Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5855

दिलासादायक! देशात २१ मे नंतर कोरोनाचे नवीन रुग्ण सापडणे होणार बंद; पहा रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील ११ राज्यांमध्ये कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे येण्याची ११ मे ही शेवटची तारीख असू शकते.कोविड -१९ बाबत मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसीच्या एका पेपरमध्ये याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मात्र या पेपरचे लेखक नीरज हातेकर आणि पल्लवी बेल्हेकर यांचे असे म्हणणे आहे की नवीन प्रकरणे बंद होणे हे संसर्ग रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आहे यावर अवलंबून असेल.

इंग्रजी वृत्तपत्र ‘इकॉनॉमिक टाइम्स’ च्या वृत्तानुसार, पेपर लेखकांचे मत आहे की २१ मे ही नवीन कोरोना प्रकरण भारतात येण्याची शेवटची तारीख असू शकते.परंतु,या पेपरमध्ये राज्यांना मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगारांच्या मुद्दयाबाबत सावध राहण्यास सांगितले आहे, कारण या सुधारलेल्या परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो,यामुळे ही समस्या कदाचित आणखी वाढूही शकते.

Bengaluru residents attack health workers on Covid-19 awareness ...

महाराष्ट्रातील प्रकरणांची आकडेवारी २४,००० ओलांडू शकते.ज्या राज्यांमध्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन प्रकरणे उघड होण्याची अंतिम तारीख ही ८ मे असेल असा अंदाज आहे त्यात दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश यांचा समावेश आहे.ही तारीख महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसाठी २१ मे तर उत्तर प्रदेशसाठी १० मे असू शकेल असा अंदाज आहे.

राज्यांमधील जास्तीत जास्त प्रकरणांचा अंदाज आणि नवीन प्रकरणांची शेवटची तारीख बदलत्या आकडेवारीवर अवलंबून असते.

काही राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये, कोरोनाच्या जास्तीत जास्त संख्येबद्दल असा अंदाज लावला जातो:

महाराष्ट्र: २४,२२२ प्रकरणे
दिल्लीः३,७४४ प्रकरणे
गुजरात:४,८३३ प्रकरणे
उत्तर प्रदेश:३,१८२ प्रकरणे
राजस्थानः २,८०८ प्रकरणे
मध्य प्रदेश:२,४३२ प्रकरणे
पश्चिम बंगाल:२,१७३ प्रकरणे

Coronavirus cases in India: 18 new coronavirus cases across India ...
या पेपरमध्ये लॉजिस्टिक डिस्ट्रीब्यूशन वापरले गेले आहे, जे सामान्यत: प्रतिबंधित वातावरणात माइक्रोऑर्गेनिज्मच्या ग्रोथ मॉडलमध्ये वापरले जाते.अभ्यासामध्ये असा अंदाज लावला जातो की जेव्हा सिस्टम कधी कॅरिंग कॅपिसिटी पर्यंत पोहोचणार आणि नवीन प्रकरणे येणे कधी थांबणार यासाठी ऑस्ट्रेलिया, थायलंड, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि चीन यासारख्या देशांचा डेटा वापरला गेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुणे जिल्ह्यातून गावी जाण्यासाठी ‘पास’ पाहिजे? येथे करा संपर्क

पुणे । लाॅकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार, पर्यटक, विद्यार्थी यांना त्यांच्या मुळगावी पाठविणेबाबत आदेश आदेश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालयकडून काल ३० एप्रिलला याबाबतचा आदेश दिले आहेत. सदर आदेशानुसार परराज्यातील स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या मुळ गावी जाण्याची इच्छा असल्यास महाराष्ट्र शासनाने आवश्यक त्या उपाय योजना करुन कामगारांना मुळ गावी पोहोचविण्यासाठी वाहतुक व्यवस्था व तसेच इतर कार्यवाही करण्याचे या आदेशात म्हटलं गेलं आहे. कामगारांना परत मुळ गावी पाठवण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून शासनाने सदर आदेशामध्ये खालील निकष विचारात घेऊन कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

१. ज्या कामगारांना आपल्या गावी मुळ परत जायचे आहे अशा कामगारांनी आपली नाव नोंदणी संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांचे कार्यालयाकडे नाव नोंदणी इ-मेल दवारे व दुरध्वनी संदेशाद्वारे करण गरजेचे आहे.

२. ज्या लोकांना आपल्या गावी जाण्याची इच्छा आहे अशा लोकांची तपासणी केली जाईल आणि कोव्हीड-१९(कोरोना)ची लक्षणे किंवा लक्षणे न दर्शविणाऱ्यांनाच मुळ गावी जाणेची परवानगी जिल्हा प्रशासनाकडुन देण्यात येईल.

३. पुणे जिल्हयातुन इतरत्र म्हणजे त्यांच्या मुळ गावी पाठविण्यात येणाऱ्या कामगारांची वैदयकीय तपासणी करण्यात येईल. आणि त्यांच्यामध्ये कोव्हीड-१९ ची कोणतीही लक्षणे नसल्यासच त्यांना मुळ गावी पाठवावे कि नाही याबाबतची विनंती विचारात घेतली जाईल.

४. मुळ गावी पतरणाऱ्या कामगारांची संख्या व त्यांची ठिकाणे विचारात घेऊन वाहतुक आराखडा तयार करण्यात येईल. व संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी व राज्य प्रशासनाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर कामगारांना त्यांच्या मुळ गावाकडे रवाना केले जाईल.

५. सर्व स्थलांतरीत कामगार, विदयार्थी व पर्यटक यांनी कोणतीही घाईगरबड न करत संबंधित तालुक्याच्या नियंत्रण कक्षाशी दुरध्वनीवरुन अथवा इमेलदवारे आपली नाव नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

तालुका नियंत्रण कक्ष, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी ची यादी खालीलप्रमाणे

तहसील कार्यालय हवेली – 020-24472348 – [email protected]
अपर तहसील पिंपरी चिंचवड – 020-27642233 – [email protected]
तहसील कार्यालय पुणे शहर – 020-24472850 – [email protected]
तहसील कार्यालय मावळ – 02114-235440 – [email protected]
तहसिल कार्यालय मुळशी – 020-22943121 – [email protected]
तहसील कार्यालय शिरुर – 02138-222147 – [email protected]
तहसील कार्यालय भोर – 02113-224730 – [email protected]
तहसिल कार्यालय वेल्हा – 02130-221223 – [email protected]
तहसील कार्यालय पुरंदर – 02115-222331 – [email protected]
तहसील कार्यालय जुन्नर – 02132-222047 – tahsil [email protected]
तहसिल कार्यालय आंबेगाव – 02133-244214 – [email protected]
तहसिल कार्यालय खेड – 02135-222040 – [email protected]
तहसील कार्यालय दौड – 02117-262342 – [email protected]
तहसिल कार्यालय इंदापूर – 02111-223134 – indapur [email protected]
तहसील कार्यालय बारामती – 02112-224386 – [email protected]

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

महाराष्ट्र दिनानिमित्त आज हा मावा केक बनवून पहाच !

mava cake
mava cake

Hello Recipe | आज महाराष्ट्र दिन आहे. आजच्या दिवशी काही विशेष करायचा विचार करत असाल तर तुम्ही मावा केक बनवण्याचा नक्की विचार करू शकता. जाणून घ्या मावा केकची संपूर्ण रेसिपी

साहित्य –
मैदा – सव्वा वाटी
मावा – अर्धा वाटी ( किसलेला )
पीठीसाखर – अर्धा वाटी
मिल्कमेड – पाव वाटी
दूध – १ कप किंवा गरजेनुसार
तुप किंवा लोणी – २ चमचे
बेकिंग पाउडर – १ टीस्पून
बेकिंग सोडा – पाव टीस्पून
वेलची पूड – पाव टीस्पून
काजू, बदाम व पिस्ता चे काप आवडीनुसार
केकचे भांडे – ६ इंच

