हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव स्थिर असूनही देशांतर्गत बाजारात इंधनाच्या किंमती वाढत आहेत. शनिवारी, 18 जुलै रोजी दिल्लीत पेट्रोलची किंमत हि 80.43 रुपये प्रतिलिटरवर स्थिर आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत ही 17 पैशांनी वाढून 81.52 रुपये प्रति लिटर झाली आहे. दिल्लीत डिझेलची नवीन किंमत आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर हे सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्यूटी, डीलरचे कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
दैनंदिन वस्तूही होऊ शकतात महाग
काही दिवसांपूर्वीच दिल्लीत टोमॅटो 10-15 रुपयांना विकला जात होता. त्याचबरोबर आता ते प्रति किलो 80-100 रुपयांवर गेले आहे. इतकेच नाही तर इतर हिरव्या भाज्या आणि बटाटे यांच्या किंमती देखील त्याच मार्गाने जात आहेत.
गुरूग्राम, गंगटोक, सिलीगुडी आणि रायपूर येथे टोमॅटो 70-90 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे, तर गोरखपूर, कोटा आणि दिमापूरमध्ये प्रतिकिलो 80 रुपये दर आहे. आकडेवारीनुसार उत्पादक राज्यांतही हैदराबादमधील किंमत मजबूत झाली असून ती प्रति किलो 37 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये 40 रुपये किलो आणि बेंगळुरूमध्ये 46 रुपये किलो आहे .
मालवाहतुकीत वाढ झाल्यामुळे फळे आणि भाजीपाल्याचे दर आणखी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याच वेळी एफएमसीजी वस्तूंच्या किंमती म्हणजेच दररोजच्या वापरातील वस्तूच्या किंमती देखील वाढू शकतात. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मालवाहतुकीच्या वाढीचा परिणाम संपूर्ण देशात एकाच वेळी दिसून येईल. यामुळे एफएमसीजी कंपन्यांवरील दबाव वाढेल आणि त्यांना किंमती वाढविण्यास भाग पाडले जाईल.
फळ आणि भाजीपाल्याच्या किंमतींमध्ये वाहतुकीचा वाटा इतर वस्तूंच्या तुलनेत जास्त आहे. वास्तविक, वेगवेगळ्या शेतकर्यांकडे मध्ये फळे आणि भाज्यांचे प्रमाण कमी आहे. त्यांची उत्पादने बाजारात आणण्यासाठी त्यांना मोठ्या कंपन्यांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो.
फळांच्या बाबतीतही परिस्थिती काही वेगळी नाही आहे. वेगवेगळ्या राज्यातून फळं दिल्लीत आणली जातात. यानंतर, त्यांचे वितरण संपूर्ण देशात केले जाते. अशा परिस्थितीत मालवाहतूतिचा खर्च वाढल्यामुळे फळांच्या किंमतींमध्ये तीव्र वाढ होऊ शकते.
देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्या
दिल्ली पेट्रोल 80.43 रुपये आणि डिझेल 81.52 रुपये प्रतिलिटर आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 87.19 रुपये आणि डिझेलची किंमत 79.71 रुपये आहे.
कोलकाता पेट्रोल 82.10 रुपये तर डिझेल 76.67 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नई पेट्रोलची किंमत 83.63 रुपये आणि डिझेलची किंमत 78.50 रुपये आहे.
नोएडा पेट्रोल 81.08 रुपये तर डिझेल 73.45 रुपये प्रतिलिटर आहे.
गुरुग्राम पेट्रोल 78.64 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 73.61 रुपये आहे.
लखनौ पेट्रोल 80.98 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 73.38 रुपये आहे.
पटना पेट्रोल 83.31 रुपये आणि डिझेल 78.40 रुपये प्रति लिटर आहे.
जयपूर पेट्रोल 87.57 रुपये आणि डिझेल 82.23 रुपये प्रतिलिटर आहे.
प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर वेगळा स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कर (व्हॅट) लागू होतो. ज्यामुळे,प्रत्येक राज्यांनुसार ग्राहकांसाठी डिझेल आणि पेट्रोलचे दर बदलतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.