Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5851

धक्कादायक! दिल्लीत १२२ सीआरपीएफ जवान करोनाबाधित; आणखी १२ जवानांची भर

नवी दिल्ली । देशात कोरोना वेगानं फैलावत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे देशात कोरोनाच्या लढाईत आघाडीवर असणाऱ्या डॉक्टर,पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यावर कोरोनाने झडप घातली आहे. दरम्यान, दिल्लीत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीफ) आणखी १२ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाची लागण झालेल्या सीआरपीएफ जवानांची संख्या आता १२२ वर पोहोचली आहे. तर, आणखी १५० जवानांच्या टेस्टचे रिपोर्ट्स येणे बाकी असून ही संख्या आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोरोनाची लागण झालेले हे सर्व जवान एकाच बटालियनचे आहेत. ही बटालियन राजधानी दिल्लीच्या मयूर विहार फेझ-३ येथे तैनात आहे. सीआरपीएफच्या ३१ बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक मोहम्मद इकराम हुसेन याचा करोनामुळे २८ एप्रिलला मृत्यू झाला होता. त्यांनी सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. कोरोनाचा हा विषाणू आता अर्धसैनिक दलापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ५५ वर्षीय हुसेन यांच्या निधनाबाबत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला होता. दरम्यान, देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘हिंदी मिडीयम’अभिनेत्री सबा कमरने अभिनेते ऋषी कपूर यांना व्हिडिओ शेअर करून वाहिली श्रद्धांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता कपूर इरफान खानबरोबर हिंदी मिडीयम या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर रमजान दिसली होती.जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अभिनेता ऋषी कपूर आणि त्याची पत्नी नीतू सिंग हे तिच्या अभिनयाने खूप प्रभावित झाले.ऋषी कपूर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेले असता एका पत्रकाराने ऋषी आणि नीतू यांना सबाबद्दल विचारले,त्यावेळी दोघेही सबाचे कौतुक करताना दिसले होते.

आता जेव्हा ऋषी कपूर हे या जगात राहिलेले नाही,तेव्हा सबाने त्यांची आठवण काढली आहे.तिने त्यांच्या इंटरव्युव्हचा एक छोटासा भाग आपल्या सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केला आणि ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

 

ऋषी कपूर यांचे नुकतेच वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाविरूद्ध लढा देत होते. लॉकडाऊनमुळे ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्कारावेळी केवळ जवळचे काही लोकच सहभागी होऊ शकले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

पावसात सुद्धा ड्युटी बजावणाऱ्या पुणे पोलिसांचा ‘तो’ व्हिडिओ पाहून महापौर भारावले, ठोकला कडक सेल्युट

पुणे । हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार काल शुक्रवारी दुपारी चारच्या दरम्यान वादळी पावसाने पुणे शहराला झोडपले. सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागात झाडे पडली तर काही ठिकाणी मोबाइल टॉवर, दिशादर्शक फलक कोसळले. उपनगरांमध्ये रस्त्यावर पाणीही साठले होते. लॉकडाऊनमुळे लोक घरात असल्याने जीवितहानी टळली. मात्र याच लोकडाऊनमध्ये पुणे शहर पोलीस भर मुसळधार पावसात सुद्धा कर्तव्य बजावत होते. कालच्या मुसळधार पावसामुळे कोरोनाविरोधातील लढ्यात रस्त्यावर आपली ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांचीही मोठी तारांबळ उडाली. पण तरी सुद्धा पोलीस आपल्या ड्युटीच्या जागेवरून ते हलले नाही. विश्रामबागवाड्यासमोरील रस्त्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिसांचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो.

शहरातील विश्रामबागवाडा रस्त्यावर पोलिसांनी नाकेबंदी केली असून कर्तव्यावर असताना थोडावेळ सावली मिळावी, आराम करता यावा यासाठी त्यांनी रस्त्याच्या बाजूला तात्पुरत्या तंबूची व्यवस्था केली आहे. पण वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पोलिसांचा हा तात्पुरता निवाराही उडून जात होता. मात्र तेथील पोलिसांनी मोठी कसरत करत १०-१५ मिनिटे मुसळधार पावसामध्ये उभे राहून तंबू कसाबसा धरुन ठेवला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना सलाम ठोकला असून ते बजावत असलेल्या कार्याचं कौतुक केलं.

सदर व्हिडिओ ट्विटरवर पुणे पोलिसांना टॅग करत, “सलाम… कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या घटकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. मात्र ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता हे योद्धे लढत राहतात. आजच्या पावसात विश्रामबागवाड्यासमोर दिसलेलं हे चित्र याचीच साक्ष देते”, असे ट्विट महापौरांनी केले. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या ट्विटला पुणे पोलिस आयुक्तां डॉ. वेंकटेशम यांनीही रिप्लाय दिला आणि त्यांचे कौतुकासाठी आभार मानले. ‘तुमची साथ असेल तर भविष्यातही आमचे कार्य असेच सुरू राहील’, अशा आशयाचे ट्विट पुणे पोलिस आयुक्तांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरीही पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ११ लाख पार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत आतापर्यंत १.१ दशलक्षाहून अधिक लोकांना कोरोनाव्हायरस या साथीच्या आजाराची लागण झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती दिली.सिन्हुआ म्हणाले की, अमेरिकेत कोविड -१९च्या संसर्गाची संख्या शुक्रवारी संध्याकाळी ०७.४० (स्थानिक वेळेनुसार) ११ लाख ९७ वर पोहचली आहे. ”सिन्हुआ यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनियरिंग (सीएसएसई) च्या वतीने सांगितले.या साथीच्या आजारामुळे मृतांची संख्या वाढून ६४ हजार ७८९ झाली आहे. “

सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनियरिंगच्या ताज्या आकडेवारीनुसार कोविड -१९ मध्ये संसर्ग झालेल्या न्यूयॉर्क राज्यात सर्वाधिक ३लाख ८ हजार ३१४ मृत्यू झाले आहे. यानंतर न्यू जर्सीमध्ये एकूण १ लाख २१ हजार १९० संसर्गाची प्रकरणे तर ७ हजार ५२८ मृत्यूची नोंद झाली आहे.

सीएसएसईच्या मते, ५० हजाराहून अधिक संसर्ग झालेल्या इतर राज्यांमध्ये मॅसाचुसेट्स, इलिनॉय आणि कॅलिफोर्नियाचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक! महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात परतलेल्या ७ मजुरांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली । केंद्र सरकारनं लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेल्या मजूर-कामगारांना घरी जाण्याची मुभा दिली. या निर्णयानंतर अनेक कामगार आता घरी परतू लागले आहेत. मात्र ज्या गोष्टीची भीती वाटतं होती तेच घडत असल्याचा इशारा देणारी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये पोहोचलेल्या कामगारांपैकी ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. उत्तरप्रदेशातील बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

उत्तर प्रदेश सरकारनं विविध राज्यात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत नेण्यासाठी बस सोडल्या होत्या. त्यामाध्यमातून विविध राज्यातील कामगारांना परत नेण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारनं महाराष्ट्रातून कामगारांना बसेसनं घरी पोहोचवलं होतं. या कामगारांची तपासणी केल्यानंतर, यात ७ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हे कामगार झाशी मार्गे बस्ती जिल्ह्यात दाखल झाले होते. बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली.

३ मे रोजी लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्याची मुदत संपणार होती. मात्र, केंद्र सरकारनं काही राज्यांची मागणी लक्षात घेऊन लॉकडाउन २ आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्रानं घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी विविध राज्यांनी कामगारांना परत नेण्याच्या मागणीचीही दखलही केंद्रानं घेतली. त्यामुळे राज्यांनी विविध राज्यात अडकलेले आपापल्या राज्यातील कामगार, विद्यार्थ्यांसह नागरिकांना परत नेण्याचं काम सुरू केलं आहे. कामगारांसाठी विशेष गाड्याही रेल्वे मंत्रालयानं सोडल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

सातारा जिल्ह्यासाठी धोका वाढला! आज पुन्हा ५ रुग्णांची वाढ, कोरोनग्रस्तांची संख्या पोहोचली ७४ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

साताऱ्यात पुणे कारागृहातून आलेले दोन, कराड मध्ये कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेला एक, कोरेगाव आणि फलटण मध्ये प्रत्येकी एका रुग्णाचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यासाठी धोका वाढला असून जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७४ वर पोहोचली आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पुणे कारागृहातून सातारा येथे प्रवास करुन आलेले २, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे बाधित रुगणाच्या निकट सहवासित १ व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे कराड येथून प्रवास करुन आलेला १ आणि कराड येथे १ मे रोजी रात्री उशिरा सापडलेले १५ जण अशा एकूण १९ जणांचे अहवाल कोविड-19 बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, सातारा जिल्ह्यात 64 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 74 बाधित रुग्ण आढळले आहेत. यातील एकट्या कराड तालुक्यात तब्बल ५७ कोरोना बाधित रुग्ण आहेत. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 20, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 10, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 12, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 3 व वाई येथील 1 असे एकूण 64 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, काळ दिवसभरात कराड मध्ये वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तसेच एका गर्भवती महिलेसह तिचा एक निकटवर्तीयाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर दुपारी पुन्हा २ जण कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मिळाली. नंतर रात्री उशिराने पुन्हा कराड तालुक्यात कोरोनाचे नवे १४ रुग्ण सापडले. आता आज सकाळी जिल्ह्यात पुन्हा पाच जण कोरोना पॉजिटीव्ह सापडल्याने सातारकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

इत्तर महत्वाच्या बातम्या –

तळीरामांसाठी गुड न्यूज वाईन्स शॉप, पान टपऱ्या सुरु होणार

आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

केंद्राची मोठी घोषणा! लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडणार

खुशखबर! घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त

राज्यात दिवसभरात १००८ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ११ हजार ५०६ वर

मुंबईतून आलेल्या एकास कोरोनाची बाधा, सांगलीत रुग्णांची संख्या ४ वर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथे एका मुंबईतून आलेल्या चाळीस वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. फिवर क्लिनीकमध्ये त्याची प्राथमिक तपासणी केली असता संशयास्पद वाटल्याने कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. दुधेभावीत बाहेरुन आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेत त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद ३१ वर पोहोचली असली तरी सद्यस्थितीत चार रुग्ण आहेत. दुधेभावीत चाळीस वर्षीय व्यक्ती २७ एप्रिल रोजी मुंबई येथून आली होती. संबंधित व्यक्ती बाहेर गावातून आलेली असल्याने फिवर क्लिनिकमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली. या तपासणीमध्ये सदर व्यक्तीची लक्षणे संशयास्पद वाटल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. आर. पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याशी संपर्क साधला. यानंतर त्या व्यक्तीला बुधवारी रात्रीच मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. कोरोना तपासणीसाठी स्वॅब पाठविण्यात आला. त्याचा अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला असून सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. याशिवाय दुय्यम संपर्क बाधितांना कवठेमहांकाळ यथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.

संबंधित व्यक्तीचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी आहे. मात्र ही व्यक्ती दुधेभावी येथे आपल्या मामाकडे आली होती. बाहेरुन आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दुधेभावी व येडेनिपाणी या दोन्ही ठिकाणी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

नगरपालिकेच्या घंटागाडीतून दारू वाहतूक, राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जिल्हाधिकारी आदेशाचा भंग करून कोरोना बाधित कंटेन्मेंट झोनमध्ये नगरपालिकेच्या मालकीची सरकारी घंटागाडी वापरून दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव रामचंद्र जाधव याचेसह सतीश बबन मंडले, सुनील सावळाराम जाधव, सागर जाधव व राजभवन बिअर बारचे मालक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र कोविड विनिमयमन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार २८ एप्रिल रोजी दुपारी बाराच्या दरम्यान कोरोना बाधीत क्षेत्रांमध्ये राजभवन बिअर बारच्या आवारातून नगरपालिकेच्या शासकीय घंटा गाडीतून दारू साठा इतरत्र हलवण्यात येत होता. लॉकडाऊन असताना आणि दारू विक्रीचा परवाना नसताना राजभवन बिअर बार मधून दारूची वाहतूक केली जात होती. कोरोना बाधीत क्षेत्रामध्ये कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी नेमलेली आहे. असे असताना या परिसरात अन्य दुसरी घंटा गाडी (क्रमांक एम.एच.10 सीआर 2648) या गाडीवरील चालक सतीश बबन मंडले, सहाय्यक सुनिल सावळाराम जाधव व सागर जाधव यांनी नगरसेवक खंडेराव जाधव यांच्याशी संगनमत करून दारू साठा इतरत्र हलवला.

