पंतप्रधान म्हणाले-“10 कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पोहोचले 6000 रुपये, मिळाले नसतील तर करा ‘हे’ काम”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी PMMSY अर्थात पंतप्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY-Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) सुरू केली. याच्या लॉन्चिंग नंतर पंतप्रधान किसान सन्मान निधीने देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या थेटबँक खात्यात पैसे पाठवले गेलेले आहेत. बिहारमध्येही सुमारे 75 लाख शेतकरी आहेत. आतापर्यंत जवळपास 6 हजार कोटी रुपये बिहारच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. अशा परिस्थितीत असा प्रश्न उपस्थित होतो की, पैसे तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत तर काय करायचं?

या दूरध्वनी क्रमांकावर बोला, आपले काम होऊन जाईल
जर तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे नसतील तर तुम्ही तुमचा लेखापाल, कानुंगो आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी बोलू शकता. याशिवाय तेथे काहीच खुलासा न झाल्यास आपण केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या हेल्पलाइन क्रमांकाची मदत घेऊ शकता. आपण पंतप्रधान-किसान हेल्पलाईन 155261 किंवा टोल फ्री 1800115526 वर संपर्क साधू शकता. या व्यतिरिक्त आपण मंत्रालयाच्या या क्रमांकावर (011-23381092) देखील संपर्क साधू शकता.

या कारणांमुळे ही रक्कम ऑगस्टमध्ये अडकू शकते, सरकारने सुमारे 17 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात घोळ झाल्याने त्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळू शकलेला नाही. सरकार आता पुढील हप्ता नोव्हेंबर महिन्यात जाहीर करेल. अशा परिस्थितीत आपला हप्ता मिळविण्यासाठी त्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यातील गोंधळ दुरुस्त करावा लागेल, तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळू शकेल.

तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा बँकेच्या डिटेल्स मध्येही फरक असल्यास बर्‍याच वेळा खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकत नाहीत. म्हणून, त्यांमध्ये असलेल्या समस्या लवकरात लवकर दुरुस्त करा.

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये ट्रान्सफर करते. पंतप्रधान-किसान योजनेचे हप्ते भरणे हे कोरोनाव्हायरस महामारीमुळे पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज (PMGKP) च्या 1.70 लाख कोटी रुपयांचा एक भाग आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”