दिसत आहे.

डॉ. निशिगंधा महाजन
(लेखिका होमिओपॅथी डॉक्टर असून उत्तराखंडमध्ये एका एनजीओसोबत काम करत आहेत)

खाद्यतेलासाठी फिरणाऱ्या आजीला भेटली खाकीतील माणुसकी

कराड प्रतिनिधी |  सकलेन मुलाणी

पेट्रोलिंग करत असताना एका पोलिसाला रस्त्यात आज्जीबाई भेटल्या. कुठे चाललाय म्हणून विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, घरात आठ दिवसापासून गोडेतेल नाही. त्या पोलिसाने त्यांना दुसऱ्या दिवशी विजय दिवस चौकात बोलावून गोडेतेलाची पिशवी दिली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि खाकीतल्या माणुसकीचे दर्शनही घडले.

कराडमध्ये कोरोनाचा कहर झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या पन्नाशीपार गेली आहे. त्यामुळे कराड, मलकापूरसह आसपासची गावे पुर्णत: बंद आहेत. लॉकडाऊनमधील बंदोबस्तावेळी शिवाजी हौसिंग सोसायटीत पेट्रोलिंग करताना कराड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार मारूती चव्हाण यांना रस्त्यात भेटलेल्या आज्जीने घरातील परिस्थिती सांगताच त्यांच्या मनात कालवाकालव झाली. त्यांनी त्या आज्जीला दुसऱ्या दिवशी सकाळी विजय दिवस चौकातील पोलीस चौकीजवळ यायला सांगितले.

सकाळी एक दुकानदार शटर बंद करुन यादीप्रमाणे साहित्य बांधत होता. त्याला गोडेतेलाची पिशवी मागितली. पिशवीची किंमत होती १०० रूपये. हवालदार चव्हाण यांच्या खिशात ६० रूपये होते. त्याचवेळी तेथून निघालेल्या हवालदार खराडे यांच्याकडून बाकीचे पैसे मागून घेतले. गोडेतेलाची पिशवी विकत घेतली. सकाळी  १० वाजता ती आज्जी चौकात आली. हवालदार चव्हाण यांनी गोडेतेलाची पिशवी त्यांना दिली. त्यावेळी त्या आज्जीच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी पोलीस आहे म्हणून त्या आज्जीला मला मदत करता आली.

गोडेतेलाची पिशवी केवळ १०० रूपयांची होती, पण तिच्या चेहऱ्यावरील समाधान लाखमोलाचे होते, अशी प्रतिक्रिया हवालदार मारूती चव्हाण यांनी व्यक्त केली. आपल्या कर्मचाऱ्याने एका वृद्ध महिलेला केलेल्या मदतीबद्दल वरिष्ठांना समजताच पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी हवालदार चव्हाण यांचे कौतुक केले.

राज्यात दिवसभरात ६७८ नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजार ९७४

मुंबई । आज दिवसभरात राज्यात ६७८ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२ हजार ९७४ वर पोहोचली आहे. आज दिवसभरात ११५ कोरोनारुग्ण बरे झाले आहेत. तर २४ तासात २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आत्तापर्यंत राज्यात ५४८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण २११५ रुग्ण करोना आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण १० हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७० हजार १३९ नमुन्यांपैकी १ लाख ५६ हजार ७८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत; तर १२ हजार ९७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ८१ हजार ३८२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३ हजार १५८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महापालिका: ८८०० (३४३)
ठाणे: ६० (२)
ठाणे मनपा: ४८८ (७)
नवी मुंबई मनपा: २१६ (४)
कल्याण- डोंबिवली मनपा: २१२ (३)
उल्हासनगर मनपा: ४
भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा भाईंदर मनपा: १४१ (२)
पालघर: ४४ (१)
वसई- विरार मनपा: १५२ (४)
रायगड: ३० (१)
पनवेल मनपा: ५५ (२)
ठाणे मंडळ एकूण: १०,२२३ (३७१)

नाशिक: १२
नाशिक मनपा: ४३
मालेगाव मनपा: २२९ (१२)
अहमदनगर: २७ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २० (१)
जळगाव: ३४ (११)
जळगाव मनपा: १२ (१)
नंदूरबार: १२ (१)
नाशिक मंडळ एकूण: ४१३ (३०)

पुणे: ८१ (४)
पुणे मनपा: १२४३ (९९)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ७
सोलापूर मनपा: १०९ (६)
सातारा: ३७ (२)
पुणे मंडळ एकूण: १५४९ (११४)

कोल्हापूर: १०
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: २९
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्ग: ३ (१),
रत्नागिरी: ११ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ६१ (३)

औरंगाबाद: ५
औरंगाबाद मनपा: २३९ (९)
जालना: ८
हिंगोली: ४२
परभणी: १ (१)
परभणी मनपा: २
औरंगाबाद मंडळ एकूण: २९७ (१०)

लातूर: १२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ३१ (१)
लातूर मंडळ एकूण: ४७ (२)

अकोला: १२ (१)
अकोला मनपा: ५०
अमरावती: ३ (१)
अमरावती मनपा: ३१ (९)
यवतमाळ: ७९
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: २
अकोला मंडळ एकूण: १९८ (१२)

नागपूर: ६
नागपूर मनपा: १४६ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १५८ (२)

इतर राज्ये: २८ (४)
एकूण: १२ हजार ९७४ (५४८)

सातारा जिल्ह्यात ३ मे नंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडणार? शंभूराज देसाईंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या ७७ वर गेली आहे. यामुळे जिल्ह्यातील लाॅकडाउन कडक करण्यात आले असून अनेक ठिकाणी जीवणावश्यक वस्तु मिळणे कठीण झाले आहे. यापार्श्वभुमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील दुकाने नियम पाळून किमान 3 तास उघडावीत अशा सुचना सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिल्या आहेत.

सातारा जिल्हा सध्या रेड झोनमध्ये आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या चार पाच दिवसापासून संपुर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन अतिशय कडक पध्दतीने राबविले जात आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक सुविधा मिळणे कठीण झाले आहे. याकरीता जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात जीवनावश्यक सुविधा घरपोच देण्याची व्यवस्था करावी तसेच ज्याठिकाणी घरपोच सुविधा देणेस वाव नाही अशा ठिकाणी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून सामाजीक अंतर ठेवून दुसर्‍या टप्प्यात सकाळी किमान ३ तास जीवनावश्यक साहित्यांची दुकाने उघडी ठेवावीत अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना आज केल्या.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी वरील महत्वाच्या विषयासंदर्भात आज सगळा प्रोटोकॉल (राजशिष्टाचार) बाजुला ठेवून सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जावून प्रत्यक्ष भेट घेतली. या महत्वाच्या विषयासंदर्भात त्यांनी सुमारे एक तास जिल्हाधिकारी यांचेबरोबर चर्चा केली. यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवरती लॉकडाऊनच्या काळात शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करुन देणेकरीता जिल्हयातील सर्व अधिकारी यांची बैठक घेवून यासंबधीचा आराखडा तयार करुन आवश्यक त्या उपायायोजना केल्या जातील असे सांगितले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/267255064412922/

इतर महत्वाच्या बातम्या –

रेड झोनमधील मद्यपींसाठी खुशखबर! कंटेन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानं खुली होणार?

कराड तालुक्यात कोरोना कसा फोफावला? जाणून घ्या पहिल्या रुग्णापासून आजच्या ५७ पर्यंतचा पूर्ण प्रवास

शरद पवांरांचे पंतप्रधान मोदींना पत्र; IFSC सेंटर महाराष्ट्रातू गुजरातला हलवण्यावर म्हणाले…

Breaking | आणखी दोन कैद्यांना कोरोनाची बाधा, साताऱ्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७७ वर

उदयनराजे भोसले यांनी ठोकला पत्रकारांना सलाम, म्हणाले…

केळीचे भाव घसरले; शेतकऱ्याने दोन एकर बाग केली भूईसपाट

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेती चे अर्थकारण बिघडत चालले असून उत्पादित मालाला भाव नाही , त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने ,परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्याकडे असणाऱ्या व काढणीस आलेल्या केळी पिकावर ट्रॅक्टर फिरवत हे पिक भूईसपाट केले आहे.

पाथरी तालुक्यातील कासापुरी गाव शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात मागील अनेक वर्षापासून केळी पिकाची लागवड केली जाते. या भागातील केळीला व्यापारी वर्गाकडून ही चांगली मागणी असते. यातून चांगला अर्थकारण होत असल्याने येथील बळीराजा या पिकाकडे वळला आहे. दुष्काळी परिस्थिती सोडली तर त्यामध्ये हे पीक घेण्यात या गावातील शिवारात खंड पडला नाही. मागच्या वर्षीही अत्यल्प पाण्यावर साधारण तीनशे एकर क्षेत्रावर या शिवारामध्ये केळी पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यातील मागील जून महिन्यांमध्ये लागवड केलेली केळी आता काढणीस आली आहे. साधारणता एका झाडापासून दोनशे रुपयापर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना अपेक्षित होते. तर क्विंटलला एक हजार ते बाराशे रुपये एवढा दर मिळणे अपेक्षित होता. परंतु घडले उलटेच लॉकडाऊन च्या काळात तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना केळीचे घड काढून बांधावर आणण्यास लागणारी मजुरी परवडत नसल्याने शेतकरी हतबल होऊन वैतागला आहे.

कासापुरी येथील गट क्रं ४६ मध्ये बागायती शेती करणारे जगदीश कोल्हे यांनी त्यांच्याकडील शेतीपैकी चार एकर क्षेत्रावर केळीचे पिक घेतले आहे. यात काढणीस आलेल्या दोन एकर उभ्या केळी पिकावर शुक्रवारी त्यांनी ट्रॅक्टर चालवला आहे. तीनशे रुपये क्विंटल दर त्यातून कमिशन व मजुरी खर्च वजा जाता शंभर रुपये हातावर पडत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला सल्याचे यावेळी बोलताना सांगितले. केलेला खर्च निघत नसेल तर ते पीक ठेवून काय उपयोग ?असा प्रश्नही कोल्हे यांनी यावेळी केला आहे.

येत्या खरीप हंगामामध्ये या पिकाच्या जागी सोयाबीन पिक घेण्याचे त्यांनी ठरवले आहे. जगदीश कोल्हे यांनी मागील जून महिन्यामध्ये पाच बाय पाच वर २०००केळीच्या बुडांची लागवड केली होती. त्यासाठी चार रुपये प्रति झाड एवढ्या किमतीत त्यांना बियाणे विकत आणावे लागले होते. साधारणता एकरी ५०हजारांपेक्षा खर्च त्यांना केळी जोपासण्यासाठी आला आहे. त्यातून दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन त्यांना अपेक्षित होतं. आता मात्र केलेला खर्चही निघणार की नाही असा प्रश्न तयार झाल्याने अत्यंत कष्टाने उभ्या केलेल्या बागेला त्यांना बांधावर टाकावे लागले आहे. उर्वरित दोन एकर क्षेत्रावरील केळीचे घड परिपक्व होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी असल्याने या क्षेत्रावरील उत्पादित केलेल्या केळीला चांगला भाव मिळेल व नुकसान भरून निघेल या एका आशेवर सध्या हा शेतकरी आहे.

“कोणीही उपाशी राहू नका, आम्ही आहोत..!!” – पुण्यातील सेवाभावी संस्थांच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे प्रतिनिधी | कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं खबरदारी म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन केला. उद्यापासून या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. अचानक केलेल्या लॉकडाऊनमूळे अनेक विद्यार्थी, मजूर वर्ग आणि कामगार आहे त्या ठिकाणी अडकून राहिला. परिणामी या सर्वांसमोर दोन वेळच्या जेवणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. या सर्वांसाठी आशेचा किरण ठरल्या काही संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते. पुण्यातील गांजवे चौक, नवीपेठ येथे सुरू करण्यात आलेल्या भोजन केंद्रामध्ये २१ मार्च रोजी
पहिल्या दिवशी केवळ ४० मुलांना दोन वेळेचे जेवण देण्यात आले. यानंतर दररोज हा लाभ घेणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ होत असून आता दररोज जेवणाच्या ११०० डब्यांच्या पार्सलचे वाटप केले जात आहे. हे जेवण पूर्ण लॉकडाऊन होईपर्यंत देण्यात येईल.

गरजू आहेत त्या ठिकाणापर्यंत जेवण पोहचवण्याची सोय

मोफत जेवण वाटप करण्यात पुण्यातील विविध सामाजिक संस्था व वैयक्तिक पातळीवर मित्र मदत करत आहेत. स्वामी विवेकानंद पतसंस्था अँड वाणी चेंबर्स आँफ कामर्स, कँटलिस्ट फाऊंडेशन, भगवे ट्रेकर्स, वंदेमातरम, आयएएस अँकडमी अँड रिसर्च सेंटर, राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था,बुलढाणा आणि गजानन बुक सेंटर यांच्या मदतीने गजानन बुक सेंटर येथे दररोज सकाळी ८ ते ९ पर्यंत पोहे व उपीट या नाश्त्याचे वाटप केले जाते. तर दुपारी १२ ते १ व रात्री ७:३० ते ८:३० या वेळेत ताजे आणि स्वच्छ जेवण देण्यात येत आहे. या जेवणाचा लाभ लोकमान्य नगर, नवी पेठ व सदाशिव पेठेसह नारायण पेठेतील विद्यार्थी घेत आहेत.