नगरसेवक खंडेराव जाधव याने आपल्या पदाचाच गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी सांगली याचा आदेशांचा भंग करून कोरोना बाधित क्षेत्रातील कचरा गोळा करण्यासाठीचे निमित्त साधून अनधिकृतपणे दुसरी घंटागाडी नेत दारू वाहतूक करण्यात आली. याबाबतची फिर्याद मुख्याधिकारी प्रज्ञा शंकरराव पोतदार-पवार यांनी दिली आहे.

‘त्या’ कोरोनाग्रस्त महिलेचा दफनविधी नांदेडमधेच; संपर्कातील 69 व्यक्तीचे स्वॅब निगेटिव्ह

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

सेलु शहरामधील दुर्धरआजारा सोबत कोरोनाबाधीत महिलेचा दोन दिवसापूर्वी नांदेड येथील शासकिय दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यु झाल्यानंतर, मयत महिलेचा दफनविधी नांदेड येथील दफनभूमीत करण्यात आल्याची माहीती नांदेड प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर सदरील मयत महीला रुग्णाच्या सहवासातील सेलु व परभणी येथील खाजगी रुग्णालयातील व इतर असे एकुण ७१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर त्यातील ६९ स्वॅब निगेटीव्ह आले असुन २ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत.

मागील महीन्याच्या शेवटी औरंगाबादहुन दुर्धर आजार असणारी महिला उपचारानंतर सेलू यामुळ गावी आली होती. आल्यानंतर तब्येत खालावल्याने सदरील महिलेस परभणी येथील खाजगी दवाखाना व नंतर नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. याठिकाणी तपासणी केली असता सदरील महिला कोरोना संसर्गबाधीत असल्याचेही निष्पन्न झाले होते. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री कोरोना बाधीत महिलेचा मृत्यु झाला होता. यावेळी मृत महिलेचा दफनविधी नांदेड येथेच करण्यात आल्याची माहीती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान दिलासादायक वृत्त असे आहे कि, मयत महिलेल्या संपर्कात आलेली हायरीस्क १७ व लो – रिस्क ३४ व इतर १८ असे एकुण ६९ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले असुन दोन तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. शुक्रवार दि .१मे सांयकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हात कोरोना (कोव्हिड १९) विषाणु बाधित एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. नव्याने सशंयीत दाखल झालेल्या रुग्णांचे स्वॅब स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असुन जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात जिल्हा रुग्णालय परभणी येथे पूर्वीचे ८०३ व आज काल दाखल ५४ असे एकूण ८५७ संशयितांची नोंद झालेली आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

कराड तालुक्यात पुन्हा १४ रुग्ण पोझिटिव्ह, दिवसभरात तब्बल २४ नवे कोरोनाग्रस्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड मधील कोविड बाधित म्हणून प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील १४ अनुमानित कोविड बाधित असल्याचे आताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६९ वर पोहोचली आहे. यातील एकट्या कराड तालुक्यामध्ये तब्बल ५६ कोरोना बाधित रुग्ण असल्याने कराडकरांची चिंता वाढली आहे.

कराड मध्ये आज सकाळी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तसेच एका गर्भवती महिलेसह तिचा एक निकटवर्तीयाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर दुपारी पुन्हा २ जण कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मिळाली. आता १ मे रोजी रात्री उशिराने पुन्हा कराड तालुक्यात कोरोनाचे नवे १४ रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात कराड मध्ये तब्ब्ल 24 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार कराड मध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता ५६ झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर यांनी सदर माहिती दिली आहे.

आज सापडलेले रुग्ण हे प्रामुख्याने वनवसमाची, मलकापूर, आगाशिवनगर, कराड शहर या भागातील असल्याची चर्चा आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाकडून उद्या म्हणजे २ मे रोजी देण्यात येणार आहे.

आज सकाळी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे ६ आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने कराड वासियांसाठी हि धोक्याची घंटा मानली जात आहे. यामुळे कराड वासियांची झोप उडाली असून प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

इत्तर महत्वाच्या बातम्या –

तळीरामांसाठी गुड न्यूज वाईन्स शॉप, पान टपऱ्या सुरु होणार

आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

केंद्राची मोठी घोषणा! लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडणार

खुशखबर! घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त

राज्यात दिवसभरात १००८ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ११ हजार ५०६ वर