कोरोनासाठी नाही तर खोकल्याच्या औषधासाठी पतंजलीला लायसन्स; रामदेव बाबांना नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हरिद्वार । करोना व्हायरसवर औषध बनवल्याचा दावा करत योगगुरू रामदेव बाबा यांनी मंगळवारी कोरोनिल हे औषध लाँच केले. पण काही तासांतच पतंजलीचे हे औषध वादात सापडले. केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीकडून क्लिनिकल ट्रायलचे रेकॉर्ड मागितले. आयसीएमआरने यासंदर्भात आयुष मंत्रालयाकडे बोट दाखवलं होतं. आता उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटीनेही रामदेव बाबांच्या औषधावर प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे रामदेव बाबांना आणखी एक झटका बसला आहे.

रामदेव बाबांची कंपनी पतंजलीला करोनावरील औषधासाठी नाही तर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सर्दी-खोकल्याच्या औषधासाठी लायसन्स मंजूर करण्यात आले होते. करोनावर रामदेव बाबांच्या पतंजलीने औषध बनवल्याची माहिती आपल्याला माध्यमांमधून कळली. पण त्यांना दिलेले लायसन्स हे सर्दी-खोकला आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या औषधासाठी होते, असं उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटीचे उपसंचालक यतेंद्र सिंह रावत यांनी स्पष्ट केलं.

कुणी करोनाच्या नावार औषध बनवून त्याचा प्रचार आणि प्रसार करू शकत नाही, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. तसंच आयुष मंत्रालयाच्या वैधतेनंतरच हे परवानगी असेल. उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटीकडून पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली. या प्रकरणी पतंजलीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे, असं रावत यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.