काँग्रेसवाले मला नाल्यातील किडा, नीच माणूस म्हणतात, पण…; मोदींचा मोठा आरोप

Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्वच पक्षाने जोरदार प्रचार सुरु केला आहे. याचवेळी सुरेंद्रनगर येथील एका सभेला संभोधित करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे. काँग्रेसवाले मला नाल्यातील किडा, नीच आणि आणि मौत का सौदागर म्हणतात पण मी गुपचूपपणे मी सर्व अपमान गिळतो असं त्यांनी म्हंटल.

मोदी म्हणाले की, निवडणुकीच्या काळात विकासावर बोलण्याऐवजी काँग्रेस म्हणतंय की आम्ही मोदींना त्यांची औकात दाखवू. यापूर्वीही काँग्रेसने माझ्यासाठी ‘नीच माणूस’, ‘मौत का सौदागर’ आणि ‘नाल्यातील कीडा’ असे शब्द वापरले होते. आता निवडणुकीच्या काळात विकासावर बोलण्याऐवजी मोदींना त्यांची लायकी दाखवून देऊ, असे काँग्रेस नेते सांगत आहेत. मी सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. माझा दर्जा नाही. तुम्ही माझा दर्जा दाखवू नका . मी सेवक आहे असा पलटवार मोदींनी केला.

देशातील 130 कोटी जनतेचे भले करायचे असल्याने मी सर्व अपमान गिळतो. मला भारताला विकसित भारत बनवायचा आहे. कदाचित भारतातील कोणत्याही नेत्याला त्यांच्या माता-भगिनींचे जितके आशीर्वाद मिळाले नसतील तितके आशीर्वाद मला मिळाले आहेत. असे मोदी म्हणाले. गुजरातच्या उज्ज्वल भविष्याशी जनतेचे भवितव्य जोडलेले आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मधुसूदन मिस्त्री यांनी केलं होत वादग्रस्त विधान –

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांनी मोदींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होते. पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, गुजरात निवडणुकीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांची ‘औकात’ दाखवणार आहेत. मोदींनी कितीही प्रयत्न केले तरी ते सरदार पटेल होऊ शकत नाहीत.