सलग 21 व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ – आजचे नवीन दर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढत आहेत. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीने आज सलग 21व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. शनिवारी दिल्लीत एका लिटर पेट्रोलची किंमत 80.38 रुपये तर डिझेलच्या एका लिटरची किंमत 80.40 रुपये होती. त्याचबरोबर आता दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महागले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात.

 

आज देशातील बड्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्या (27 जून 2020 रोजी पेट्रोलची किंमत)

दिल्ली- पेट्रोल 80.38 रुपये आणि लिटर 80.40 रुपये आहे.

नोएडा – 81.04 रुपये तर डिझेल 72.48 रुपये आहे.

गुरुग्राम – पेट्रोल 78.59 रुपये तर डिझेल 72.66 रुपये आहे.

लखनऊ – पेट्रोल 80.94 रुपये आणि डिझेल 72.37 रुपये आहे.

मुंबई – पेट्रोल 87.14 रुपये आणि डिझेल 78.71 रुपये आहे.

चेन्नई – पेट्रोल 83.59 रुपये आणि डिझेल 77.61 रुपये आहे.

कोलकाता- पेट्रोल 82.05 रुपये आणि डिझेल 75.52 रुपये आहे.

भोपाळ- पेट्रोल 88.03 रुपये आणि डिझेल 79.82 रुपये आहे.

जयपूर – पेट्रोल 87.51 रुपये आहे तर डिझेल 81.19 रुपये आहे.

पटना- पेट्रोल 83.27 रुपये आहे तर डिझेल 77.30 रुपये आहे.

चंदीगड- पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 77.36 रुपये केली आहे. डिझेलची किंमत प्रतिलिटर 71.86 रुपये केली आहे.

आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील माहित होऊ शकतात. खरं तर, आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत तपासण्याचे तीन मार्ग आहेत: ऑईल मार्केटिंग कंपन्यांच्या पंप लोकेटरच्या मदतीने आपण किंमत माहिती करून घेऊ शकता. फ्यूल@आईओसी अ‍ॅप डाउनलोड करा. 92249 92249 वर एसएमएस पाठवून दर जाणून घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.