हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगल सफारी करण्यासाठी आज कर्नाटकात आले आहेत. म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच निमित्ताने नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. आज त्यानी ओपन जीपमधून बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये जंगल सफर केली. यावेळी नरेंद्र मोदींनी थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये हत्तीला ऊसही दिला.
नरेंद्र मोदी यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यांनी ट्विट करून म्हंटल की, ‘सुंदर बांदीपूर… आजची सकाळ या व्याघ्र प्रकल्पात घालवली आणि भारतातील वन्यजीव, नैसर्गिक सौंदर्य आणि विविधतेची झलक पाहिली.
नरेंद्र मोदी यांनी मदुमलाई व्याघ्र प्रकल्पात असलेल्या थेप्पाकडून इथल्या हत्ती कॅम्पला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या हातानी तेथील हत्तींना ऊस खाऊ घातला. याबाबतचे फोटो आणि विडिओ सुद्धा समोर आले आहेत.
Tamil Nadu: PM Modi feeds elephant at Theppakadu camp
Read @ANI Story | https://t.co/MXZfO4pzMM#PMModi #TamilNadu #Elephant #MudumalaiTigerReserve #Theppakaducamp pic.twitter.com/ZC01j5a2fx
— ANI Digital (@ani_digital) April 9, 2023
प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2022 च्या जनगणनेवर आधारित वाघांच्या लोकसंख्येची नवीन आकडेवारी जारी करतील.
मोदी आज बांदीपूर नॅशनल पार्कमध्ये इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स (IBCA) लाँच करणार आहेत. IBCA जगातील सात मोठ्या मांजरींच्या संवर्धन आणि संरक्षणावर लक्ष केंद्रित करेल. यात वाघ, सिंह, बिबट्या, स्नो लेपर्ड, प्यूमा, जग्वार आणि चित्ता यांचा समावेश आहे.
जंगल सफर करतानाचा मोदींचा हटके पोशाख मात्र सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होता. डोक्यावर काळी गोलाकार टोपी, प्रिंटेड टी शर्ट, खाकी पॅन्ट, काळे शूज आणि स्लीव्हलेस जॅकेटमध्ये मोदी दिसत आहेत. मोदींचा हा लुक जोरदार व्हायरल झाला आहे.