पंकजा मुंडे मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज? नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचे एकही ट्विट नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळात 43 नव्या चेहर्‍यांमा संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र प्रितम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे.

नव्या मंत्र्यांच्या निवडीवर पंकजा मुंडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे. तसेच पंकजा यांनी ट्विटरद्वारे नवीन मंत्र्यांचे अभिनंदन देखील केले नाही. यामुळे पंकजा मुंडे या मंत्रिमंडळावर नाराज आहेत का ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रीतम मुंडे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळेल अशा बातम्या समोर आल्या होत्या पण पंकजा मुंडे यांनी स्वतः याबाबत ट्विट करून हे वृत्त फेटाळले होते. तरीही प्रितम मुंडे यांचे मंत्रीपद फिक्स समजले जात होते. मात्र जाहीर झालेल्या यादीत प्रितम मुंडे यांना डावलण्यात आल्याने मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळाला. आता पंकजा मुंडे यांनी नव्या मंत्र्यांचे अभिनंदन न केल्याने पंकजा यांच्या नाराजीवर राजकीय वर्तुळात वर्चा रंगली आहे.

नरेंद्र मोदींच्या या मंत्रिमंडळात खासदार भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, खासदार नारायण राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची, डॉ. भागवत कराड यांच्याकडे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री,तर भिवंडीतील भाजपचे खासदार कपिल पाटील यांना पंचायत राज मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारती पवार यांनी अनपेक्षितपणे मंत्रीमंडळात बाजी मारल्याने मुंडे यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे. राजकिय फिल्डींग लावण्यात भारती पवार यशस्वी झाल्या असून प्रितम मुंडे शेवटच्या काही दिवसांत नेमक्या यातच कमी पडल्याने त्यांचे मंत्रीपद हुकल्याचं जाणकरांकडून सांगितले जात आहे.