PM Kisan : आता घरबसल्या अशा प्रकारे पूर्ण करा e-KYC

PM Kisan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकार कडून चालवली जाणारी एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत रजिस्टर्ड शेतकऱ्यांना वर्षभरात 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते. या योजनेचे आतापर्यन्त 10 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत आणि आता 11वा हप्ता येण्यास तयार आहे.

मात्र हे लक्षात घ्या कि, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने आता eKYC करणे बंधनकारक केले आहे. हे eKYC करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. तसेच जे शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. शेतकऱ्यांना हे eKYC दोन प्रकारे करता येईल. यातील पहिला मार्ग म्हणजे पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर OTP द्वारे ऑनलाइन पूर्ण करणे. याशिवाय शेतकरी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊन देखील eKYC करू शकतात. PM Kisan

PM Kisan Samman Nidhi Yojana 11th Installment likely to Arrive in May 2022  2 thousand rupees | PM Kisan Samman Nidhi: बस कुछ दिनों में खाते में आने  वाली है 11वीं किस्त,

PM Kisan साठी घरबसल्या अशा प्रकारे पूर्ण करा eKYC

आता शेतकऱ्यांना घरबसल्या स्मार्टफोनवरून देखील eKYC पूर्ण करता येईल. त्यासाठी शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. कारण की OTP हा फक्त रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल आणि याद्वारे eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.

पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या.
त्यानंतर ‘फार्मर्स कॉर्नर’ अंतर्गत eKYC टॅबवर क्लिक करा.
जे पेज उघडेल त्यावर आधार क्रमांकाची माहिती द्या आणि सर्च टॅबवर क्लिक करा.
यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल.
त्यानंतर सबमिट OTP वर क्लिक करा आणि OTP टाकून सबमिट करा.
तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

PM Kisan साठी कॉमन सर्व्हिस सेंटरवरही eKYC करता येईल

कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये शेतकऱ्याची बायोमेट्रिक पद्धतीने eKYC केली जाते. यासाठी लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक जवळ असणे आवश्यक आहे. मात्र हे लक्षात घ्या की कॉमन सर्व्हिस सेंटरवर eKYC ची फी 17 रुपये आहे. याशिवाय सीएससी ऑपरेटर 10 रुपये ते 20 रुपये सर्व्हिस चार्ज देखील आकारतात. अशा प्रकारे, तुम्हाला CSC कडून eKYC साठी 37 रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागतील.

PM Kisan Samman Yojana: इंतजार की घड़ियां होंगी खत्म, जानें- अगस्त में कब  ट्रांसफर होंगे 9वीं किस्त के 2,000 रुपये

हे पण वाचा :

PM Kisan : CSC मध्ये e-KYC करण्यासाठी द्यावे लागतात पैसे, फ्रीमध्ये कसे करावे ते पहा

PM Kisan : शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळण्यास होतो आहे उशीर, यामागील कारण तपासा

PM Kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये, किती तारखेला येणार 11 वा हप्ता? जाणून घ्या

PM Kisan Mandhan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना दरमहा मिळेल 3000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या तपशील

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी सरकारने पुन्हा सुरू केली ‘ही’ महत्वाची सेवा; असा घ्या लाभ