Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5854

कोरोनाच्या लढ्यात लता दिदींचा उद्धव ठाकरेंना आशीर्वाद; जिजाऊ-शिवबांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या..

मुंबई । ”शिवछत्रपतींच्या या महाराष्ट्राने अनेक संकटाचा सामना केलेला आहे आणि मला खात्री आहे की कोरोनाच्या या संकटावरही महाराष्ट्र यशस्वीपणे मात करेल आणि तुमच्या नेतृत्वाखाली उतरोत्तर प्रगती करत राहील,” असं म्हणत लता दीदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी एका जुन्या मराठी चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्यातील एका संवादाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.

दरम्यान, आज महाराष्ट्रात दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र  कोरोनाची लढाई यशस्वी करण्याच्या दिशेनं कसे प्रयन्त करत आहे याची माहिती दिली. तसेच राज्यात कोरोनाचे रुग्ण लवकर बरे होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरे यांचा जनता संवाद टीव्हीवर आज लता दीदी सुद्धा पाहत होत्या. म्हणून यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या माहितीबाबत समाधान व्यक्त करत लता दीदींनी आणखी एका करत त्या ट्विटमध्ये लिहलं कि, “नमस्कार…महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी आणि समस्त ठाकरे परिवार व त्यांचे सर्व सहकारी यांना महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा. आज उद्धवजींनी सांगितले की, या आजारातून वेगवेगळ्या वयोगटातले अनेक लोक बरे होत आहेत, हे ऐकुन समाधान वाटले,” असं लता दीदींनी ट्विटमध्ये म्हटलं.

उद्धव ठाकरे यांनीही यावेळी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना लता मंगेशकर यांची एक आठवण सांगितली आहे. “मुख्यमंत्री म्हणून हुतात्म्यांना वंदन करताना मनात आलेल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ठाकरे घराण्याचाही सहभाग होता. हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करण्याचं आधी ठरवलं होतं,पण आता नाईलाज आहे. लतादीदींनी २०१० मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी बीकेसीतील मैदानात ‘बहु असोत सुंदर’ गाणे गायल्याची आठवण झाली, आज त्याच जागी कोविड रुग्णांसाठी उपचार केंद्र आहे”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

आजच्याच दिवशी लिस्ट ए किंवा एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात झाली,जाणून घ्या पहिला सामना किती षटकांचा होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आजपासून बरोबर ५७ वर्षांपूर्वी मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यास सुरुवात झाली, ज्यामध्ये भारतीय फलंदाजांनी,विशेषत: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने आपली खास छाप सोडली.नवीन प्रेक्षकांना क्रिकेटशी जोडण्यासाठी इंग्लंडने क्रिकेटचे हे नवीन स्वरूप सुरू केले आणि पहिला सामना लॅंकेशायर आणि लीसेस्टरशायर यांच्यात १ मे १९६३ रोजी खेळला गेला.

या सामन्यावर पावसाचा परिणाम झाला आणि दुसर्‍या दिवशी (राखीव दिन) याचा निकाल लागला.आजच्याप्रमाणे हा सामना ५० षटकांचा नाही तर ६५ षटकांचा होता, ज्यामध्ये लॅंकेशायरचा पीटर मार्नर शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला तर ब्रायन स्टॅथम (२८ रन २ विकेटस) च्या शानदार गोलंदाजीसह लँकशायरने १०१ धावांनी दणदणीत विजय मिळविला.

The Definitive: Dennis Amiss | All Out Cricket | England Cricket

क्रिकेटच्या या नवीन फॉरमॅटला लिस्ट ए असे नाव देण्यात आले आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय रूपाला वनडे हे नाव दिले गेले.काहींनी याला इन्स्टंट क्रिकेट ही म्हटले आणि समीक्षकांनी यावर ‘पायजामा क्रिकेट’ अशी टीका केली.यानंतर क्रिकेटमध्ये टी -२० सारखे लहान स्वरुप जोडले गेले.

लिस्ट ए क्रिकेट या नंतर खूप पुढे गेले.यामुळेच क्रिकेटमध्ये वर्ल्ड कपचेही आयोजन करण्यात आले होते,तर काही क्रिकेटर्सना आपली खास कामगिरी दाखविण्याची संधी मिळाली.मर्यादित षटकांच्या या क्रिकेटमुळे सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके पूर्ण केलीत.

सचिनने एकदिवसीय सामन्यात ४९ शतकांच्या मदतीने १८४२६ धावा केल्या आहेत.ग्रॅहम गूच (२२२११) आणि ग्रॅम हिक (२२०५९) नंतर लिस्ट ए मधील फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Graeme Hick's 405: 30 years on, an oral history of an era-defining ...

सचिनने लिस्ट ए मध्ये २१९९९ धावा केल्या आहेत ज्यामध्ये ६० शतके झळकावली आहेत जो एक विश्वविक्रम आहे.शतकांच्या बाबतीत कोहली सचिनचा रेकॉर्ड मोडू शकतो त्याच्या नावावर ४७ शतके जमा आहेत.कोहलीने आतापर्यंत २८२ सामने खेळून लिस्ट ए मध्ये १३,३०९ धावा केल्या आहेत.हिकने ६५१ सामने तर गूचने ६१३ सामने खेळले आहेत.

तेंडुलकरसह (५५५) एकूण १४ खेळाडूंनी ५०० किंवा त्याहून अधिक लिस्ट ए सामने खेळले आहेत.एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने जरूर सर्वोच्च धावसंख्या केली असेल,पण लिस्ट ए मधील विक्रम मात्र इंग्लंडच्या अ‍ॅलिस्टर ब्राउनच्या नावावर आहे.त्याने ओवल येथे २००२ मध्ये सरेकडून खेळताना ग्लोमर्गनविरुद्ध २८८ धावा केल्या.

कोलकात्यात रोहितचा श्रीलंकेविरुद्ध केलेल्या २६४ धावांची नोंद या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे.लिस्ट ए मध्ये सर्वाधिक विकेटस पाकिस्तानच्या वसीम अक्रम (८८१) च्या नावावर नोंदवल्या गेल्या पण सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा विक्रम एक भारतीय शाहबाज नदीमच्या नावावर आहे.

त्याने झारखंडविरुद्ध २०१८-१९ च्या मोसमात राजस्थानविरुद्ध दहा धावा देऊन आठ विकेट्स घेतल्या होत्या.नदीमने दुसर्‍या भारतीय राहुल सिंघवीचा विक्रम (१५ धावा देऊन आठ विकेट्स, दिल्ली विरुद्ध हिमाचल प्रदेश,सन १९९७-९८) मोडला होता.

अनिल कुंबळे (५१४) हा लिस्ट ए मधील सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे.भारताचा आणखी एक माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक स्टंप्स (१४१) चा विश्वविक्रम नोंदविला आहे. इंग्लंडचा स्टीव्ह रोड्स हे यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी (६६१) घेणारे ठरले.

Anil Kumble, - CricketAddictor

अद्याप कोणत्याही संघाने लिस्ट ए मध्ये ५०० धावा केलेल्या नाहीत.सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सरेच्या नावावर आहे,त्यांनी २००७ मध्ये ओव्हलवर ग्लॉस्टरशायरविरुद्ध ४९६ धावा केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रशियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण

मॉस्को । कोरोना हल्ला करताना व्यक्ती किंवा पद पाहत नाही याची प्रचिती देणारी एक बातमी समोर आली आहे. जगभरातील काही महत्त्वाच्या व्यक्तींना कोरोनाची लागण झालेल्यांच्या यादीत आता रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांचे नाव जोडले गेले आहे. आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती मिखाइल यांनी स्वत: दिली. याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती.

काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांनी राष्ट्रपती व्लामदिर पुतीन यांच्यासोबत बैठक केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोना झाल्यामुळे स्वतःला क्वारंटाइन केले असून डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मिखाईल यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली. त्याशिवाय उपपंतप्रधान अँड्रे बेलासॉ यांना हंगामी पंतप्रधान म्हणून काम करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता उपपंतप्रधान अँड्रे बेलासॉ हे रशियाचे प्रभारी पंतप्रधान म्हणून देशाची धुरा सांभाळणार आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये रशियात करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. रशियामध्ये सुमारे १ लाख जणांना करोनाची बाधा झाली असून १ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान मिखाईल हे करोनाबाधित असलेले पहिले महत्त्वाचे व्यक्ती आहेत. मिखाईल यांना ताप असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून इतर कोणती लक्षणे आढळली याबाबत अधिक माहिती समोर आली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

यामुळेच अमिताभ बच्चन ऋषी कपूरला भेटायला कधीही रूग्णालयात गेले नाही, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूरने ३० एप्रिल रोजी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच ते बर्‍याच काळापासून कर्करोगाशीही लढाही देत होते. ऋषी कपूर यांचे निधन झाल्याची बातमी अमिताभ बच्चन यांनी ट्वीटद्वारे दिली होती. अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूरची आठवण ठेवणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

कपूर यांच्या अंत्यसंस्कारात अमिताभ बच्चन उपस्थित राहिल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांच्या ‘सरगम’ चित्रपटाची भावनिक पोस्ट म्हणून डफली गाण्याचे व्यंगचित्र शेअर केले आहे. त्यामध्ये त्यांनी ऋषी कपूरबरोबरची आपली पहिली भेट आणि त्यांना रुग्णालयात न भेटल्याचे कारण सांगितले आहे. त्यांनी लिहिले – चिंटूशी माझी पहिली भेट त्यांच्या घरी झाली होती. कपूर यांचे वडील राज कपूर यांनी मला एकदा त्यांच्या घरी बोलावले होते. माझ्या पहिल्या भेटीतच चिंटू खूप खोडकर आहे हे मी ओळखले होते.

अमिताभ बच्चन म्हणाले की आम्ही बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले आहे. सेटवर तो नेहमी हसत असायचा.जर तो जवळच असेल तर कोणतेही प्रेशर तुम्हांला येणार नाही. मात्र, यानंतर बॉबी या चित्रपटामुळे ऋषीशी माझ्या भेटी सतत वाढत गेल्या. “मला त्याच्या हसतमुख्या चेहर्‍यावर त्रास कधीच पहायचा नव्हता, परंतु मला खात्री आहे की जेव्हा तो गेला तेव्हा तो हसत हसतच गेला असावा.”

अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिले- ऋषी कपूर कितीही आजारी असले तरी ते रुग्णालयात जाताना पूर्णपणे सामान्य दिसत होते. जणू काहीच झाले नाही आणि ते नेहमी म्हणायचे की मी ठीक आहे. मी कधीच त्याला भेटायला रुग्णालयात गेलो नाही. त्यांच्या हसतमुख चेहऱ्यावरचे दुःख मला कधीच दिसले नाही. मला माहित आहे जेव्हा तो गेला असेल तेव्हाही त्याच्या चेहऱ्यावर हास्यच असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आम्ही’पुन्हा प्रयत्न करू’ असे अनेकांना वाटत होते पण आता.. जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

मुंबई । देशासह संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढा देत असताना काहीजण राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. लोकशाहीच्या तथाकथित गळचेपीबाबत अनेकांनी राज्यपालांना पत्र लिहिली. तर काहींनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार अस्थिर होईल आणि आम्ही ‘पुन्हा प्रयत्न करू’ असे अनेकांना वाटत होते, पण अशांच्या हाती अपयश आले आहे, असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता काढला.

राज्यातील विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोगाला पत्र लिहून विधान परिषदेच्या निवडणुका घेण्याची विनंती केली होती. निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर निवडून जातील आणि तेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील, असा ठाम विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त २ रिक्त जागांपैकी एका जागेवर उध्दव ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने २ वेळा राज्यपाल भगतसिह कोश्यारींकडे केली. मात्र त्याबाबत काहीही निर्णय झाला नाही. म्हणूनच या ९ जागांसाठी निवडणूक लवकर घेण्यात यावी अशी विनंती महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे केली होती. दरम्यान, राज्यात कोरोनाचं संकट असताना काही लोक राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र निवडणूक आयोगाच्या आजच्या निर्णयामुळे राज्य सरकार अस्थिर करू पाहणाऱ्यांच्या हाती अपयश आलं आहे, असा टोलाही पाटील यांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

संजय दत्तने अभिनेते ऋषी कपूर यांच्या स्मरणार्थ लिहिली भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले.६७ वर्षीय ऋषी कपूर यांना श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.याची पुष्टी त्यांचे भाऊ आणि अभिनेता रणधीर कपूर यांनीही केली.ऋषी कपूर यांचे निधन, तसेच ऋषी कपूर यांच्या निधनाने समस्त बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच संपूर्ण देशाला दुःख झाले आहे.अशातच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यानेही ट्विट करून ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता संजय दत्तने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे,’प्रिय चिंटू सर, माझ्या आयुष्यासाठी आणि करिअरसाठी तुम्ही नेहमीच प्रेरणास्थानी आहात. तुम्ही मला चांगले आयुष्य जगण्यास शिकवले आणि माझे वाईट दिवस असतानाही मला आयुष्याचा सामना करायला सांगितलेत.तुम्ही नेहमीच मला मार्गदर्शन केलंत.अनेक चित्रपटांत तुमच्याबरोबर काम करण्याचा मला बहुमान मिळाला.कर्करोगाविरूद्ध तुमची लढाई बराच काळ चालू होती.पण मला कधीच असं जाणवू दिले नाही की तुम्ही या आजाराशी संघर्ष करीत आहात,मी तुमच्याशी न्यूयॉर्कमध्ये बोललो तेव्हादेखील नाही… त्यावेळी तुम्ही परिपूर्णच वाटत होता. ‘

संजय दत्तने पुढे लिहिले की, काही महिन्यांपूर्वी घरी डिनरच्या वेळी मी तुम्हाला शेवटचे भेटलो होतो तेव्हासुद्धा तुम्ही माझ्याच काळजीत होतात.तुम्ही नेहमीच माझी काळजी घेतलीत.आज माझ्यासाठी सर्वात वाईट दिवस आहे,कारण मी माझ्या कुटुंबातील एक सदस्य,मित्र, भाऊ आणि मला हसत आयुष्य जगण्यास शिकवणारी एक व्यक्ती गमावली, काहीही झाले तरीही. मला तुझी खूप आठवण येईल देवाची कृपा सदैव तुमच्या बरोबर राहो आणि स्वर्गात आपण कायम आनंदात राहो.चिंटू सर मी तुमच्यावर खूप प्रेम केले आहे आणि करतच राहीन.


View this post on Instagram

 

I will miss you Chintu sir.

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on Apr 29, 2020 at 11:44pm PDT

 

२०१८ मध्ये ऋषी कपूर यांच्या कर्करोगाचे निदान झाले.त्यानंतर ते न्यूयॉर्क येथे उपचारासाठी गेले.जवळपास एक वर्ष उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये ते मुंबईत परत आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

मॅचेस बंद तरी, ICC टेस्ट रॅकिंगमध्ये टीम इंडियाची घसरण! मिळालं ‘हे’ स्थान..

दुबई । संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जवळपास संपूर्ण जग ठप्प आहे. याचा इतर क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्राला सुद्धा बसला आहे. सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धांनाही ब्रेक लागला आहे. असे असताना टीम इंडियाला जबर धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने शुक्रवारी १ मे रोजी ताजी क्रमवारी जाहीर केली. आयसीसीने कसोटी, वनडे आणि टी-२० प्रकारातील क्रमवारी जाहीर केली असून ताज्या क्रमवारीत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत भारतीय संघाला खाली ढकलून अव्वल स्थान पटकावले. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडिया अव्वल स्थानी कायम आहे, पण गेली ४२ महिने म्हणजेच ऑक्टोबर २०१६ पासून अव्वल स्थानी असलेल्या टीम इंडियाला शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने मागे टाकले.तर पाकिस्तान क्रिकेट संघाला टी-२० मधीलआपलं अव्वल स्थान गमवावे लागले आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत कसोटी आणि टी-२० मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली आहे. याचसोबत गेल्यावर्षी आयसीसी वनडे वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवणाऱ्या इंग्लंड संघाला वनडे क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले.

आयसीसीच्या वार्षिक क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघाचे ११६ गुण आहेत. तर ११५ गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या तर १४४ गुणांसह भारत तिसऱ्या स्थानावर. वनडेत इंग्लंडचा संघ १२७ गुणांसह पहिल्या, ११९ गुणांसह टीम इंडिया दुसऱ्या तर ११६ गुणांसह न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. टी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलिया २६८ गुणांसह पहिल्या, इंग्लंड २६६ गुणांसह दुसऱ्या तर भारत २६६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

खूशखबर! गॅस सिलेंडरच्या किंमतीत सरकारकडून घट; पहा नवीन दर

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या या संकटाच्या काळात सामान्य माणसाला काहीसा दिलासा मिळाला आहे.इंडेनच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार अनुदानित एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत प्रति सिलिंडरमध्ये १६२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. म्हणजेच आता हे सिलिंडर ५८१.५० रुपयात उपलब्ध होणार आहे. मुंबईत हे सिलिंडर आता ५७९ रुपयांना मिळणार आहे.

