धक्कादायक! 700 प्रवाश्यांनी भरलेले एक जहाज कांगो नदीमध्ये पलटले! अनेकांना मिळाली जलसमाधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काँगो | सोमवारी रात्री डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये सातशे प्रवाशांनी भरलेले जहाज पलटी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमधे आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जहाजातून प्रवास करणाऱ्या सातशे प्रवाशांपैकी 300 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. तर इतर प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. जहाजामधून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील काँगो नदीमध्ये ही घटना घडली आहे. या देशाचे मंत्री स्टीव्ह माबीकाई यांनी या दुर्घटनेबाबत माहिती दिली. एकूण प्रवाशांपैकी तीनशे प्रवाशांना वाचविण्यात यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना कांगोमध्ये माई – नोमदबे या प्रांतात झाली. या जहाजामध्ये अतिरिक्त प्रवाशांसहित जास्त वजनाचे साहित्य देखील भरले गेले होते.

काँगो या देशाची अर्थव्यवस्था खराब असल्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास जास्त झालेला नाही. देशातील रस्ते खूप खराब आहेत. रस्त्यांची अवस्था खराब असल्यामुळे नागरिक काँगो नदीच्यापात्रामधून जल वाहतुकीला प्राधान्य देतात. आणि जहाजमधून प्रवास करत असतात. बऱ्याचवेळा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी जहजामध्ये भरल्यामुळे अपघातही होत असतात. काँगो नदीच्या पात्रांमध्ये अपघात होण्याचे जास्त प्रमाण आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment