हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मोदी यांनी ट्विटर वर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस 1 मार्चला घेतला होता. त्यांनी स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस टोचून घेतली होती
मी एम्स रुग्णालयात जाऊन कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या मार्गांपैकी लस हा एक मार्ग आहे. तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल तर तात्काळ लस घेऊन टाका, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला.
https://twitter.com/narendramodi/status/1379974475278557187?s=19
शरद पवारांनीही घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस नुकताच घेतला होता. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांना हा डोस देण्यात आला होता. लसीचा पहिला डोस शरद पवार यांनी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतला होता.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page