PAK ने प्राचीन तक्षशिला विद्यापीठ आपले असल्याचा केला दावा, पाणिनी-चाणक्य हेही पाकिस्तानचेच सुपुत्र असल्याचे म्हंटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इस्लामाबाद । जगात भारतीय उपखंडातील इतिहासाशी संबंधित खोटी माहिती पसरवण्याचे काम पाकिस्तानने आता सुरू केले आहे. यावेळी व्हिएतनाममधील पाकिस्तानचे राजदूत कमर अब्बास खोखर यांनी दावा केला आहे की, तक्षशिला विद्यापीठ भारताचे नसून ‘प्राचीन पाकिस्तान’चा भाग आहे. खोखर यांनी ट्विटरवर दावा केला की, तक्षशिला विद्यापीठ पाकिस्तानात होते. तसेच चाणक्य आणि पाणिनीसारखे विद्वानही पाकिस्तानचेच सुपुत्र आहेत. मात्र, खोखर यांचा हा दावा ट्विटर युझर्सनी फेटाळून लावला. त्यांना यावरून बरेच ट्रोल केले जात आहे.

https://twitter.com/mqakhokhar/status/1338131075822878721?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1338131075822878721%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fworld%2Ftakshshila-university-is-part-of-ancient-pakistan-and-chanakya-panini-son-pakistan-says-pakistani-diplomat-in-vietnam-dlaf-3375349.html

खोखर यांनी तक्षशिला विद्यापीठाचे कथित छायाचित्र ट्वीट करून म्हटले आहे की, ‘हे पुन्हा तयार करण्यात आलेल्या तक्षशिला विद्यापीठाचे हवाई चित्र आहे. हे विद्यापीठ 2700 वर्षांपूर्वी प्राचीन पाकिस्तानमधील इस्लामाबादजवळ होते. या विद्यापीठात, जगभरातील 16 देशांतील विद्यार्थ्यांनी 64 वेगवेगळ्या विषयांत उच्च शिक्षण घेतले, जे पाणिनी सारख्या विद्वानांनी शिकवले.

मात्र, खोखर यांच्या या दाव्यानंतर लोकांनी त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली. लोकांनी असा प्रश्न केला की, 14-15 ऑगस्ट 1947 पूर्वी पाकिस्तान तिथे नसता तर त्याच्या इतिहासाचा प्रश्नच उद्भवला नसता. लोकं म्हणाले की, चाणक्य हे भारतीय उपखंडातील राजा चंद्रगुप्त मौर्य यांचे मंत्री होते आणि त्यांच्या राज्याची राजधानी पाटलीपुत्र (पटना) होती. हे क्षेत्र भारतातील बिहार राज्यात आहे.

https://twitter.com/mqakhokhar/status/1338193670198030337?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1338195112023638016%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fworld%2Ftakshshila-university-is-part-of-ancient-pakistan-and-chanakya-panini-son-pakistan-says-pakistani-diplomat-in-vietnam-dlaf-3375349.html

पाकिस्तानी नेता खोखर खोटे बोलत आहेत
ट्रोल केले जात असूनही खोखर यांनी आणखी एक ट्विट केले की, जगातील पहिले भाषातज्ज्ञ पाणिनि आणि जगप्रसिद्ध राजकीय तत्ववेत्ता चाणक्य हे दोघेही प्राचीन पाकिस्तानचे पुत्र होते. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान बऱ्याच काळापासून आपल्या शालेय पुस्तकांमध्ये असा खोटा इतिहास शिकविला जात आहे. हिंदूंचा इतिहास म्हणून या पुस्तकांमध्ये भारतीय इतिहास शिकविला जातो.

https://t.co/XPH1zY0Vpw?amp=1

विद्यार्थ्यांना सांगितले जाते की, हिंदू-मुस्लिमांच्या मूलभूत श्रद्धेला मोठा विरोध आहे, ज्यामुळे भारत-पाकची फाळणी झाली. शासक वर्गाला खूश करण्यासाठी पाकिस्तानमध्ये शालेय पुस्तके सातत्याने लिहिली जात आहेत. पुस्तकांमधील अस्सल तथ्यांकडे दुर्लक्ष करून सांगितले आणि ऐकीव माहितीच्या आधारे शिक्षण दिले जात आहे.

https://t.co/he93edjMwf?amp=1

https://t.co/9iO7cDOfcg?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment