Wednesday, October 5, 2022

Buy now

एकाच कुटुंबाने पक्ष चालवणं हे लोकशाहीसाठी सर्वात मोठं संकट; मोदींचा नाव न घेता काँग्रेसला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आज 71 वा संविधान दिन साजरा होत असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस वर आणि गांधी परिवारावर निशाणा साधला आहे. एकाच कुटुंबाने पक्ष चालवणं हे लोकशाहीसाठी सर्वात मोठं संकट आहे अशा शब्दांत मोदींनी काँग्रेस वर टीका केली. आज संविधान दिनाच्या निमित्ताने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

संविधान हे केवळ कलमांचं संग्रह नाहीये. तर हजारो वर्षांची महान परंपरा, अखंड धारा आणि त्याची आधुनिक अभिव्यक्ती म्हणजे संविधान आहे. आपला जो मार्ग आहे, तो योग्य आहे की नाही याचं दिशादिग्दर्शन संविधानाद्वारे केलं जात आहे. त्यामुळे संविधान मानलं पाहिजे, असं मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, ‘कधी आपण विचार करावा की, आपल्याला संविधान बनवायचे असते तर काय झाले असते? स्वातंत्र्याची लढाई, फाळणीची भीती असूनही देशाचे हित सर्वात मोठे, हाच मंत्र संविधान बनवताना प्रत्येकाच्या हृदयात होता. विविधतेने भरलेला देश, अनेक बोली, पंथ, राज्ये, हे सर्व असतानाही संविधानाच्या माध्यमातून देशाला एका बंधनात बांधून देशाला पुढे घेऊन जाणे. आजच्या संदर्भात बघितले तर आपण संविधानाचे कदाचित एक पानही पूर्ण करू शकलो असतो. कारण, काळाने नेशन फर्स्टवर राजकारणाने असा प्रभाव निर्माण केला आहे की, राष्ट्रहित मागे टाकले आहे.