कृती
१) कुकरची शिटी व रिंग काढून घ्यावी,कुकरमधे १ ते दीड वाटी मीठ पसरावे व कुकर गॅसवर गरम होण्यासाठी ठेवावा. ( कमी गॅसवर )
२) केकच्या भांडयाला आतून तुप किंवा तेल चोळून बाजूला ठेवावे.
३) मैदा, बेकिंग पाउडर व बेकिंग सोडा एकत्र करून चाळून घ्यावे व बाजूला ठेवावे.
४) एका भांडयात तुप किंवा लोणी घेवून चमचाने फेटावे नंतर त्यात पीठीसाखर घालून चांगले मऊ होईपर्यंत फेटावे.
५) नंतर यात मिल्कमेड टाकून चांगले मिक्स करावे.
६) नंतर मावा, वेलचीपुड व काजू बदामचे
काप घालून चांगले मिक्स करावे.
७) शेवटी चाळलेला मैदा व दुध घालून मिक्स करावे. मिश्रण जास्त फेटु नये फक्त मिक्स करावे व लगेच तेल लावलेल्या भांडयात मिश्रण ओतावे, मिश्रण सारखे पसरावे व केक कुकरमधे बेक करण्यासाठी ठेवावा.

३० ते ४० मिनिटात तुमचा मावा केक तय्यार

टिप्स
१) साहित्य दिलेल्या प्रमाणातच घ्यावे.
२) बेकिंग पाउडर व बेकिंग सोडा यांच्या एक्सपायरी डेट्स बघुन खरेदी करावी.
३) केक मंद आचेवर बेक करावा.
४) मैदा घातल्यानंतर मिश्रण जास्त फेटु नये.
५) मिश्रण साधारण भजाच्या पीठाप्रमाने असावे जास्त पातळ किंवा घट्ट नसावे त्याप्रमाणे दूध कमी जास्त वापरावे.
६)मावा नाही वापरला तर साधा केक होईल पण दुध थोडे जास्त घ्यावे लागेल.

हि रेसिपी चाखून झाल्यावर प्रतिक्रिया कळवायला विसरु नका बरं का, अशाच हटके पाककृती जाणून घेण्यासाठी तुमच्या हक्काच्या www. hellomaharashtra.com या ठिकाणाला भेट द्या.

 

फडणवीसांनी दिल्या उद्धव ठाकरेंना ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा..म्हणाले..

संग्रहित छायाचित्र

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच आता संपुष्टात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातील विधान परिषदेच्या जागांवर निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे. आयोगाने २७ मे च्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने २७ मे च्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाला केलेल्या विनंतीचं फडणवीस यांनी स्वागत केलं असून यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, या संकेतांचे सुद्धा पालन होईल असं म्हटलं आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली. म्हणजेच मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्य माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, “करोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो. संविधानाच्या तत्वांचे पालन करतच राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारसीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून तत्काळ विधानपरिषदेच्या 9 जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, हा आम्हाला विश्वास वाटतो”.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, या संकेतांचे सुद्धा पालन होईल”. “यातून एक बाब स्पष्ट झाली आहे की, लोकशाही प्रक्रियेत संवादातूनच मार्ग निघत असतो. संवैधानिक पदावर आसीन व्यक्तीवर अकारण टीका करून कोणताही फायदा होत नाही,” असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छाही दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

आयपीएल विजेता ‘हा’ कर्णधारच कोणत्याही स्टार खेळाडूविना संघाला बनवू शकतो चॅम्पियन: युसुफ पठाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणने इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राशी निगडित काही आठवणी आपल्या चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. आयपीएलच्या पहिल्या तीन सत्रात युसुफ पठाण राजस्थान रॉयल्स संघाचा एक महत्त्वाचा भाग होता. २००८ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सत्रात शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स चॅम्पियन बनला होता.

पहिला हंगाम आठवताना युसुफ पठाण म्हणाला की फक्त शेन वॉर्नच स्टार खेळाडूंशिवाय संघासाठी आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकतो. “शेन वॉर्नच्या नेतृत्वात मी तीन वर्ष आयपीएलमध्ये खेळलो. त्याच्या बर्‍याच आठवणी आहेत.सामान्यापूर्वी तो फलंदाजांना कसे आऊट करायचे याविषयी चांगले मार्गदर्शन करत असे.आम्ही त्याच्या योजनेला प्रत्यक्षात मैदानात उतरवले आणि फलंदाज त्याने सांगितलेल्या प्रकारेच आऊट व्हायचे. “

युसूफने आयपीएलच्या पहिल्या सत्रात ४३५ धावा फटकावल्या आणि ८ विकेट्स घेतल्या. पहिल्या हंगामात यश संपादन केल्यानंतर तो आयपीएलमधील एक मोठा खेळाडू ठरला.पठाण पुढे म्हणाला, “दुर्दैवाने, मी त्याच्या नेतृत्वाखाली तीन वर्षांहून अधिक काळ खेळू शकलो नाही.कोणत्याही मोठ्या खेळाडूशिवाय त्याने आमच्या संघाला अंतिम सामन्यात नेले आणि जेतेपद जिंकवले. त्यावेळी राजस्थान रॉयल्सकडे बरेच स्थानिक खेळाडू होते आणि खूपच कमी आंतरराष्ट्रीय स्टार्स होते.त्याच्यासारखे कर्णधार काही संसाधने नसतानाही जेतेपद जिंकू शकतात. “

राजस्थानमध्ये तीन सीझन घालवल्यानंतर पठाण कोलकाता नाईट रायडर्समध्ये दाखल झाला.युसुफचा केकेआरमधील प्रवासही प्रभावी होता आणि त्याने गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोन आयपीएल विजेतेपद जिंकले.नंतर तो सनरायझर्स हैदराबादमध्ये दाखल झाला.मात्र, गेल्या वर्षीच्या आयपीएल २०२० च्या लिलावात कोणत्याही संघाने त्याला खरेदी करण्यात रस दाखविला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कराडकरांसाठी गुड न्यूज! आता कृष्णेतच होणार कोरोना चाचणी; रिपोर्टसाठी पुण्याची गरज नाही

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विश्वविद्यालय, कराड यांना कोविड-19 चाचणीसाठी ऑल इंडिया इन्सिट्यूट मेडिकल सायन्सेस, यांच्याकडून मान्यता मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामुळे आता सातारा जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांना कोरोना चाचणीच्या अहवालासाठी पुण्याला जाण्याची आवश्यकता लागणार नाही आहे.

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करुन ही साखळी तोडणे अधिक महत्वाचे असते, त्या दृष्टीने कराड मध्ये चाचणीला मान्यता मिळणे हे जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहे. येत्या काही दिवसात इथेच चाचण्या होतील, त्यामुळे पुण्याला जाण्याचा तिथे गेल्यानंतरची थोडी प्रतिक्षा हा वेळेचा अपव्यय टाळता येईल आणि लवकरात लवकर अहवाल आपल्या हाती येईल, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत असताना कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विश्वविद्यालयाला कोरोना चाचणीचे निदान करण्याची परवानगी मिळणे फायद्याचे ठरणार आहे. यामुळे कोरोनाचा अहवाल प्राप्त होण्यास दिरंगाई होणार नसल्याने बाधित रुग्णांवर उपचार करणे जास्त सोईचे होणार आहे.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५२ वर पोहोचली आहे. यामध्ये एकट्या कराड तालुक्यात ४२ कोरोना रुग्ण आहेत. आज सकाळी उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील ६ आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

‘या’ राज्यातून धावली मजुरांसाठी पहिली प्रवासी रेल्वे गाडी

हैद्राबाद । मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे राज्यात अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात जाता यावे यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. अखेर यासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेत कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज हैदराबादजवळील लिंगमपिल्ली येथून झारखंडमधील हटियासाठी कामगारांना घेऊन जाणारी विशेष गाडी सोडण्यात आली. २५ मार्चपासून देशामध्ये लॉकडाउन सुरु झाल्यानंतर आज पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

तेलंगण सरकारने केलेल्या विनंतीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हैदराबादमधून हटियासाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे एएनआयने म्हटलं आहे. रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशनानुसार झारखंडमधील कामगारांना त्यांच्या राज्यात जाता यावे म्हणून ही विशेष रेल्वे सोडण्यात आली. या रेल्वेला निरोप देण्यासाठी काही रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी लिंगपपिल्ली स्थनकावर उपस्थित होते.

महिन्याभराहून अधिक कालावधी लॉकडाउनमध्ये घालवल्यानंतर अखेर आपल्या राज्यात परत जातानाचा आनंद कामगारांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अनेकजण खिडकीमधून हात बाहेर काढून रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा निरोप घेताना व्हिडिओत दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

…जेव्हा शारजाहमधील त्या ‘डेझर्ट स्टोर्म’ सामन्यानंतर सचिनला त्याच्या भावाला फटकारले जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हणतात. कारकीर्दीत असंख्य वेळा सचिनने आपल्या दमदार खेळाने भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य आणले आहे.त्याने अशा काही इनिंग्स खेळलेल्या आहेत ज्यांच्या आठवणी अजूनही क्रिकेट चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत आणि त्यांना त्या कधीही विसरता येणार नाहीत.१९९८ मध्ये सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध असाच एक दमदार खेळी केली होती,ज्याला ‘डेझर्ट स्टोर्म’असेही म्हणतात. १९९८ मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात एक ट्राएँग्युलर सिरीज खेळली गेली होती.

२२ एप्रिल १९९८ रोजी कोका कोला कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक सामना खेळला गेला. भारतीय संघासाठी हा सामना करा अथवा मरा असा होता. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्तिथीत विजय मिळवावा लागणार होता.

OTD: Sachin Tendulkar's Desert Storm knock vs Australia - Sportstar
दोन्ही संघांमधील हा सामना शारजाह येथे सुरू होता जिथे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला विजयासाठी २८५ धावांचे लक्ष्य दिले.जेव्हा भारतीय संघ या लक्ष्याचा पाठलाग करायला आला तेव्हा सामन्यादरम्यान आलेल्या वाळूच्या वादळामुळे खेळ थांबवावा लागला.त्यानंतर भारतीय संघाला ४६ षटकांत २५५ धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले.

वाळूचे वादळ थांबले तेव्हा पुन्हा एकदा खेळ सुरू करण्याची तयारी सुरू होती,पण कोणाला माहित होतं की मैदानात अजून एक मोठे वादळ येणार आहे या नव्या वादळाचा सामना भारतीय संघाला करावा लागणार नव्हता तर विरोधी आणि तत्कालीन नंबर एकचा संघ, ऑस्ट्रेलिया आणि वादळ म्हणून आलेल्या सचिन तेंडुलकरने या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली आणि १३१ चेंडूत १४३ धावांचे तुफानी खेळी केली.सचिनच्या या खेळीला नंतर ‘डेझर्ट स्टोर्म’ असे नाव देण्यात आले.

सचिनने नुकत्याच झालेल्या ‘स्टार स्पोर्ट्स’च्या ऑनलाइन कार्यक्रमात त्याच्या दमदार खेळीबद्दलच्या काही मनोरंजक आठवणी शेअर केल्या आहेत.या दरम्यान,भारतीय संघ कोका-कोला कप जिंकून जेव्हा भारतात परत आला तेव्हा आपल्या भावाने आपल्याला का फटकारले हे सचिनने सांगितले.

Sachin Tendulkar's recollection of the 'Desert Storm' innings in ...

सचिन म्हणाला, “जेव्हा मी माझ्या घरी परत आलो तेव्हा माझा भाऊ अजित तेंडुलकरने मला खूप फटकारले.यामागचे कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात फलंदाजी करताना मी व्हीव्हीएस लक्ष्मणवर ओरडलो होतो.”

तो म्हणाला, “जेव्हा या ‘डेझर्ट स्टोर्म’ सामन्यात लक्ष्मण माझ्याबरोबर फलंदाजी करीत होता,तेव्हा मी धाव काढण्यासाठी त्याच्यावर ओरडलो. मी त्याला सांगितले की तू धाव घेण्यासाठी धावत का नाहीस.दबाव-असलेल्या अशा सामन्यात,कधीकधी आपण स्वत: वर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि मग असे घडते.

सचिन म्हणाला, “या घटनेनंतर जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा माझ्या भावाने मला सांगितले की तू लक्ष्मणला अशाप्रकारे ओरडू शकत नाहीस.तोही भारतीय संघाकडून खेळतो आणि तूही,हा तुझ्या एकट्याचा सामना नव्हता.तोही तुझ्याबरोबर खेळत होता.

Incredible Moments: Sachin Tendulkar's first 'desert storm ...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात सचिन आणि लक्ष्मण यांच्यातील पाचव्या विकेटसाठी १०४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती.या सामन्यात लक्ष्मणने ३४ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले.
भारतीय संघाने २६ धावांनी हा सामना गमावला असला तरी, त्या संघाने सरस धाव गतीच्या जोरावर अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले.

सचिन म्हणाला, “जरी आम्ही अंतिम फेरी गाठली असलो तरी आम्ही नेहमीच हा सामना जिंकला असता आणि येथे पोहोचलो असतो, हे माझ्या मनात नेहमीच होते.” सामना जिंकणे आणि अंतिम फेरी गाठणे यामुळे आम्हाला एक वेगळा आत्मविश्वास मिळाला असता.

तो म्हणाला, “तुम्ही सामना जिंकून अंतिम सामन्यास पात्र ठरणे आणि धाव गतीच्या आधारे पात्र यात फरक असतो.येथे विरोधी संघ मानसिकदृष्ट्या तुमच्या वरचढ असतो हे परंतु तसे करणे त्यांना शक्य झाले नाही. त्यानंतर पुन्हा मी विचार केला की अंतिम सामन्यात आपण जिंकण्याचा प्रयत्न करू. ”

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाबरोबरच अंतिम सामन्यात भिडला.या सामन्यातही सचिनने चमकदार शतक झळकावत भारतीय संघाला जेतेपद मिळवून दिले.

Tendulkar recalls 1998 Sharjah knocks against Australia - The Hindu
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अरे बापरे! हिंगोलीत एकाच दिवसात २५ SRPF जवान कोरोना पॉझिटिव्ह

हिंगोली । हिंगोली जिल्ह्यात एसआरपीएफच्या आणखी २५ जवानांना कोरोनाची लागण झाल्यानं येथील रुग्णांची संख्या ४६ वर पोहोचली आहे. हिंगोलीत आतापर्यंत ४७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी ४१ हे एसआरपीएफचे जवान आहेत. याआधीही मुंबई, मालेगाव व जालन्याहून हिंगोलीत परतलेल्या एकूण १६ जवानांना करोना झाल्याचं उघड झालं होतं. त्यात आता २५ जवानांची भर पडली आहे.

दरम्यान, आज शुक्रवार सकाळी एसआरपीएफच्या २५ जवानांनचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. त्यापैकी २० जवानांना एसआरपीएफच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर ५ जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं आहे. या जवानांचे यापूर्वीचे अहवाल निगेटिव्ह आले होते. आतापर्यंत एसआरपीएफच्या ४१ जवानांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ३३ जवान हे मालेगावात तर ८ जण मुंबईत कर्तव्यावर होते, असंही रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.

हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलातील १९४ जवान व अधिकारी मुंबई व मालेगाव येथे बंदोबस्ताची ड्युटी संपवून १९ व २० एप्रिल रोजी जिल्ह्यात परत आले होते. त्यापैकी १५ जणांना करोनाची बाधा झाल्याचं उघड झालं आहे. तर, जालना येथील एक जवान गावाकडे परतल्यानंतर केलेल्या तपासणीत तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जालन्याच्या जवानाच्या संपर्कातील इतर दोन व्यक्तींनाही करोनाची लागण झाली आहे. तर, वसमत व सेनगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्याची रुग्ण संख्या कालपर्यंत २१ होती. मात्र आज त्यात एकदम २५ जणांची भर पडली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील खासगी ट्रॅव्हल्सवरील चालक २३ एप्रिल रोजी पंजाब राज्यात भाविकांना सोडण्यासाठी गेला होता. २८ एप्रिल रोजी तो परत आला होता. या चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. तर हिंगोलीच्या एका रुग्णावर औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

कोरोनाचे सावटात परभणीत ‘असा’ झाला महाराष्ट्र दिन साजरा

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला होता, तसे आदेश मागील आठवड्यात देण्यात आल्याने परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते जिल्हात फक्त एकाच ठिकाणी मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिनानिमित्य, शुक्रवार दि. १ मे रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले.

यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, तहसीलदार विद्याचरण कडवकर उपस्थित होते.