Cooking gas marketers raise alarm over 75% price hike - Phenomenal

अनुदानित सिलिंडरची किंमत १४.२ किलो

दिल्ली – ५८१.५० रुपये
मुंबई- ५७९.०० रुपये
कोलकाता – ५८४.५० रुपये
चेन्नई – ५६९.५० रुपये

यापूर्वी १ एप्रिल रोजी विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ६१.५ रुपयांची कपात करण्यात आली होती.
कोरोना विषाणूच्या या संकटाच्या काळात सामान्य माणसाला काहीसा दिलासा मिळालेला आहे.इंडेनच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत प्रति सिलिंडर ६१.५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. म्हणजेच हे सिलिंडर आता ७४४ रुपयात उपलब्ध होणार आहे. यापूर्वी दिल्लीत विना अनुदानित सिलिंडरची किंमत ८०५.५० रुपये होती.

Uttar Pradesh: Ex-Air India Chief claims pilferage by LPG company

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

३ मे नंतर सरकारचा ‘हा’ प्लान; पहा तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये आहे?

नवी दिल्ली । ३ मे रोजी देशातील लॉकडाऊन संपुष्टात येत असून त्यानंतर सरकार काय निर्णय घेते यावर अजूनही चर्चा होते आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना रेड, औरन्ग आणि ग्रीन अशा तीन झोन मध्ये विभागण्यात आले आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली असून सादर जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद हि भारतातील मुख्य शहरे रेड झोन मध्ये आहेत.

 

नवीन नियमांनुसार, जिल्ह्यात कोरोना विषाणूचे २१ दिवसांत कोणतेही नवीन रुग्ण आढळले नाही तर ते ग्रीन झोनमध्ये येईल.पूर्वीची वेळ ही २८ दिवसांची होती. असे मानले जाते की ४ मे पासून काही जिल्ह्यांना सूट मिळू शकते, ही सूट ग्रीन झोन भागात असू शकते मात्र,लॉकडाउननंतरही मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळावे लागेल.

महाराष्ट्रातील कोणता जिल्हा कोणत्या झोनमध्ये आहे याची यादी खालीलप्रमाणे –

रेड झोन –
367 – मुंबई – रेड झोन
368 – पुणे – रेड झोन
369 – ठाणे – रेड झोन
370 – नाशिक – रेड झोन
371 – पालघर – रेड झोन
372 – नागपूर – रेड झोन
373 – सोलापूर – रेड झोन
374 – यवतमाळ – रेड झोन
३७५ – औरंगाबाद – रेड झोन
376 – सातारा – रेड झोन
377 – धुळे – रेड झोन
378 – अको ला – रेड झोन
379 – जळगाव – रेड झोन
380 – मुंबई उपनगरी – रेड झोन

ऑरेंज झोन –
381 – रायगड – ऑरेंज झोन
382 – अहमदनगर – ऑरेंज झोन
383 – अमरावती – ऑरेंज झोन
384 – बुलढाणा – ऑरेंज झोन
385 – नंदुरबार – ऑरेंज झोन
386 – कोल्हापूर – ऑरेंज झोन
387 – हिंगोली – ऑरेंज झोन
388 – रत्नागिरी – ऑरेंज झोन
389 – जालना – ऑरेंज झोन
390 – नांदेड – ऑरेंज झोन
391 – चंद्रपूर – ऑरेंज झोन
392 – परभणी – ऑरेंज झोन
393 – सांगली – ऑरेंज झोन
394 – लातूर – ऑरेंज झोन
395 – भंडारा – ऑरेंज झोन
396 – बीड – ऑरेंज झोन

ग्रीन झोन –
397 – उस्मानाबाद – ग्रीन झोन
398 – वाशिम – ग्रीन झोन
399 – सिंधुदुर्ग – ग्रीन झोन
400 – गांडिया – ग्रीन झोन
401 – गडचिरोली – ग्रीन झोन
402 – वर्धा – ग्रीन झोन

रेड झोन म्हणजे काय?
रेड झोन हे असे क्षेत्र आहेत जिथे कोरोना विषाणूचा साथीचा संसर्ग पसरलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या ठिकाणांना व जिल्ह्यांना विशेषत: ‘हॉटस्पॉट्स’ असे म्हटले जाते.

