गणेशोत्सवासाठी वाहनांना पथकरातून सूट

IMG WA

मुंबई | अमित येवले मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना गणेशोत्सवानिमित्त पथकरातून सूट मिळणार आहे. त्यासाठी वाहनांना गणेशोत्सव २०१८ , कोकणदर्शन या नावाचे स्टीकर पोलीस, आरटीओच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत असे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय जारी केला. अधिक माहितीसाठी लिंक – https://t.co/BxFBMYwAz0

जव्हार नगरपरिषदेच्या शताब्दीपूर्ती पर्यटन महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन

jawahar paryatn kendra

पालघर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जव्हार नगरपरिषदेच्या शताब्दीपूर्ती पर्यटन महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालघरमधील ८५० पथदिव्यांचा आणि पर्यटनविषयक संकेतस्थळाचाही शुभारंभ करण्यात आला व कुपोषण मुक्तीसाठी सुरू असलेल्या ‘राष्ट्रिय पोषण महिना’ मोहिमेच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले. जव्हारच्या पाणीपुरवठ्यासाठी १७.३६ कोटी, पर्यटनवृद्धी १० कोटी,शहरातील विकास कामांसाठी १० कोटी रुपये मंजूर करण्याची मुख्यमंत्री यांनी … Read more

साताऱ्यात ८ जण तडीपार, एसपी पंकज देशमुखांची धडक कारवाई

tadipar

सातारा | योगेश जगताप मारामारी, खंडणी व खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या ८ जणांना आज साताऱ्याचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी तडीपार केलं आहे. एका महिन्यात तडीपाराचा दुसरा दणका एसपी साहेबांनी दिल्यामुळे गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सातारा, मलकापूर, कराड आणि कोंडवे अशा परिसरातील हे रहिवासी असून २७ ते ३५ वर्ष वयोगटातील … Read more

गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठ बहरल्या !!

ganesh festival

पुणे | सुनिल शेवरे गणेशोत्सव आता अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेला असताना गणेश मूर्तिंच्या विक्रीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. दरवर्षी पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा उत्सव पुण्यातून सुरु झाला असल्यामुळे संपूर्ण भारताचे लक्ष पुण्याकडे असते. वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या आणि सजावटीचं साहित्य दरवर्षी बाजारात येत असतं. पुण्यातील विविध भागांतील घरात मोठ्या गणेश मूर्तिची … Read more

राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त एसीईडी कडुन प्रधानमंत्री आवास योजना या विषयावर चर्चासत्र

engineers day

पुणे | सुनिल शेवरे भारतरत्न एम्. विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने असोसिएशन फॉर सिव्हिल इंजीनियर्स डेवलपमेंट संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १५ सप्टें २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता कमिन्स सभागृह नवी पेठ येथे होणार असल्याची माहिती एसीईडी चे संस्थापक सदस्य प्रकाश भट, चेअरमन अशोक रेटवड़े यांनी … Read more

रिपब्लिकन ऐक्य ही काळाची गरज !!

republican

विचारविश्व | रविंद्र बनसोडे धर्माप्रमाणे राजकारणात निष्ठा बाणली नाही, तर तो लंफग्याचा बाजार बनेल – डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सांस्कृतिक राष्ट्रवादी संघटनेने नरेंद्र मोदींच्या माध्यमातून दिलेल्या :सबका साथ सबका विकास’ या भुलथापाच्या गाजराला भुलून आंबेडकरी समुह रिपब्लिकन गटाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या जाळ्यात फसला आहे या फसल्या गेलेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज विचार करण्याची … Read more

महिला आयोगाने घेतली राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल

ram kadam

मुंबई | आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधीकारे (स्युमोटो) दखल घेतली असून आठ दिवसात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या दोन दिवसापासून माध्यमांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा चालू असल्याने व याबाबत राज्यात अनेक ठिकाणी निषेध मोर्चे निघाल्यानंतर अखेर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची आज रात्री उशिरा दखल घेतली. … Read more

पुण्यात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे चौथे अधिवेशन

mseb

पुणे | सुनिल शेवरे वीज उद्योगातील कामगारांना समान काम, समान वेतन मिळावे, कंत्राटदारांकडून होणारी कामगारांची पिळवणूक थांबावी यासाठी पूर्वाश्रमिच्या एम्एसइबी मधील रोजंदारी पद्धत व एनएम्आर पुन्हा सुरु केले पाहिजे. या मागणीसाठी अधिवेशनाच आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक ७ सप्टें २०१८ रोजी सकाळी १०:३० वाजता दुधाने लॉन्स, कमिन्स कॉलेज रोड, शाहू कॉलनी , कर्वेनगर येथे हे … Read more

राज्यसेवेतील नवीन प्रशासकीय अधिकारीच न्यायाच्या प्रतिक्षेत

images

समांतर आरक्षणामुळे पुणे व नागपूर येथे होणारी प्रशासकीय प्रशिक्षणे लांबणीवर पुणे प्रतिनिधी| महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परिक्षा २०१७-१८ च्या अडचणी थांबायचं नाव घेत नाहीत. खुल्या प्रवर्गातील १७ जागांसाठी इतर प्रवर्गातील उमेदवार निवडले गेल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणास अजून उशीर झाला आहे. त्या १७ जागांसाठी बाकी उमेदवारांना वेठीस का धरलं जातंय? असा संतप्त सवाल यशस्वी … Read more

काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात ९ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार

gang rape

सावत्र आईच्या सांगण्यावरुन सावत्र भावानेच मित्रांसोबत केले पाशवी कृत्य बारामुल्ला, काश्मीर | येथील उरी परिसरातील जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनेच्या तपसाअंती २४ ऑगस्टला बेपत्ता झालेल्या चिमुरडीचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मुलीच्या सावत्र आईच्या सांगण्यावरुनच सावत्र भावाने त्याच्या मित्रांसाहित हे पाशवी कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गळा दाबून मारल्यानंतर ओळख पटू … Read more