पवारांचे जुने फोटो ट्विट करणाऱ्यांना राजकीय “मंकीपॉक्स” आजार; अमोल मिटकरींची मनसे नेत्यांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे नेत्यांनी सोशल मीडियावरून भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शेअर केले. या फोटोंवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून मनसेवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. गजानन काळे व संदीप देशपांडे यांनी ट्विट केल्यानंतर राजकीय वाद सुरू झाला असून आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दुसरा एक फोटो ट्वीट करत टीका केली आहे. “पवार साहेबांचे जुने फोटो ट्विट करणाऱ्यांना राजकीय “मंकीपॉक्स ” नावाचा आजार झालेला आहे. या आजारापासून महाराष्ट्राने सावध रहावे, असे मिटकरींनी म्हंटले आहे.

अमोल नितकरी यांनी आज मनसे नेत्याच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले असून त्यांनी ट्विटद्वारे मनसे नेत्याची तुलना मंकीपॉक्स या नव्या आजाराशी केली आहे. त्यांनी ट्विटमहे म्हंटले आहे की, “पवार साहेबांचे जुने फोटो ट्विट करणाऱ्यांना राजकीय “मंकीपॉक्स ” नावाचा आजार झालेला आहे. या आजारापासून महाराष्ट्राने सावध रहावे. काही “मंकी” मर्कटचाळे सोडणार नाहीत. “पांडे बुवा” सारखे पळपुटे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलेत, अशी टीका मिटकरींनी केली आहे.

काय केली होती संदीप देशपांडे यांनी टीका

मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही आज एक फोटो ट्विट केर शरद पवार त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे. कि, “तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांन विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे” अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.

Leave a Comment