हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपल्यालाही आपले पीएफचे पैसे काढावे लागले तर ‘या’ 5 चुका करण्यास टाळावे. जर दुर्लक्ष केले तर आपला पीएफ पैसे काढण्याचा दावा नाकारला जाऊ शकतो ..
बँक खात्याचा चुकीचा तपशीलः पीएफ क्लेमचे पैसे त्याच खात्यात जमा केले जातात ज्याची नोंद ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये असते. म्हणूनच क्लेम भरत असताना आपल्या बँकेच्या खात्याचा तपशील काळजीपूर्वक भरा. आपण जर चुकीचा खाते क्रमांक किंवा इतर कोणताही खाते क्रमांक भरल्यास आपला अर्ज नाकारला जाईल.
KYC पूर्ण केले नाहीः कोणत्याही खातेदाराचे KYC पूर्ण झालेले नसले तरी तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. आपला KYCचा तपशील तसेच पूर्ण असण्याबरोबरच वेरीफायही केला जावा. KYC पूर्ण आणि वेरीफाईड आहे की नाही आपल्या ई-सेवा अकाउंटमध्ये लॉग इन करून हे तपासू शकता.
चुकीची जन्मतारीखः ईपीएफओमध्ये नोंद केलेली जन्मतारीख आणि मालकाच्या नोंदींमध्ये नोंदलेली जन्मतारीख वेगळी असली तरीही आपला अर्ज रद्द केला जाऊ शकतो. अलीकडेच, ईपीएफओने 3 एप्रिल रोजी एक सर्क्युलर जारी केले होते, ज्यामध्ये ईपीएफओ रेकॉर्डमध्ये नोंदलेली जन्म तारीख दुरुस्त करण्यासाठी आणि यूएएनला आधारशी जोडण्यासाठीच्या नियमांमध्ये शिथिलता आणली होती. आता आपण आपली जन्मतारीख 3 वर्षांपर्यंत ठीक करू शकता.
अकाउंट UAN शी जोडले जावे: तसेच आपला खाते क्रमांक UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) शी लिंक करावा. आपले खाते लिंक केलेले नसले तरीही पैसे मिळविण्यात अडचणी येऊ शकतात. त्याशिवाय ईपीएफओ रेकॉर्डमध्ये नोंदलेला IFSC क्रमांकही बरोबर असणे आवश्यक आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.