Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5852

राज्यात दिवसभरात १००८ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ११ हजार ५०६ वर

मुंबई । आज दिवसभरात राज्यात १००८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या यामुळे ११ हजार ५०६ वर पोहोचली आहे. आज १०६ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ५३ हजार १२५ नमुन्यांपैकी १ लाख ४० हजार ५८७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११ हजार ५०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६३ हजार २६ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ११ हजार ६७७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज राज्यात २६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ४८५ झाली आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेंटमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७९२ कंटेंटमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १० हजार ८४९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४५.३४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

कोरोनाग्रस्तांची जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे –

मुंबई महानगरपालिका: ७८१२ (२९५)
ठाणे: ५१ (२)
ठाणे मनपा: ४३८ (७)
नवी मुंबई मनपा: १९३ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: १७९ (३)
उल्हासनगर मनपा: ३
भिवंडी निजामपूर मनपा: १७ (१)
मीरा भाईंदर मनपा: १३५ (२)
पालघर: ४४ (१)
वसई विरार मनपा: १३५ (३)
रायगड: २६ (१)
पनवेल मनपा: ४८ (२)
ठाणे मंडळ एकूण: ९०८१ (३२०)

नाशिक: ६
नाशिक मनपा: ३५
मालेगाव मनपा: २०१ (१२)
अहमदनगर: २६ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ८(२)
धुळे मनपा: १८ (१)
जळगाव: ३४ (११)
जळगाव मनपा: १० (१)
नंदूरबार: ११ (१)
नाशिक मंडळ एकूण: ३६५ (३०)

पुणे:६८ (४)
पुणे मनपा: ११७६ (९२)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ७
सोलापूर मनपा: १०१ (६)
सातारा: ३२ (२)
पुणे मंडळ एकूण: १४५६ (१०७)

कोल्हापूर: ९
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: २९
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: २ (१)
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ५५ (३)

औरंगाबाद:२
औरंगाबाद मनपा: १५९ (८)
जालना: ३
हिंगोली: २२
परभणी: १ (१)
परभणी मनपा: २
औरंगाबाद मंडळ एकूण: १८९ (९)

लातूर: १२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ४
लातूर मंडळ एकूण: २० (२)

अकोला: १२ (१)
अकोला मनपा: २७
अमरावती: २
अमरावती मनपा: २६ (७)
यवतमाळ: ७९
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: २
अकोला मंडळ एकूण: १६९ (९)

नागपूर: ६
नागपूर मनपा: १३३ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १४४ (२)

इतर राज्ये: २७ (३)
एकूण: ११,५०६ (४८५)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

World Record । ‘रामायण’ ठरली जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिलेली मनोरंजन मालिका

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । ऐंशीच्या दशकातील भारताचे महाकाव्य पौराणिक कथा ‘रामायण’ च्या पुनःप्रसारणाने जागतिक स्तरावर सर्वोच्च विक्रम नोंदवला आहे. 16 एप्रिल 2020 रोजी प्रसारीत केले गेलेले प्रसारण हे जगभरातील 7.7 कोटी प्रेक्षकांनी पाहिले आहे.

लॉकडाउनच्या काळात सुरू झालेली ही मालिका TRP च्या बाबतीत सुरवातीपासून इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना मागे टाकत आहे. 16 एप्रिलच्या प्रसारणामुळे आता ही मालिकाजागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिलेली मनोरंजन मालिका ठरली आहे.

16 एप्रिल च्या प्रसारणामध्ये लक्ष्मण आणि मेघनाद इंद्रजित यांचे युद्ध दाखवण्यात आले होते. सदर प्रसंग हा दोन बलशाली युद्धवीर यांच्यातील होता. याच प्रसंगात हनुमानाने संजीवनी साठी उड्डाण केले होते. सदर संपूर्ण युद्ध प्रसंग हे एकूण तीन प्रसारण यांमध्ये दाखवले गेले आहे.

देशात प्रथमच हे मालिका 25 जानेवारी 1987 ते 31 जुलै 1988 या काळात प्रसारित झाली. त्यानंतर दर रविवारी सकाळी 9.30 वाजता टीव्हीवर हा कार्यक्रम प्रसारित होत असते. रामानंद सागर यांनी वाल्मिकीच्या रामायण आणि तुलसीदास यांच्या रामचरितमानसवर आधारित या मालिकेचे एकूण 78 भाग केले होते.

खचून चालणार नाही; काम तर करावंच लागणारंय – आरोग्य संचालिका

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयामध्ये ६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. यानंतर राज्याच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी खचून चालणार नाही, काम तर करावंच लागणारंय असे म्हणत त्यांनी संपूर्ण आरोग्य विभाग कराड उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

कराड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात सध्या ४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सहा कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य संचालिका पाटील यांनी रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी मनोधैर्य खचू न देता काम करण्याची गरज आहे. जेवढ्या सुविधा आहेत त्याप्रमाणचे येथे रुग्ण अ‍ॅडमिट केले जात आहेत. रुग्णातयाील कर्मचार्‍याचे मनाधैर्य खचून चालणार नाही. सर्वांना एकत्रितपणे काम करावे लागणार आहे. संपूर्ण आरोग्य विभाग त्यांच्या पाठीशी आहे, मदतीला आहे असे पाटील म्हणाल्या आहेत.

दरम्यान, आज दिवसभरात सातारा जिल्ह्यात एकूण ११ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यातील १० रुग्ण कराड मध्ये सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ५५ वर पोहोचली आहे.

तळीरामांसाठी गुड न्यूज वाईन्स शॉप, पान टपऱ्या सुरु होणार

नवी दिल्ली । देशभरातील तळीरामांना लॉकडाउनमध्ये एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कडक अटींसह ग्रीन झोनमधील दारू विक्रीची दुकान आणि पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. मात्र, हे करत असताना सोशल डिस्टंसिंगच कडक पालन करण्याच निर्बंध केंद्र सरकारने आपल्या आदेशात म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतच वृत्त ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे.

एएनआयच्या या ट्विटनुसार ग्रीन झोनमध्ये दारू विक्रीची दुकान आणि पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी देताना दोन ग्राहकांमध्ये किमान ६ फूट अंतर ठेवावं असं म्हटलं गेलं आहे. तसेच एका वेळी ५ पेक्षा जास्त ग्राहक दुकानांवर नसावेत असं (MHA) केंद्रीय गृहमंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या एएनआयच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, याबाबतची अधिकृत अधिकची माहिती मिळली नाही आहे. दरम्यान, देशातील लॉकडाऊन आणखी दोन आठवडे केंद्र सरकारं वाढवला आहे. आता १७ मेपर्यंत देशात लॉकडाऊन चालू राहणार आहे.

Capture133

काय आहेत अटी शर्थी?

वाइन शॉप्स, पानाची दुकानं फक्त ग्रीन झोनमध्येच उघडली जाणार.

खरेदी करताना ग्राहकांनी सहा फुटांचं अंतर राखणं आवश्यक.

एकावेळी शॉपमध्ये पाचपेक्षा जास्त लोक नकोत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

कराड तालुक्यात आणखी २ तर साताऱ्यात १ जण कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५५ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड कृष्णा मेडिकल कॉलेज येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित २ महिला (वय वर्षे 16 व 37) व क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मुबंईवरून 17 एप्रिल रोजी आलेला तरुण (वय वर्षे 27) अशा 3 नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते कोरोना बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

तसेच आज क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील २०, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील ७१, व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील ३ अशा एकूण ९४ नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यात 45 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आज सकाळी वेनुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे ६ आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता पुन्हा २ रुग्ण सापडल्याने एकाच दिवसात कराड तालुक्यात 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, कराड तालुक्यातील तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४२ झाली आहे तर सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५५ वर पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आधार संबंधी केंद्राचा मोठा निर्णय! आधार कार्ड वरील माहिती अपडेट करणे आता ‘इतके’ सोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला आधार कार्डमध्ये काही अपडेट करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आहे.सध्या ही केंद्रे लॉकडाऊनमुळे बंद आहेत.ज्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.आता मात्र तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) च्या माध्यमातून आपले आधार कार्ड अपडेट करू शकाल.यूआयडीएआयने सुमारे २० हजार सामान्य सेवा केंद्रांना आधार अपडेट्स करण्याची परवानगी दिली आहे.या सर्व केंद्रांवर आधार अपडेटची यंत्रणा सुरु करण्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे.

नाव, जेंडर आणि वय बदलण्याची सुविधा मिळेल
यूआयडीएआयने माहिती दिली की आता कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे आपले आधार कार्ड अपडेट केले जाऊ शकते.येथे केवळ डेमोग्राफिक डेटाच अपडेट करण्याच्या सुविधेस परवानगी मिळाली आहे. म्हणजेच, केंद्र संचालक आणि आधार वापरकर्त्यांची ओळख ही फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांच्या बाहुल्याद्वारे केली जाईल.मुलांचे बायोमेट्रिक्स तपशील सीएससीसह अपडेट केले जातील आणि पत्त्यातील बदल करणे देखील शक्य होतील.युआयडीएआयने सांगितले की ही प्रणाली जूनच्या अखेर पर्यंत तयार होईल.मुलांचे बायोमेट्रिक्स तपशील सामान्य सेवा केंद्रांमध्ये देखील अपडेट केले जातील तसेच पत्ता देखील बदलला जाईल. देशभरात २.७४ लाखाहून अधिक केंद्रे कार्यरत असून ग्रामीण भागात विविध प्रकारच्या सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे.

सीएससी व्यतिरिक्त इतर अनेक ठिकाणांहून आधार कार्ड अपडेट केले जाऊ शकतात
सीएससी व्यतिरिक्त लोक बँकांच्या शाखा, टपाल कार्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्येही यूआयडीएआयच्या मान्यताप्राप्त केंद्रांमध्ये आधाशी-जोडल्या गेलेल्या सेवा मिळवू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

खुशखबर! घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त

नवी दिल्ली । लॉकडाऊनच्या काळात नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. १ मे म्हणजे आजपासून गॅस सिलिंडर स्वस्त झालेत. राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडर १६२.५० रुपये स्वस्त झाले आहे. त्यामुळे तेथील ग्राहकांना ५८१.५० रुपये मोजावे लागतील.तर मुंबईत एपीजी गॅसची किमत ५७९ इतकी असेल. याआधी मुंबईकरांना ७१४.५० रुपये द्यावे लागत होते. कोलकातामध्ये किमती १९० रुपयांनी कमी झाल्या आहेत. तर चेन्नईत किमती ७६१ वरून ५६९.५० इतकी झाली आहे. अर्थात प्रत्येक राज्यात राज्य सरकारच्या करानुसार किमती कमी जास्त होतील.

इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतात त्यानुसार या किमती कमी झाल्या आहेत. अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कमी होण्याचे कारण गेल्या काही महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण होय. यामुळे सलग तिसऱ्यांदा अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. याचा देशातील १.५ कोटी ग्राहकांना फायदा होणार आहे. गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या असल्यातरी देशातील लॉकडाऊनच्या ३८ व्या दिवशी पेट्रेल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतूक बंद असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढवण्यात आल्याची घोषणा केली आहे. आता १७ मेपर्यंत देशात लॉकडाऊन चालू राहणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक रॉब गिब्स यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक रॉब गिब्स याचे नुकतेच निधन झाले आहे.ते ५५ वर्षांचे होते.पिक्सार स्टुडिओच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. रॉबच्या निधनामागचे कारण अद्यापही समोर आले नाहीये.रॉब हे गेली २० वर्ष हॉलिवूड सिनेमासृष्टीत काम करत होते.

रॉब यांनी पिक्सार स्टुडिओसाठी ‘टॉय स्टोरी २’, ‘फाइंडिंग निमो’, ‘इन्साईड आउट’, ‘मॉन्स्टर’, ‘कार टून्स’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपट तयार केले होते. आपल्या या सुपरहिट कार्टून चित्रपटांमुळे त्यांना लहान मुलांचा दिग्दर्शक म्हणूनही ओळखले जायचे.

 

 

पिक्सार स्टुडिओ हे आपल्या कार्टून चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे.रॉब गिब्स यांनी या स्टुडिओमध्ये लेखक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी ‘टॉय स्टोरी’ आणि ‘अ बग्स लाईफ’ या चित्रपटांसाठी स्टोरी बोर्ड तयार करण्याचे काम केले होते. त्यानंतर पाहता पाहता त्यांनी कार्टून चित्रपट तयार करण्याचे तांत्रिक तंत्र आत्मसात केले. त्यामुळे दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांना आपले हात आजमवण्याची संधी मिळाली.

आपल्याला मिळालेल्या या संधीचे सोने करत त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘द इन्क्रेडिबल’, ‘रॅटाटुई’, ‘द कार्स’ यांसारख्या ब्लॉगबस्टर चित्रपटांची निर्मिती केली. रॉब आपल्या कामात इतके तरबेज होते, की त्यांच्यामुळे पिक्सार स्टुडिओ थेट ऑस्करपर्यंत मजल मारु शकले. रॉब गिब्स यांच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

देशात लॉकडाऊन पार्ट ३; लॉकडाउन 17 मे पर्यंत वाढवण्याची केंद्राची घोषणा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवड्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी 3 मे नंतरच्या परिस्थिती विषयी चर्चा केली. मोदी सरकारनं आणखी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 17 मे पर्यंत हा लॉकडाऊन कायम राहणार आहे.

दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही  सवलती देण्यात येतील. परंतु रेड झोनमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी नव्या गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत. ग्रीन झोन्समध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही किंवा २१ दिवसांमध्ये करोनाचा एक नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

 ४ मेपासून पुढील दोन आठवडे हा लॉकडाउन लागू असणार आहे. या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचेही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केली होती. परंतु आता केंद्रीय गृहमंत्रालयानं पत्रक काढून लॉकडाउनचा कालावधी वाढवणार असल्याची घोषणा केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

पालघर हत्या प्रकरण सुप्रीम कोर्टात; राज्याला दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली । महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात गेल्या महिन्यात १६ एप्रिल रोजी दोन साधूंची आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमाकडून मारहाण व हत्या करण्यात आली होती. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहचलं आहे. एका याचिकेद्वारे या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्रात न होता दिल्लीत व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं या याचिकेची दखल घेत राज्य सरकारकला या प्रकरणात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

काय झालं सुप्रीम कोर्टात
सुप्रीम कोर्टात एका याचिकेच्या माध्यमातून पालघर प्रकरणाची चौकशी कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी किंवा सीबीआयने केल्या गेली. सोबतच या घटनेची सुनावणी महाराष्ट्रातून हलवून दिल्लीत करण्याची मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली. दरम्यान आज सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली. या सुनावणीत राज्यात सुरु असेलली चौकशी थांबवण्याची मागणी धुडकावून लावण्यात आली. तसंच कोर्टानं संबंधित याचिकेची प्रत याचिकाकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वकिलांना उपलब्ध करून द्यावी असं म्हटलं. तसंच राज्यानं सुप्रीम कोर्टाकडे ४ आठवड्यांत प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश कोर्टानं दिले आहेत.

पालघरमध्ये अफवांच्या पार्श्वभूमीवर जमावाच्या मारहाणीत दोन साधूंचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तातडीनं या घटनेवर भाष्य करत या घटनेला धार्मिक रंग देऊन त्याचं राजकारण न करण्याचं आवाहन केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”