PAN-Aadhaar Link : ‘या’ तारखेपर्यंत पॅन आधारशी करा लिंक, अन्यथा करावा लागेल अडचणींचा सामना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PAN-Aadhaar Link : जर आपण अजूनही आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर आता ते लवकरात लवकर करा. सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठीची मुदत अनेकदा वाढवण्यातही आली आहे. जर आपण आपला पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक केला नसेल, तर तो 31 मार्च 2023 पर्यंत लिंक करावा लागेल. आतापर्यन्त देशभरातील एकूण 61 कोटी पॅनकार्डपैकी फक्त 48 कोटीच आधारशी लिंक केले गेले आहेत.

Have not linked your PAN card with Aadhaar? Follow step-by-step guide to do  it

तसेच जर आपण 31 मार्च 2023 पर्यंत आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही, तर असे करणाऱ्यांना टॅक्स संबंधित कामांमध्ये अडचणी भासू शकतील. CBDT चे अध्यक्ष असलेल्या नितीन गुप्ता यांनी रविवारी याबाबत माहिती देताना म्हंटले की,”अजूनही अनेक पॅनकार्ड असे आहेत जे आधारशी जोडले गेलेले नाहीत, मात्र हे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.” PAN-Aadhaar Link

PAN Card, Aadhaar Card Linking Deadline Is June 30: How to Check Status, Link  Aadhaar-PAN Online | Technology News

आधारशी लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होणार

जर आपण 31 मार्च 2023 पर्यंत पॅन आधारशी लिंक केले नाही तर आपले पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. तसेच 31 मार्चपर्यंत पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1,000 रुपये शुल्क देखील भरावे लागेल. CBDT प्रमुख पुढे म्हणाले की, “पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याबाबत अनेक जनजागृती देखील गेल्या आहेत. यासोबतच ते लिंक करण्याची मुदतही अनेकदा वाढवली आहे. जर आपले आधार हे निर्धारित वेळेपर्यंत पॅनशी लिंक केले नाही, तर त्या धारकाला करासंबंधीच्या लाभाचा फायदा मिळू शकणार नाही. कारण 31 मार्च 2023 त्याचे पॅन व्हॅलिड राहणार नाही. PAN-Aadhaar Link

Aadhaar PAN link aadhaar pan link status aadhaar pan linking site aadhaar  pan link last date aadhaar pan linkage status

हे जाणून घ्या की, गेल्या वर्षी जारी केलेल्या परिपत्रकात CBDT ने स्पष्ट केले की, पॅन निष्क्रिय झाल्यानंतर, संबंधित व्यक्तीला इन्कम टॅक्स कायद्यानुसार निर्धारित सर्व परिणामांना सामोरे जावे लागेल. ज्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न न भरणे आणि प्रलंबित रिटर्नवर प्रक्रिया न करणे यासारख्या परिस्थितींचा समावेश आहे. PAN-Aadhaar Link

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pan.utiitsl.com/panaadhaarlink/forms/pan.html/panaadhaar

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Bank FD : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार 9% पर्यंत व्याज
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता