PM Kisan : शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळण्यास होतो आहे उशीर, यामागील कारण तपासा

PM Kisan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवतात. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही अशीच एक योजना आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना आतापर्यंतया योजनेचे 10 हप्ते मिळाले आहेत. सरकार एप्रिल महिन्याच्या अखेरीस 11 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना देईल, असे सांगितले जात होते, मात्र अद्याप तसे झालेले नाही. आता मिळालेल्या माहितीनुसार, या 11व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना आणखी वाट पाहवी लागू शकेल.

e-KYC करणे बंधनकारक आहे

किसान सन्मान निधीमधील फसवणूक टाळण्यासाठी सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी e-KYC बंधनकारक केले होते. सरकारने e-KYC करण्याची शेवटची तारीख अनेक वेळा वाढवली आहे. आता e-KYC ची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. आता या तारखेपूर्वी 11 वा हप्ता दिला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

PM Kisan साठी e-KYC करण्यासाठी शेतकऱ्यांना जवळच्या CSC केंद्रात जावे लागेल. जिथे बायोमेट्रिक पद्धतीने eKYC करता येईल. यासाठी शेतकऱ्याला आपले आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल. यासोबतच त्याला त्याचा रजिस्टर्ड मोबाईल नंबरही आपल्याकडे ठेवावा लागेल कारण त्या नंबरवर OTP येईल.

PM Kisan Registration 2022 Apply for Rs 2000 at pmkisan.gov.in

PM Kisan साठी अशा प्रकारे ऑनलाइन e-KYC करा

सर्व प्रथम पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
त्यानंतर ‘फार्मर्स कॉर्नर’ अंतर्गत e-KYC टॅबवर क्लिक करा.
जे पेज उघडेल त्यावर आधार नंबरची माहिती द्या आणि सर्च टॅबवर क्लिक करा.
यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल.
त्यानंतर सबमिट OTP वर क्लिक करा आणि OTP टाकून सबमिट करा.
तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Farmers Alert! If You Want Seventh Installment of PM Kisan Samman Nidhi  Yojana Then do This Work Now

हे पण वाचा :

PM Kisan मधील पैशांचे स्टेटस कसे तपासायचे ते जाणून घ्या

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी सरकारने पुन्हा सुरू केली ‘ही’ महत्वाची सेवा; असा घ्या लाभ

PM Kisan Mandhan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना दरमहा मिळेल 3000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या तपशील

PM Kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये, किती तारखेला येणार 11 वा हप्ता? जाणून घ्या

PM KISAN: पुन्हा एकदा वाढवली मुदत, आता शेतकरी ‘या’ तारखेपर्यंत करू शकतील eKYC