हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawa) शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या बंडाचा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. “परंतु अजित पवारऐवजी राष्ट्रवादीतील एक बडा खासदारच पक्षात बंड करेल, असे शरद पवारांना वाटत होते. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना बोलून दाखवले होते” असा मोठा गौप्यस्फोट आज जितेंद्र आव्हाड यांनीच केला आहे.
आज शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. या शिबिरात बोलताना, “सुनील तटकरे हे इमान राखून नाहीत हे शरद पवार यांना माहीत होतं. त्यामुळे शरद पवार यांनी मला सांगितल होत की, सुनील तटकरे हे पुढील पाच वर्षात पक्षात टिकणार नाही” असा दावा दावा आव्हाड यांनी केला आहे.
तसेच, “सुनील तटकरे हे दिवस रात्र शरद पवार यांच्याकडे येऊन एकच बोलायचे, चला ना भाजपसोबत जाऊ या. 2019 ला अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला. सुनील तटकरे तेव्हा शरद पवार यांच्या घरी सकाळी 8 वाजता आले. तुम्हाला वाटतं का सुनील तटकरे याना काही माहीत नाही? सुनील तटकरे यांच्या सारखा नटसम्राट मी पाहिला नाही” अशी टीका देखील आव्हाड यांनी केली आहे.
दरम्यान, “अजित पवार यांनी आघाडीच्या सरकारमध्ये असताना बावनकुळे यांना किती मदत केली याची माहिती काढा. अजित पवार यांची वर्किंग स्टाईल वेगळी आहे. त्यांचा घेतलेला पॉलिसी मेकिंगचा एक तरी निर्णय मला त्यांनी सांगवा. शरद पवार यांनी पॉलिसीवर 100 निर्णय घेतले आहेत. अजित पवार यांना झोप लागत नाही त्यामुळे ते सकाळी 6 वाजता उठून काम करतात” असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.