Monday, December 22, 2025
Home Blog Page 5850

सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडे Aarogya Setu अ‍ॅप असणं बंधनकारक- केंद्र सरकार

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. या काळात सर्व प्रशासनिक यंत्रणा कोरोनाच्या छायेत काम करत आहेत. अशा वेळी सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप फोनमध्ये डाऊनलोड करणे बंधनकारक असेल, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १०० टक्के म्हणजे सर्व कर्मचार्‍यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असेल हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांच्या प्रमुखांची असेल’, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट केले आहे.

आरोग्य सेतू हे अ‍ॅप करोना व्हायरसला रोखण्याच्या हेतूने डिझाइन केलेले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे सर्व लोक त्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करतील याची स्थानिक प्रशासनाने खात्री करावी, असेही गृह मंत्रालयाने म्हटले आहे.दरम्यान, आरोग्य सेतू अ‍ॅप सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले होते. पण, आता सरकारने खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनाही हे अ‍ॅप बंधनकारक केले आहे.

असं काम करत आरोग्य सेतू अ‍ॅप
करोना व्हायरसच्या धोक्यापासून युजरला अलर्ट करतं. हे अ‍ॅप संपर्क ट्रेसिंगद्वारे आणि युजर्सच्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे त्याच्याभोवती कोरोना संक्रमित असेल तर त्याची माहिती देते. याशिवाय या साथीच्या आजाराशी संबंधित बरीच महत्वाची माहितीही दिली जाते. कोरोना संसर्गापासून बचाव आणि लक्षणांचीही माहिती मिळते. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा देशाला केलेल्या संबोधनात आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केलं होत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ५ जण गंभीर, लहान मुलीचा मृत्यू

महोबा । उत्तर प्रदेशातील महोबामध्ये कलिंगड खाल्ल्याने एका कुटुंबातील पाच लोक आजारी पडले आहेत. उलट्या आणि अतिसार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महोबा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील प्रत्येकावर महोबा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्नातू विषबाधा झाली असल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे.

https://hellomaharashtra.in/other/health/coronavirus-outbreak-nyc-government-organisation-says-you-should-masturbate-dmp/

हाती आलेल्या माहितीनुसार, ही घटना महोबामधील पनवाडी या भागातील अग्निहोत्रीपुरा मोहल्ला येथे घडली. जिथे नरेंद्र, त्यांची पत्नी मीरा आणि तीन मुलांनी कलिंगड खाल्ल्यानंतर सर्वांना पोटदुखी होऊ लागली. नरेंद्र व्यवसायाने जेवण बनविण्याचे काम करतो पण लॉकडाऊनमुळे त्यांना काम मिळत नव्हते. असे म्हटले जात आहे की भूक भागवण्यासाठी त्याने स्वतः कलिंगड खाल्ले. तसेच त्याने तो आपली पत्नी आणि मुलांनाही दिला.

https://hellomaharashtra.in/other/health/is-coronary-medicine-hidden-in-the-deep-sea-see-what-the-researchers-are-saying/

मात्र कलिंगड खाल्ल्यामुळे नरेंद्र, त्याची पत्नी मीरा आणि मुलांची प्रकृती खालावू लागली. उलट्या, अतिसाराचा त्रास झालेल्या या कुटुंबाला रुग्णवाहिकेतून पानवाडी आरोग्य केंद्रात आणण्यात आले. येथे नरेंद्र यांची मुलगी वर्षा हीची प्रकृती गंभीर बनली आणि तिने प्राण सोडले. उर्वरित चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्यांना महोबा जिल्हा रुग्णालयात हलवले. तिथे उर्वरित चौघांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की अन्नातील विषबाधामुळे हे सर्वजण आजारी पडले.

https://hellomaharashtra.in/other/health/another-great-crisis-on-earth-a-hole-in-the-weight-layer/

कलिंगडातून विषबाधा होऊ शकते का?
कलिंगड गोड आणि रंगीबेरंगी बनविण्यासाठी कधीकधी त्यामध्ये केमिकल, सॅकरिन आणि रंगीत द्रावण टाकले जाते. अशा कृत्रिम रंग आणि केमिकलमुळे कलिंगड विषारी असू शकतो जे खाल्ल्यानंतर आरोग्यास हानी पोहोचू शकते. मात्र याचा अर्थ असा नक्कीच होत नाही कि सर्व कलिंगडातुन विषबाधा होऊ शकते. तेव्हा या घटनेची भीती मनात धरून कलिंगण घायचे सोडू नका. मात्र कलिंगड विकत घेताना ते व्यवस्थित पारखून घ्या. उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगड खाणे आरोग्यास फायद्याचे असून त्यामुळे आपल्या शरीरातील तापमान स्थिर राहण्यास मदत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

https://hellomaharashtra.in/other/health/what-is-connection-between-bats-coronavirus-icmr-report/

आखातात अडकलेल्या भारतीयांच्या ‘घरवापसी’साठी नौदलाच्या १४ युद्धनौका सज्ज

नवी दिल्ली । जगभरात कोरोनाच्या विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर परदेशात राहणारे असंख्य भारतीय अडकून पडले. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली. परिणामी अनेक भारतीय जगातील विविध भागात अडकले. आता या सर्व भारतीयांना परत मायदेशी आणण्याची तयारी केंद्र सरकारनं सुरु केली आहे. त्यानुसार आखाती देशात अडकून पडलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी भारतीय नौदल पुढे सरसावलं आहे.

भारतीयांच्या घरवापसीची जबाबदारी घेत भारतीय नौदलाच्या १४ युद्धनौका आखाती देशांच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यातील ४ वेस्टर्न कमांडमध्ये, ४ पूर्वेकडील कमांडमध्ये आणि ३ दक्षिणी कमांडमध्ये आहेत, अशी माहिती नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल जी अशोक कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील आयएनएस आंग्रे येथे एकूण ३८ जणांना नौसैनिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर २ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहितीही अ‍ॅडमिरल अशोक कुमार यांनी एएनआयला दिली. आमच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांमध्ये कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही, असेही ते पुढे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील २ पोलिस पॉझिटिव्ह, राज्यभरात सुमारे ३०० हून अधिक पोलिस कोरोनाग्रस्त

सोलापूर प्रतिनिधी । ग्रामीण भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पोलीस आयुक्त कार्यालयाला प्राप्त झालेल्या निर्देशानुसार पोलीस आयुक्तांनी शहर पोलीस आयुक्तालयाच्या शेजारी राहणाऱ्या ग्रामीण पोलीस मुख्यालयाचा एक किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. तो भाग नागरिकांना ये-जा करण्यासाठी प्रतिबंधित केला असून त्या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.

कोरोनाच्या वैश्विक संकटाला हद्दपार करण्यासाठी राज्यभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या 210 पैकी तब्बल 180 मार्ग बंद करून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, आज ग्रामीण भागात बंदोबस्त देणाऱ्या आणि शहरातील पोलीस मुख्यालयात राहणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार शहर पोलिस मुख्यालयाच्या शेजारील ग्रामीण मुख्यालयाचा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे.

आतापर्यंत सोलापुरात सापडलेल्या 111 रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील दोनच रुग्ण आहेत. सांगोला तालुक्यातील घेरडी तर मोहोळ तालुक्यातील पाटकुल याठिकाणी कोरोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. उर्वरित तालुक्यांमध्ये अद्यापही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही. परंतु, ग्रामीण मुख्यालयात राहणाऱ्या या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमका कुठे होता, त्यांना कोणत्या ठिकाणी, कोणाच्या संपर्कातून कोरोना झाला, याचा तपास आता युद्ध पातळीवर सुरु झाला आहे.

राज्यभरात सुमारे तीनशेहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून सोलापूर शहर जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी व अधिकारी कोरोना शहरापासून चार हात लांब होते. मात्र, शनिवारी ग्रामीण मुख्यालयात राहणारे दोन पोलीस कर्मचारी कोरून पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ माजली आहे. ते दोन पोलीस कर्मचारी कोणत्या ठिकाणी बंदोबस्तासाठी होते याची माहिती तूर्तास मिळू शकली नाही. यासंदर्भात पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

लॉकडाऊन बळी! घरी चालत निघालेल्या मजुराने अर्ध्या रस्त्यातच गळफास लावून संपवला जीवनप्रवास

वर्धा । लॉकडाऊनमुळे हैद्रबादहून घरी चालत निघालेल्या एका स्थलांतरित मजुराने वर्ध्याजवळ पोहचताच शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरसिंह मडावी असं या मजुराचं नाव आहे. अमरसिंगने हैदराबादवरून चालत ४५० किमी अंतर कापलं होतं. मात्र, नागपूर-वर्धा सीमेवर गिरड येथे पोहोचल्यावर प्रचंड थकवा आणि हताश होत त्याने तिथेच एका शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

गिरड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भर उन्हात सलग चालून त्यांना थकवा आला होता. गुरुवारी पाच वाजण्याच्या सुमारास आम्हाला एका शेतकऱ्याने फोन करुन यासंबंधी माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलो असता अमरसिंह यांनी टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचं आम्हाला दिसलं. अमरसिंगच्या मृतदेहाची तपासणी केली असता पोलिसांना यावेळी अमरसिंह यांच्या खिशात मोबाइल मिळाला. मोबाइल स्वीच ऑफ असल्याने पोलिसांनी तो चार्ज केला आणि त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह कुटंबाच्या ताब्यात दिला आहे.

अमरसिंहचा हैद्राबादवरुन घरच्या दिशेने पायी प्रवास एकूण २० जणांसोबत सुरु झाला होता. दरम्यान रस्त्यात एका ट्रक चालकाने या सर्वांना आपल्यासोबत घेतलं होतं. रस्त्यात जेवणासाठी ट्रक थांबला होता. प्रवास पुन्हा सुरु झाला तेव्हा ट्रक अमरसिंह यांना न घेताच निघून गेला. यामुळे अमरसिंग प्रचंड निराश झाले होते असंही पोलिसांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

गुड न्यूज! Amazon-Flipkart ची सर्व्हिस पुन्हा सुरु होणार

नवी दिल्ली । केंद्र सरकारने लॉकडाउन अजून दोन आठवड्यांसाठी वाढवला. लॉकडाउनचा तिसरा टप्पा 4 मे ते 17 मेपर्यंत असेल. या लॉकडाउनबाबतचं एक चांगलं वृत्त म्हणजे, अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या अत्यावश्यक नसलेल्या सामानांचीही डिलिव्हरी करु शकणार आहेत. केंद्रानं काही अटींसह यासाठीची परवानगी दिली आहे.

अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना अनावश्यक सामानांची डिलिव्हरी करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. पण, ही परवानगी केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्येच असेल. रेड झोनसाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सामानांचीच डिलिव्हरी केली जाईल.

यानुसार, आता ४ मेपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील लोकं इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन स्मार्टफोन, लॅपटॉप, AC,फ्रिज, कंप्यूटर हार्डवेअर यासारखी अत्यावश्यक नसलेली पण गरजेच्या सर्व वस्तू खरेदी करु शकणार आहेत. याशिवाय ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ओला, उबेरसह खासगी टॅक्सी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र चालकासह केवळ २ जणांनाच प्रवास करता येईल. खासगी ४ चाकीसाठीही हा नियम कायम असेल.

रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन काय आहे ?

सरकारने करोना व्हायरसला रोखण्यासाठी देशातील जिल्ह्यांची तीन विभागात विभागणी केली आहे. रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन गटात विभागले आहे. ज्या जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. ते जिल्हे रेड झोनमध्ये ठेवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी १४ दिवसांहून अधिक दिवस करोनाचा संसयीत रुग्ण आढळला नाही. ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले. तसेच गेल्या २१ दिवसांपासून कोणताही संसर्ग झालेली व्यक्ती आढळली नाही. अशा जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये ठेवण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

RBI ने रद्द केला या बँकेचा परवाना; महाराष्ट्रातील लाखो खातेदारांना बसणार फटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सीकेपी सहकारी बँक लिमिटेडच्या ग्राहकांना धक्का देताना या बँकेचा परवाना रद्द केला आहे. मनीकंट्रोलच्या मते, यामुळे सुमारे १.२५ लाख बँक खातेदारांवर संकट उभे राहिले आहे. बॅंकेची ४८५ कोटींची एफडी देखील यामुळे अडकल्या आहेत.

२०१४ पासून आरबीआय सतत बँकेवरील बंदीची मुदत वाढवत होता.यापूर्वीही ३१ मार्च रोजीची मुदत ही ३१ मेपर्यंत वाढविण्यात आली होती, परंतु आरबीआयने त्यापूर्वीच बँकेचा परवाना रद्द केला आहे.