ऑरेंज झोन म्हणजे काय ?
ज्या भागात किंवा जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूची मर्यादीत प्रकरणे आढळली आहेत आणि या प्रकरणांमध्ये वाढ झालेली आढळली नाही,ती ऑरेंज झोनमध्ये ठेवली आहेत.जर हॉटस्पॉट जिल्ह्यात १४ दिवसांत नवीन केस येत नसेल तर ते ऑरेंज झोनमध्ये येते.

ग्रीन झोन म्हणजे काय?
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या हॉटस्पॉट जिल्ह्यात २८ दिवसांपर्यंत कोणत्याही पॉझिटिव्ह घटना समोर येत नसेल तर ते ग्रीन झोनमध्ये बदलते.उदाहरणार्थ,१४ दिवस मुंबईत कोरोना संसर्गाचे कोणतेही नवीन प्रकरण आढळले नाही तर ते ऑरेंज झोनमध्ये जाईल.त्यानंतर पुढील १४ दिवसांत कोणतेही नवीन प्रकरण आढळले नाही तर ते ग्रीन झोनमध्ये जाईल.

WhatsApp Image 2020-05-01 at 3.33.01 PM

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

३ मेनंतर मुंबई, पुणे, ठाण्याची लॉकडाऊनमधून सुटका नाहीच- उद्धव ठाकरे

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३ मे रोजी संपत असून यानंतर लॉकडाउन वाढवला जाणार की शिथील करणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. अशा वेळी लॉकडाउनमधून मुंबई, ठाणे, पुणेकरांना दिलासा दिला जाणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना दिले. ३ मेनंतर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे हे रेड झोन वगळता इतर झोनमध्ये परिस्थिती पाहून आतापेक्षा अधिक मोकळीक दिली जाईल. लॉकडाऊनमध्ये अधिक शिथिलता दिली जाईल, असं सांगतानाच पण ही शिथिलता देताना कोणतीही घाईगडबड करण्यात येणार नाही. तुम्हीही मोकळीक दिल्यानंतरही काळजी घ्यायची आहे. नाही तर आजवर केलेल्या तपश्चर्येवर पाणी फिरेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनी जनतेशी संवाद साधताना हा खुलासा केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणले की, “३ मे नंतर काय करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही काय करायचं ? किती वेळ घरी बसायचं ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अर्थचक्र रुतलं आहे. बेरोजगारी वाढणार असं सांगितलं जात आहे. हे खऱं आहे, नाही असं म्हणणं योग्य नाही. पण अर्थासोबत संपत्ती जर म्हणाल तर प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची महत्त्वाची आणि खऱी संपत्ती त्यांची जनता असते. त्यांना प्राथमिकता दिली पाहिजे. नागरिक वाचले पाहिजेत. ते सैनिक आहेत. ते वाचले तर हा गाडा चिखलातून काढून पुढे नेऊ शकतो”.असं उद्धव ठाकरे यांनी बोलतांना आपलं मत मांडलं.

”रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी, ऑरेंज झोन म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी आणि ग्रीन झोन म्हणजे तो ज्लालामुखी पुन्हा पेटेल असं वाटत नाही. पण ग्रीन झोनमध्ये जर कोणी कोरोना रुग्ण आला तर पुन्हा हाहाकार माजू शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. रेड झोनमध्ये मुंबई आणि मुंबईचा परिसर आहे. कल्याण आणि पनवेलपर्यंत जो काही परिसर येतो तो आहे. पुणे आणि आजुबाजूचा परिसर तसंच नागपूरमधील काही ठिकाणं आहेत. या ठिकाणी आकडे वाढत आहेत. त्यामुळे काही करणं हिताचं नाही. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या ठिकाणी लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“ऑरेंज झोनमध्ये म्हणजे जिथे संख्या वाढत नाही आहे पण अजूनही रुग्ण आहेत तिथे काही परिसर सोडले तर उरलेल्या जिल्ह्यात काय सुरु करु शकतो याचा निर्णय झाला आहे. ग्रीन झोनमध्ये आपण आधीच शिथिलता आणत आहोत,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. “तसंच परराज्यात जे जाऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यांच्यासाठी आपण सोय करत आहोत पण लगेच झुंबड करु नका. अन्यथा ती परवानगीही काढून टाकली जाईल,” असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.