पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. हळूहळू स्थिती पूर्वपदावर येते आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन वाढवला पाहिजे, असं जवळपास सर्वच विरोधी पक्षीय नेत्यांचं म्हणणं आहे. ज्या काही सूचना मिळत आहेत, त्यानुसार लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजून झुकतं माप आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लॉकडाऊन संपण्यापूर्वीच अर्थात ११ एप्रिल रोजी पुन्हा एकदा सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचं या बैठकीत पंतप्रधान मोदींनी म्हटलं.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अगोदरच लॉकडाऊन वाढवण्याचा आग्रह केला होता. पंतप्रधान मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत आणखी एक बैठक घेतल्यानंतर लॉकडाऊनवर अंतिम निर्णय घेऊ शकतात, असं म्हटलं जातंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलला संपत आहे. आज लॉकडाऊनचा 15 वा दिवस आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांना घरात राहणे आजही गरजेचं आहे. कारण देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे विविध राज्यांची सरकारच नव्हे, तर तज्ज्ञांनीही लॉकडाऊन वाढवण्याची गरज बोलून दाखवली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

 

 

Leave a Comment