सीकेपी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द का झाला आहे ? मनीकंट्रोलच्या स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीकेपी सहकारी बँक लिमिटेडच्या नेटवर्थमध्ये घट झाल्यामुळे त्यांचा परवाना हा रद्द करण्यात आलेला आहे.चालू नफा असूनही नेट वर्थ घटल्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

>> सीकेपी-बँकेचे मुख्यालय दादर, मुंबई येथे आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार २०१४ मध्ये बँकेचा तोटा वाढल्यामुळे तसेच त्यांच्या निव्वळ संपत्तीत मोठी घसरण झाल्यामुळे बँकेच्या व्यवहारावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर बँकेचा तोटा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले.

>> गुंतवणूकदार-ठेवीदारांनी यासाठी प्रयत्नही केले. त्यांनी व्याज दरात कपातही केली होती.व्याजदर हा दोन टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला होता.

>> काही लोकांनी स्टॉकमध्ये त्यांच्या एफडीची गुंतवणूक केली होती आणि काही प्रमाणात त्याचे परिणामही दिसू लागले होते.

>> बँकेचा तोटा कमी होत होता,पण अशा परिस्थितीत आरबीआयने सीकेपी बँकेचा परवानाच रद्द करून गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

किम जोंग उन अभी जिंदा है! एका कार्यक्रमातील फोटो प्रसिद्ध

वृत्तसंस्था । मागील काही आठवड्यांपासून उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी अखेर सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. उत्तर कोरियाच्या शासकीय माध्यमांनी किम जोंग उन यांचा एका कार्यक्रमातील फोटो प्रसिद्ध केले आहेत. किम जोंग उन यांनी शुक्रवारी एका खत कारखान्याचे उद्घाटन केले. त्याचे फोटो उत्तर कोरियातील माध्यमांनी प्रकाशित केले आहेत.

किम जोंग उन या फोटोत लाल फित कापून कारखान्याचे उद्घाटन करताना दिसत आहेत. यावेळी किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम असल्याचेही दिसत आहे. फोटोत त्यांच्याशिवाय त्यांची बहीण किम यो जोंग आणि काही अधिकारी दिसत आहेत. त्याशिवाय किम यांनी १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली असल्याचे म्हटले आहे. यावेळी हजारो कोरियन नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. उत्तर कोरियाने हे फोटो प्रकाशित केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

किम जोंग उन हे याआधी ११ एप्रिल रोजी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर १५ एप्रिल रोजी उत्तर कोरियाचे दिवंगत कम्युनिस्ट नेते आणि त्यांचे आजोबा किम जोंग इल यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. हृदयावरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर किम यांची प्रकृती ढासळली असल्याचे वृत्त सीएनएनने दिले होते. त्यानंतर जगभरात त्यांच्याबाबत चर्चा सुरू झाली होती. चीनने देखील एक डॉक्टरांचे पथक उत्तर कोरियाला पाठवले असल्याचे वृत्त राउटर या वृत्तसंस्थेने दिले होते.त्यानंतर तर किम जोंग उन काही दिवसात कालवश होण्याच्या वावड्यासुद्धा अनेक प्रसार माध्यमात उठत होत्या मात्र, आता किम जोंग यांचा जाहीर कार्यक्रमातील फोटो समोर आल्यांनतर त्याच्या मृत्यूच्या चर्चांना कदाचित विराम लागेल असं दिसतंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘रामराज्य’ कि ‘कोरोना साम्राज्य’! रस्त्यावर पडलेले २५ हजार रुपये कोणीच उचलले नाही

बिहार । भारतात रामराज्य परत आलंय. तुम्ही म्हणालं कसं? जवळपास २५ हजार रुपयांचं बंडल रस्त्यावर पडलेलं असताना कोणीही त्याला हात लावला नाही. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? हे कलियुग आहे १ रुपया जरी रस्त्यावर कोणाला दिसला तरी लोक चटकन लक्ष्मीचं वरदान समजून खिशात टाकतात आणि इथे तर २५ हजार आहेत. पण असं खरचं घडलं आहे. बिहार राज्यात अशीच एक घटना घडल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

रस्त्यावर २५ हजाराचा पडले असताना त्याला कोणीही हात लावला नाही. आणि ज्या व्यक्तीच्या खिशातून हे २५ हजार रुपये रस्त्यावर पडले, ते त्याला सुखरुप परत मिळाले आहेत. हा रामराज्य पुन्हा आल्याचा अनुभव रामानंद सागर यांच्या टीव्हीवर पुन्हा प्रसारित झालेल्या रामायण या मालिकेमुळे कदाचित आला असं आपण म्हणू. पण खरं तर देशातील कोरोनाच्या विषाणूरुपी राक्षसानं जे थैमान घातलं आहे. त्या भीतीनं रस्त्यावरचे पैसे उचलायला कोणी धजावत नाही आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार गजेंद्र शाह या व्यावसायिकाच्या खिशातून नोटांची बंडल रस्त्यावर पडली होती. “माझ्या खिशातून काहीतरी काढत असताना २५ हजार रुपयांची बंडल रस्त्यावर पडली. मला ती नोटांची बंडल जशीच्या तशी परत मिळाली. कारण करोना व्हायरसच्या भीतीमुळे त्याला कोणीच हात लावण्याची हिंमत करू शकला नाही. एका सज्जन व्यक्तीने पोलिसांना फोन केला आणि ती रक्कम उचलण्यास सांगितली,” असं गजेंद्र शाह म्हणाले. मधेपुरा जिल्ह्यात ही घटना घडली.

‘रस्त्यावर पडलेलं नोटांचं बंडल पाहून काही लोक जमा झाले होते, पण त्याला हात लावण्याचं धैर्य कोणालाच होत नव्हतं. करोना व्हायरसची दहशत लोकांमध्ये होती. त्यामुळे त्यातल्या एकाने किशनगंज पोलीस ठाण्याला फोन करत ही बाब सांगितली’, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सर्व खातरजमा केल्यानंतर गजेंद्र यांना त्यांचे पैसे परत केले. दरम्यान, नोटांच्या माध्यमातून कोरोना फैलाव करण्याचा प्रयन्त केला जात असल्याच्या अनेक अफवा सध्या उडत आहेत त्यामुळे रस्त्यावर पडलेले पैसे कोणी उचलले नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

इटलीत २ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण, मृतांची संख्या २८ हजार पार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटलीमध्ये कोरोनाव्हायरस या साथीच्या आजारामुळे संक्रमित लोकांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे.येथील नागरी संरक्षण विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोविड -१९ च्या संसर्गाच्या एकूण २ लाख ७ हजार ४२८ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी २८ हजार २३६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

शिन्हुआने आपल्या अहवालात म्हटले आहे की गेल्या २४ तासांत येथे २६९ नवीन रुग्ण आढळले आहेत आणि गुरुवारीच्या तुलनेत उपचारानंतर एकूण २,३०४ नवीन लोक बरे झाले आहेत.त्याच वेळी, देशातील कोरोना संक्रमणाच्या एकूण प्रकरणांपैकी ७८ हजार २४९ उपचारानंतर बरे झाले आहेत.

Covid-19: US records 1,150 coronavirus deaths in 24 hours: Johns ...

नागरी संरक्षण विभागाच्या बुलेटिननुसार सक्रिय संक्रमणांची संख्या १५७८ प्रकरणांवरून कमी होऊन एकूण एक लाख ९४३ वर आली आहे.सध्या एकूण सक्रीय संसर्गांपैकी १ हजार ५७८ लोकांना इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (आयसीयू) दाखल केले आहे तर गुरुवारच्या तुलनेत यामध्ये दिवसभरापूर्वी ११६ रुग्णांची घट झाली आहे. त्याचबरोबर गुरुवारी एकूण १७,५६९ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मात्र गेल्या २४ तासांच्या तुलनेत ही आकडेवारी देखील ५८० ने कमी झाली आहे.

US coronavirus death toll rises to 9, mortality rate of COVID-19 rises

इमरजंसीच्या तथाकथित दुसर्‍या टप्प्यात उत्पादन, बांधकाम आणि घाऊक क्षेत्रातील उत्पादक उपक्रम ४ मेपासून पुन्हा सुरू करण्यास तयार असतील.लॉकडाऊन हळूहळू कमी करण्याची सरकारची योजना आहे तसेव्ह किरकोळ विक्रेते, संग्रहालये, गॅलरी आणि लायब्ररी या १८ मेपासून उघडल्या जाऊ शकतात. त्यानंतर पुन्हा १ जूनपासून बार, रेस्टॉरंट्स, हेयरड्रेसर आणि ब्युटी सलूनमध्ये काम करण्यास परवानगी दिली जाईल.

Containing the Coronavirus: What's the Risk to the Global Economy ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.