काही गरजूंना किटचे वाटप

विद्यार्थ्यांना संकटाच्या वेळी अन्न देण्यासाठी “कोणीही उपाशी राहू नका आम्ही आहोत” या एकाच टॅगलाईनखाली सर्व सामाजिक कार्यकर्ते व टीम कार्यरत आहे. राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, बुलडाणाच्या अध्यक्ष पल्लवी कोंडार, सचिव धनराज खारोडे, इस्कॉन मंदिर कात्रज, विश्व हिंदू परिषदचे गिरीश येनपुरे, राजूभाऊ जाधव, बजरंग दलचे चेतन बोडखे, प्रा. हरीश टिंबोळे, प्रा. राहुल देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई सावंत, प्रहार रुग्णसेवक नयनभाऊ पुजारी, महिला दक्षता पोलीस कमिटीच्या आशाताई जाधव, अक्षय सावंत, समीर पटवेकर, मनपा शिक्षिका मनिषाताई भोसले यांनी शिवणे, पुणे येथील १२४ कुटुंबातील २०५ व्यक्तींना १८ एप्रिलपासून लॉकडाऊन संपेपर्यंत एकवेळ जेवण देण्याचा उपक्रम सुरु ठेवला आहे. तसेच काहींना अन्नधान्य किटही मोफत उपलब्ध करून दिलं आहे. याशिवाय दाते वस्ती, तळजाई पठार पायथा येथे २२ एप्रिल पासून लॉकडाऊन संपेपर्यंत ८५ कुटुंबातील २०० व्यक्तींना एकवेळ जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे. गणेश शिंदे हे दाते वस्ती येथे मदतकार्य पार पाडत आहेत.

वारजेमधील रामनगर परिसरात २९ एप्रिलपासून २०० लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथील काम आशाताई जाधव पाहत आहेत. दांगट-पाटील इस्टेटमधील १०० मजुरांच्या जेवणाची व्यवस्था २९ एप्रिल २०२० पासून सुरू झाली आहे. येथील सर्व व्यवस्था मनिषाताई भोसले आणि नयनभाऊ पुजारी हे बघतात. याच कालावधीत कर्वे नगर, मराठवाडा कॉलेज परिसरात ५०० लोकांच्या जेवणाची सर्व व्यवस्था नयनभाऊ पुजारी, विष्णू मोरे तसेच सर्व प्रहार कार्यकर्ते करत आहेत. पुण्यातील एकूण २४०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहील याबाबत दक्षता घेतली जात आहे.

गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. जेवणाची मागणी अधिक वाढत आहे. संस्थेच्या वतीने स्वयंसेवक म्हणून रुपाली डामसे, मीना चौधरी मॅडम तसेच मनस्विनी पाटणे मॅडम या स्वखर्चाने विविध ठिकाणी जाऊन कोरोना रोगाबाबत मार्गदर्शन व समुपदेशन करत आहेत. एकूणच काय या संकटकालीन परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने आपल्या अवतीभोवती सहकार्य भावना ठेवून महाराष्ट्र राज्य तसेच आपल्या देशावरील संकट दूर करण्यास एकमेकांस मदत करावी. असे आव्हान संस्थेने केले आहे.

या टीमला सहकार्य करण्याची इच्छा असणाऱ्यांनी धनराज पाटील – 7057391005, 8888066022 किंवा प्रा. हरीश तिंबोळे – 9975398694 यांना संपर्क करावा.

रेड झोनमधील मद्यपींसाठी खुशखबर! कंटेन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानं खुली होणार?

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात रेड झोनमध्ये कन्टेंन्मेट क्षेत्र वगळता उर्वरित भागांत स्वतंत्र दुकानांसह दारुची दुकानंही खुली होणार आहेत. राज्य सरकारनं यासंबंधी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे. एएन आय या वृत्तसंस्थेने यासंबंधी वृत्त दिले आहे.

करोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळं केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. त्याचवेळी सरकारनं रेड, ऑरेंज, ग्रीन अशा श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. महाराष्ट्रात १४ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या रेड झोनमधील दुकानं उद्यापासून खुली होणार आहेत. मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रासह इतर जिल्ह्यांतील कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानंही खुली होणार असून, विक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

रेड झोनमधील कन्टेंन्मेंट क्षेत्रात दारू दुकाने खुली ठेवण्यात अजिबात परवानगी नाही.
– प्रत्येक लेनमध्ये केवळ पाच दुकाने (जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, माल आणि बाजारपेठांमधील नाहीत.) खुली ठेवण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
– जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली ठेवण्यावर बंधन नाही. सर्वच दुकानदारांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल.
– स्वतंत्र मद्याची दुकानं खुली ठेवता येणार आहेत. रेस्तराँ किंवा मॉलमधील दारूची दुकानं खुली ठेवता येणार नाहीत.
– सलून खुले ठेवता येणार नाहीत.
– परिस्थितीनुसार, स्थानिक प्रशासनांनी त्यांच्या पातळीवर दुकाने खुली ठेवण्याच्या वेळा निश्चित करावयाच्या आहेत.