Monday, December 22, 2025
Home Blog Page 5844

सातारकरांना दिलासा! कंटेनमेंट झोनमधील गावांना किराणा माल साहित्य घर पोच मिळणार

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सातारा व जावली तालुक्यात क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीप्रमाणे पुढील ओदश होईपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेत किराणा मालाचा पुरवठा करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी प्राप्त असलेल्या अधिकारानुसार सातारा व जावली तालुक्यातील खालील गावांमध्ये अत्यावश्यक सेवेतील किराणा माल साहित्य घरपोच पुरविण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा ज्या प्रमाणे यंत्रणा उभारतील त्या प्रमाणे किरणा माल साहित्य घर पोच पुरविण्यात येतील.

सातारा नगर परिषद क्षेत्रासह ग्रामपंचायत क्षेत्रात किरणा साहित्य घपोच पुरविण्यास सुट
यामध्ये सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहुपूरी, म्हसवे, सैदापूर, वाढे, कोडोली, संभाजीनगर, समर्थनगर व धनगरवाडी या ग्रामपंचायत क्षेत्रात व सातारा नगर पालिका क्षेत्र व त्रिशंकू क्षेत्र या संपूर्ण क्षेत्रात, जावली तालुक्यातील 27 गावांसह मेढा नगर पंचायत क्षेत्रात किरणा साहित्य घपोच पुरविण्यास सुट देण्यात आली आहे.

तसेच जावली तालुक्यातील धनकवडी, निझरे, करंदी त. मेढा, मालचौंडी, सायळी, काळोशी, कसुंबी, गांजे, मोहाट, पिंपरी त मेढा, जवळवाडी, म्हाते खुर्द, म्हाते बु., वागदरे, गोंदेमाळ, गाळदेव, निपाणी मुरा, करंजे, चोरांबे, मामुर्डी, गवडी, आंबेघर त मेढा, आसणी, केळघर, नांदगणे, सांगवी ते मेढा, सावली ही गावे व मेढा नगर पंचायत क्षेत्रामध्ये उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा ज्या प्रमाणे यंत्रणा उभारतील त्या प्रमाणे किरणा माल साहित्य घर पोच पुरविण्यात येतील.

माझी मरणाची तयारी झाली होती – बोरिस जॉन्सन

लंडन । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता ते पूर्णपणे बरे झाले असून आपल्या या कठीण काळाबद्दल त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपले अनुभव व्यक्त केले आहेत.​​ ‘कोरोनाचे उपचार सुरू असताना माझा मृत्यू ओढवू शकेल याचाही तयारी डॉक्टरांनी ठेवली होती. इतकी माझी अवस्था विकट झाली होती. पण, डॉक्टरांनी मला मृत्यूच्या दाढेतून अक्षरक्ष: खेचून बाहेर काढले. मी त्यांचा शतश: ऋणी आहे’,अशा भावूक शब्दांत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रिटनचे ५५ वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जवळपास महिनाभर कोरोना झाल्यावर उपचार घेतल्यानंतर गेल्या आठवड्यात ते घरी परतले.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यांनतर ‘द सन ऑन संडे’ला दिलेल्या मुलाखतीत बोरिस जॉन्सन यांनी आपल्या कोरोनालढ्याविषयीची माहिती दिली आहे. ‘७ एप्रिलला मी सेंट थॉमस हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल झालो आणि डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. ऑक्सिजनचा पुरवठा तर अव्याहत सुरू होता. कठीण काळ होता तो. मी नाकारत नाही. माझी प्रकृतीचं काही खरं वाटत नव्हतं आणि डॉक्टरही काही वाईट घटना घडण्याच्या दृष्टीने तयारीत होते. मला ते जाणवत होतं’, असे जॉन्सन मुलाखतीत  म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अखेर पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळून दारूची दुकान उघडायला परवानगी

पुणे । राज्य सरकारनं अटी-शर्तींसह रेड झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमधील कन्टेंन्मेंट झोन वगळून मद्यविक्रीस परवानगी दिल्यानंतरही पुण्यातील मद्यविक्रीची दुकानं खुली होणार नाहीत, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील, तसंच जिल्ह्यांतील इतर भागांत कंटेन्मेंट झोन वगळून अन्य ठिकाणची दारूची दुकानं खुली करण्यात येणार आहेत.

आजपासून देशभरात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दारूपासून दूर असलेल्या लोकांनी सूट मिळताच आज सकाळपासूनच दारूच्या दुकानांपुढे रांगा लावल्या. काही ठिकाणी तर सकाळी दुकाने उघडण्याच्या दोन तास आधीपासूनच लोकांनी रांगा लावायला सुरुवात केलेली दिसली. मात्र, दुपारपर्यंत एकही दुकान न उघडल्याने रांगेत उभे असणाऱ्यांची निराशा झाली.  मद्याची दुकाने उघडण्याचे कुठलेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नसल्याने दुकाने उघडण्यास परवानगी मिळणार नसल्याचे राज्य उत्पादक शुल्क विभागाने स्पष्ट केले होते.

दरम्यान, तळीरामांच्या हाती आज सकाळी निराशा पडल्यानंतर आता पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिलासा दिला आहे. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी मद्य विक्रीची दुकानं खुली करण्यात येणार आहेत. यासंबंधी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत. ‘जिल्ह्यातील अतिसंवेदनशील परिसर वगळून अन्य ठिकाणची मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

संग्राम विधान परिषदेचा: शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे निवडणूक रिंगणात

मुंबई । केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक घेण्याची परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे. शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. या निवडणूकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख आणि पूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्याकडून अद्याप उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाही.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीची गणितं बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणाऱ्या भाजपला आता विधानपरिषद निवडणुकीत तुलनेनं कमी जागांवर संधी मिळणार आहे. विधानसभेचं पक्षीय बलाबल पाहता शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसला एक जागा सुटू शकते. तर, भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळे महाविकासआघाडीला ५ आणि भाजपला ४ जागा मिळणार असून 21 मे रोजी पार पडणारी विधानसभेची निवडणूक बिनविरोधच पार पडणार अशी चिन्ह दिसून येत आहेत.

भाजपमध्ये मात्र विधान परिषदेसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यापैकी भाजपचे अरुण अडसड, स्मिता वाघ आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या जागा रिक्त होणार आहेत. तसेच चौथ्या जागेसाठी भाजप मित्रपक्ष आणि अपक्षांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपच्या ४ जागांसाठी विधानसभेत पराभूत झालेले किंवा उमेदवारी न मिळालेल्या ‘स्वकीय आणि परकीय’ अशा दोन्ही इच्छुकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजपच्या पद्धतीनुसार संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय संसदीय समितीकडे पाठवण्यात आली आहे. या जागांसाठी अनेक नावांची शिफारस राज्याच्या कोअर कमिटीकडून करण्यात आली आहे. याबाबत शिक्कामोर्तब केंद्रीय नेतृत्वाकडूनच केला जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

खुशखबर ! लॉकडाऊन असूनही, या कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मिळाली वेतनवाढ आणि बोनस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे देशभर लॉकडाउन सुरू आहे. या संकटाच्या काळात कुठे लोकांच्या नोकर्‍या जात आहेत तर कुठे पगारात कपात केली जात आहे.त्याच वेळी, अशा काही कंपन्याही आहेत जिथे आपल्या कर्मचाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी बोनस दिले जात आहे.इंग्रजी वेबसाइट ईटीच्या वृत्तानुसार,हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल),नेस्ले, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेज,सॅमसंग, व्हर्लपूल आणि एलजी यांच्यासह मोठ्या ग्राहक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांचे मनोधैर्य राखण्यासाठी सिंगल-डिजिट इन्क्रीमेंट आणि बोनस दिले आहेत.ही वाढ गेल्या १२ महिन्यांपासून म्हणजे मार्च ते एप्रिलपर्यंतची आहे.या महामारीच्या आर्थिक दुष्परिणामांमुळे देशाकडे दुर्लक्ष होत असल्याने ते येत्या काही महिन्यांत चालू वर्षातील वेरिएबल पेआउट व पगारवाढीचा आढावा घेतील, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे.

HUL मध्ये काम करणार्‍यांना मिळाली पगारवाढ
देशातील सर्वात मोठी लिस्टेड कन्ज्यूमर गुड्स मेकर कंपनी एचयूएलने ईटीला सांगितले की चालू वर्षाची पगारवाढ ही मागील वर्षाच्या व्हेरिएबलसह देण्यात आली आहे. एचयूएल एप्रिल-मार्चच्या सायकल फॉलो करते. लक्स साबण आणि लिप्टन चहा बनवणारी ही कंपनी जवळपास १८,००० लोकांना रोजगार देते. मार्चच्या तिमाहीत त्यांची विक्री ही ७ टक्क्यांनी कमी झाली आहे.त्याचे पॅरेन्ट युनिलिव्हर मार्चमध्ये म्हणाले होते की ते अनपेक्षित संकटामुळे पेमेंटमधील अचानक होणाऱ्या कपातीपासून आपल्या कर्मचार्‍यांचे रक्षण करतील.

Hindustan unilever limited

कोकाकोलातील कर्मचार्‍यांची पगारवाढ ७-८%
हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेज (एचसीसीबी) या पेय उत्पादक कंपनीने आपल्या ७,०००कर्मचार्‍यांना थेट ७-८% वेतन वाढ जाहीर केली आहे.एचसीसीबीच्या म्हणण्यानुसार चालू वर्षात या साथीच्या आजाराचा गंभीर परिणाम होईल कारण लॉकडाऊनमुळे विक्री मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अनिश्चिततेच्या या वेळी कंपनीला आपल्या कर्मचार्‍यांना साथ द्यायची आहे.त्यामुळे कंपनीने सर्वप्रथम निर्णय घेतला की महामारीच्या अनिश्चिततेमध्ये कोणततेही लॉकडाउन अथवा वेतन कपात होणार नाही.

Hindustan Coca-Cola Beverages Pvt Ltd Photos, Verna, GOA- Pictures ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

हंदवाडा एन्काऊंटर: ‘त्या’ कॉलनंतर भारतीय जवानांनी त्वेषानं दहशतवाद्यांचा खात्मा केला

जम्मू काश्मीर । हंदवाडा एन्काऊंटरसंबंधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या एन्काऊंटरमध्ये शहीद झालेले २१ राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा हे  ४ जणांसह दहशतवादी लपलेल्या घरामध्ये घुसले होते. मात्र, त्यानंतर बराच वेळ त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. अखेर त्यांच्या फोनवर कॉल केला असता समोरून आलेल्या प्रतिसादातून भारतीय जवांनांना एकाच वेळी सावध होण्याचा इशारा, दुःखद वार्ता आणि प्रचंड राग त्यांच्या मनात उत्पन्न झाला. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नल आशुतोष शर्मा यांच्या फोनवर सुरक्षा दलाच्या जवानांनी कॉल केला असता ‘अस्सलाम वालैकुम’ असा समोरून प्रतिसाद मिळाला. या शब्दाने हंदवाडा चकमकीची पूर्ण दिशाच बदलून टाकली.

आशुतोष शर्मा यांच्या मोबाइलवर केलेल्या फोनला समोरुन अस्सलाम वालैकुम हे उत्तर मिळताच बाहेर थांबलेल्या जवानांना आत काही तरी अघिटत घडल्याची कल्पना आली. त्यानंतर त्यांनी अधिक त्वेषाने दहशतवाद्यांवर हल्ला चढवला. कर्नल शर्मा यांच्या टीमने संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घरात प्रवेश केला होता. तिथे अडकलेल्या कुटुंबाची त्यांनी यशस्वी सुटका केली पण ते स्वत: दहशतवाद्यांच्या जाळयात फसले. आणि या एन्काऊंटरमध्ये आशुतोष शर्मा यांच्यासह मेजर अनुज सूद, नायक राजेश कुमार, लान्स नायक दिनेश सिंह आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील सब इन्सपेक्टर सागीर पठान शहीद झाले.

“संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळात आम्ही कर्नल शर्मा आणि त्यांच्या टीममधील अन्य सदस्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होत नव्हता” असे जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले. अखेर चार तासांनी रात्री दहा वाजता कर्नल शर्मा यांना केलेल्या फोनवर समोरुन अस्सलाम वालैकुम हे उत्तर मिळाले. ‘कर्नल शर्मा यांचा फोन दहशतवाद्यांच्या हाती लागण्याचा फक्त एकमेव मार्ग होता हे तिथे असलेल्या अधिकाऱ्याच्या लक्षात आले’ असे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

कर्नल शर्मा यांची टीम आतमध्ये असताना फायरिंग थांबली होती. पण समोरुन ‘अस्सलाम वालैकुम’ उत्तर मिळाल्यानंतर लगेच गोळीबार सुरु झाला. रविवार सकाळपर्यंत हा गोळीबार सुरु होता. तब्बल १३ तास चाललेल्या या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात लष्कर-ए-तोयबाचा कमांडर हैदरचा समावेश आहे. चकमकीच्या सुरुवातीला सुरक्षा दलांना सांभाळून पावले टाकावी लागत होती. कारण त्यांनी एक कुटुंबाला ओलीस ठेवले होते. या कुटुंबाची सुरक्षा सैन्य दलासाठी सर्वात जास्त महत्वाची होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लाॅकडाउन 3.0 : सोने चांदीच्या किंमतींत मोठी उलाढाल; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून देशात लाॅकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या दोन टप्प्यात सोन्या-चांदीच्या किंमतींनी आकाशाला स्पर्श केलेला होता.देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या ४२,५३३ आहे तर मृतांचा आकडा हा १,३७३ वर पोहोचला आहे.सरकारने सध्या सुरु असलेला हा लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला ​​आहे. सोमवारी, मेच्या पहिल्या व्यापाराच्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या दरामध्ये किंचितसी वाढ दिसून आली. सोमवारी दहा ग्रॅम सोन्याचा भाव हा ३५ रुपयांनी वाढून ४५७७० रुपये इतका झाला, तर चांदीच्या दरात प्रति किलो ११०० रुपयांची घसरण नोंदली गेली. देशातील १४ केंद्रांकडून सोन्या-चांदीची किंमत जाणून घेत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट (इबजाराट्स डॉट कॉम) त्यांची सरासरी किंमत अपडेट करते. इबजाराट्सच्या मते,४ मे २०२० रोजी सोन्या आणि चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत.

Forget gold import duty, get the bond right first - The Financial ...

धातूची शुद्धता 4 मे पहाटे दर (रुपये / 10 ग्रॅम) 30 एप्रिल दर (रुपये / 10 ग्रॅम) दर बदल (रुपये / 10 ग्रॅम)
सोने     999                  45770                                 45733                                     37
सोने     995                  45587                                 45550                                     37
सोने     916                  41925                                 41891                                     34
सोने     750                  34328                                 34300                                     28
सोने     585                  26776                                 26754                                     22
चांदी     999      41100 रुपये / किलो               42200 रुपये / किलो               1100 रुपये / कि.ग्रा

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन दिल्लीचे मीडिया प्रभारी राजेश खोसला यांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्जा देशभरातील १४ केंद्रांकडून सोन्या-चांदीची सरासरी किंमत दर्शविते. खोसला म्हणतात की सध्याचा सोने-चांदीचा दर किंवा स्पॉट किंमत ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते, परंतु त्यांच्या किंमतींमध्ये फारच थोडास फरक असतो.एप्रिलमध्ये सोन्याचे भाव २२५९ तर चांदी ही २९५० रुपयांनी वाढली.

ETFs are holding up the gold market - MarketWatch

९९९ सोने काय आहे ?
हॉलमार्क केलेल्या दागिन्यांमध्ये हॉलमार्कचे गुण आणि काही अंक जसे की ९९९,९१६,८७५ आहेत.आपल्या सोन्याच्या शुद्धतेचे रहस्य या आकड्यांमध्ये लपलेले आहे.लक्षात ठेवा,९९९ क्रमांकासह सोन्याचे दागिने हॉलमार्कच्या चिन्हासह २४ कॅरेटचे आहेत.९९९ म्हणजे त्यातील सोन्याची शुद्धता ही ९९.९ टक्के आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे २३ कॅरेट सोन्याचे ९५८, तर २२ कॅरेट सोन्याचे ९१६, २१ कॅरेट ८७५, १८ कॅरेट ७५० गुण आहेत.

India can extract $1 billion worth of gold from e-waste | Deccan ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पिठाच्या पिशवीतून पैसे वाटल्यासंबंधी आमिर खानचा खुलासा, म्हणाला..

मुंबई । कोरोनाच्या लढाईत अनेक सेलिब्रेटी पुढाकार घेत असून आर्थिक मदत करत आहेत. अशातच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत आमिर खानने पिठाच्या पिशवीतून १५ हजार रुपये वाटल्याचा दावा कऱण्यात आला होता. यानंतर सोशल मीडियावर आमिर खानने खरंच मदत केली आहे की ही अफवा आहे याबाबत मात्र उलट सुलट चर्चा सुरु होत्या. पण आता बॉलिवूड अभिनेता आमिर खानने स्वत: ट्विट करुन यासंबंधी खुलासा केला आहे.

आमिर खानने आपल्याविषयी सध्या चर्चेत असणाऱ्या सर्व गोष्टी अफवा असल्याचं सांगितलं आहे. यांदर्भात आमिर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला की, ‘मी पिठाच्या पिशव्यांमध्ये पैसे टाकून पाठवणारा व्यक्ती नाही. त्यामुळे कदाचित ही बातमी खोटी किंवा अफवा आहे. किंवा कोणी रॉबिनहुड असेल, ज्याला आपल्या नावाचा खुलासा करायचा नसेल, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, लव्ह यू.’

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आमिर खानने दिल्लीमध्ये पिठाच्या पिशव्यांचे काही पॅकेट्स पाठवले असल्याची माहिती व्हायरस होत होती. तसेच या पिठाच्या पिशव्यांमध्ये 15-15 हजार रूपये लपवून पाठवले जात अलसल्याचंही सांगण्यात येत होतं. तसेच हे प्रकरण 23 एप्रिल रोजी घडल्याचं व्हायरल होणाऱ्या माहितीमध्ये सांगितलं होतं. यादरम्यानचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु, आता स्वतः आमिर खानने या वृत्ताचं खंडन केलं आहे.

दरम्यान, आमिर खान कोरोना वॉरियर्ससाठी सतत मदत करत आहेत. परंतु, आमिरला यासंदर्भात खुलासा करायचा नाही की, त्याने पीएम केअर फंड किंवा इतर संस्थांना किती आणि काय मदत केली. यासंदर्भात आमिरचं असं मत आहे की, कोणी, कोणाला किती मदत केली, ही प्रत्येकाची खासगी गोष्ट आहे. या गोष्टी सार्वजनिक करणं योग्य वाटत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

प्रार्थनेचा कोरोना विषाणूच्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम होतो ? अमेरिकेत याबाबत संशोधन सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या कॅनसास शहरातील भारतीय वंशाचे-अमेरिकन चिकित्सकाने “बचावासाठी प्रार्थना” यासारखे काहीतरी करून कोरोना विषाणूमुळे संक्रमित लोकांना बरे करण्यास उपयोग होऊ शकतो किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे.मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन फिजीशियन धनंजय लकीरेड्डी यांनी शुक्रवारी आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना विषाणूच्या १००० रूग्णांचा समावेश असलेल्या ४ महिन्यांच्या प्रार्थना अभ्यासाला शुक्रवारी सुरुवात केली.

Guided Meditation - CSL STL

रुग्णांना २ गटात विभागले जाईल
अभ्यासाच्या कोणत्याही रूग्णांसाठी ठरवलेल्या मानक काळजी प्रक्रियेमध्ये कोणताही बदल होणार नाही आहे.त्यांना ५००-५००च्या दोन गटात विभागले जाईल आणि एका गटासाठी प्रार्थना केली जाईल. याशिवाय इतर कोणत्याही गटाला प्रार्थनेविषयी सांगण्यात येणार नाही.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांना देण्यात आलेल्या माहितीनुसार ४ महिन्यांच्या अभ्यासानुसार ‘कोविड -१९ रूग्णांच्या क्लीनिकल ​​परिणामांमध्ये दूरगामी बचावात्मक बहुपक्षीय प्रार्थनेची भूमिका’ जाणून घेता येईल.

Going Back to Basics with the Lord's Prayer | Guideposts

‘आम्ही धर्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवतो’
ख्रिश्चन, हिंदू, इस्लाम, ज्यू आणि बौद्ध अशा ५ जातीय स्वरुपात सांप्रदायिकरित्या निवडलेल्या अर्ध्या रुग्णांना सर्वव्यापी प्रार्थना केली जाईल, तर इतर रुग्ण एकमेकांच्या गटामध्ये सहभागी होतील. सर्व रूग्णांना त्यांच्या डॉक्टरांनी प्रमाणित केलेल्या मापकानुसार काळजी घेतली जाईल आणि या अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी लाकेरेड्डी यांनी वैद्यकीय व्यावसायिकांची समिती स्थापन केली आहे. लाकेरेड्डी म्हणाले, ‘आपण विज्ञानावर विश्वास ठेवतो तसेच आम्ही धर्मावरही विश्वास ठेवतो.’

Every word you speak is like a prayer to a higher power

त्याचे अवलोकन या रिसर्चमध्ये केले जाईल
ते म्हणाले, “जर आपल्यापैकी बहुतेकांचा विश्वास असणारी एखादी अलौकिक शक्ती असेल तर ती प्रार्थना आणि उपचार यांचा परिणाम एकत्रितपणे बदलू शकेल काय?” हा आमचा प्रश्न आहे. ”रुग्ण व्हेंटिलेटरवर किती काळ राहिला, त्याच्यातील किती अवयवांनी काम करणे थांबवले,त्यांना आयसीयूमधून किती दिवसांत सोडण्यात आले आणि किती लोक मरण पावले याचादेखील संशोधक रिसर्च करतील.

16 Prayer Quotes — Quotes About Prayer

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

NEET, JEE परीक्षांची तारीख ‘या’ दिवशी जाहीर होणार

नवी दिल्ली ।  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळ स्थगित करण्यात आलेल्या NEET आणि JEE Main या दोन्ही परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक करणार आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी नीट आणि जेईई या पात्रता परीक्षा देतात. यावर्षीही बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थांना या दोन परीक्षांची प्रतीक्षा आहे.

दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी नीट आणि जेईई या पात्रता परीक्षा देतात. यावर्षीही बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थांना या दोन परीक्षांची प्रतीक्षा आहे. यावर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्ट एजन्सीने नीट यूजी २०२० (NEET UG 2020) आणि जेईई मेन २ (JEE Main 2) या परीक्षा लांबणीवर टाकल्या.

सर्व विद्यार्थ्यांना दरम्यानच्या काळात त्यांचे परीक्षा केंद्र असलेल्या शहराचा पर्याय बदलण्याची संधी देण्यात आली. दरम्यान, येत्या मंगळवारी ५ मे रोजी जेईई मेन आणि नीट या परीक्षांच्या तारखांची घोषणा होणार आहे. ५ मे रोजी डॉ. पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांसोबत एका वेबिनारचे आयोजन केले आहे. ते टि्वटरवर लाइव्ह असणार आहेत. देशभरातले विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”