पाकिस्तानी लष्कर डुरंड सीमा ओलांडत अफगाणिस्तानात पोहोचले? तालिबान्यांसह फिरतानाचे व्हिडिओ होत आहे व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अफगाणिस्तानात तालिबानी अतिरेक्यांना पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या मदतीच्या बातम्यांमध्ये एक व्हिडिओ समोर आला असून त्यात पाकिस्तान लष्कराचे जवान तालिबान नियंत्रित अफगाण भागात दहशतवाद्यांसमवेत उभे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे. हा व्हिडिओ अफगाण मीडिया मीडिया एजन्सी आरटीए वर्ल्डने ट्विटरवर शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की,”तालिबान्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या पाकिस्तानी सैनिकांची हालचाल. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये पाकिस्तानी सैन्य अफगाण प्रांताच्या स्पिन बोल्डकमधील ‘नजर सिक्योरिटी पोस्ट’ मधून डुरंड लाइन पार करत अफगाणमध्ये शिरल्याचे दिसून आले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात डोरंड लाइन ही सीमा रेखा आहे.

14 जुलै रोजी तालिबान्यांनी दावा केला की, त्यांनी अफगाणिस्तानची महत्त्वपूर्ण “स्पिन बोल्डक क्रॉसिंग” ताब्यात घेतली आहे. कंदहारचा ‘स्पिन बोल्डक’ हा पाकिस्तानच्या चमन शहरालगतच्या अफगाण सीमेचा एक महत्त्वाचा सामरिक पॉंईट आहे, ज्याद्वारे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार होतो.

तालिबानी अतिरेक्यांनी अलीकडच्या आठवड्यात डझनभर जिल्हे ताब्यात घेतले आहेत आणि 11 सप्टेंबरला अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि पाश्चात्य सैन्यांने पूर्ण माघार घेण्यापूर्वी देशातील जवळजवळ एक तृतीयांश भाग ताब्यात घेतले असल्याचे समजते. अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अम्रुल्लाह सालेह यांनी 15 जुलै रोजी चमन आणि स्पिन बोल्डक या सीमावर्ती भागात पाकिस्तानी हवाई दल तालिबानी अतिरेक्यांना मदत करत असल्याचा आरोप केल्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, पाकिस्तानने नेहमीच याचा इन्कार केला आहे.

यापूर्वी 16 जुलै रोजी उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद येथे झालेल्या परिषदेत अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी पाकिस्तान सरकारवर निशाणा साधत असे म्हटले होते की,”इस्लामाबाद अफगाणिस्तानातील हिंसाचाराला खतपाणी घालत आहे.” गनी म्हणाले होते की,” गेल्या महिन्यात पाकिस्तानमधील 10,000 हून अधिक जिहादी सैन्याने सीमा ओलांडून आपल्या देशात प्रवेश केला. अफगाण सैन्याशी चकमकीत जखमी झालेल्या तालिबानी अतिरेक्यांवर पाकिस्तानमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.”