PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : RBI ने 8 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. ज्यानंतर बँकांनी आपले मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता PNB ने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये वाढ करत आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. 9 फेब्रुवारी 2022 पासून बँकेचे नवीन दर लागू झाले आहेत.

PNB to hike lending rates by 5 bps across tenures from 1st December | Mint

PNB ने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले की, त्यांनी रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 25 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. आता त्यांचे नवीन दर 8.75 टक्क्यांवरून 9 टक्के झाले आहेत. गुरुवारपासून हे नवे दर लागू झाले आहेत. बँकेचा RLLR वाढवल्याने सर्व प्रकारची कर्जे महागतील.

PNB urges customers to submit details of high-value cheques before clearance - BusinessToday

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.PNB

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर माहिती देताना गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. PNB

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/interst-rate-on-advances-linked-to-mclr.html

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे