पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | बहुचर्चित मावळ मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पावर यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणूक लढत होते तर त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या आखाड्यात होते. शह-काटशहाने गाजलेली हि निवडणूक सर्वांचेच लक्ष वेधणारी निवडणूक ठरली.  मात्र पार्थ पवार हे लोकांच्या पसंतीला किती उतरले हे येणाऱ्या २३ तारखेला समजणार आहे. तूर्तास मात्र मतदानाच्या वेळी असणाऱ्या वातावरणाचा कानोसा घेवून अंदाज वर्तवण्याची चढाओढ लागली आहे.

मावळ मतदारसंघाबद्दल शरद पवार म्हणतात…

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार घाटाच्या खाली म्हणजे पनवेल उरण आणि कर्जत या भागात शिवसेनेला लोकांनी जवळ केले तर पिंपरी आणि चिंचवड या दोन  विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला अपेक्षित मतदान मिळणार आहे. मात्र मावळ विधानसभा मतदारसंघात  राष्ट्रवादीला पूर्व अंदाजनुसार मोठी पीछेहाट सहन करावी लागणार आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या मैत्रीचा राष्ट्रवादीला तसा विशेष काहीच फायदा होणार नाही असे अंदाज सूत्रांनी दिले आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या विजयाची भिस्त हि पिंपरी चिंचवड येथील मतदानावरच अवलंबून असणार आहे असे बोलले जाते आहे.

आढळराव पाटलांचा कोल्हेंवर पलटवार ; कोल्ह्याने किती खोट बोलावं याला पण मर्यादा असते

श्रीरंग बारणे यांनी मतदारसंघात ठेवलेला जनसंपर्क कदाचित त्यांना पुन्हा विजयाकडे घेवून जावू शकतो. त्याच प्रमाणे राष्ट्रवादीच्या मातब्बरांना मतदानाच्या आधल्या रात्री  खिंडीत रोखण्यासाठी बारणे कितीसे  यशस्वी झाले यावर देखील निकालाची बाजू शिवसेनेच्या बाजूने पलटू शकते.

म्हणून मी शिवसेना सोडली ; अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट

राजकारणाच्या व्यावसायिक पातळीवर उतरून बोलायचे झाल्यास मुळात जनमत राष्ट्रवादीच्या बाजूचे नव्हतेच. मात्र संघटनेच्या ताकतीवर निवडणुका जिंकून जाण्याचा आत्मविश्वास राष्ट्रवादीला मावळात फायद्याचा ठरला कि तोट्याचा याचाहि निकाल २३ मे रोजीच लागणार आहे. मात्र सारसार विचार करून अंदाज लावायचा झाल्यास राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार या निवडणुकीत पराभवाच्या सावटाखाली अधिक आहेत असे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे. मात्र काही झाले तरी २३ मे पर्यत कोणीच अचूक निकाल सांगू शकत नाही. त्यामुळे उमेदवारांच्या जय पराजयाचे विषय फक्त चर्चेत रंगत आणणारे असणार आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

लोकसभेच्या निकालावर पैज लावणे पडले महागात ; दोघांना ही झाली अटक

माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान

अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार