औरंगाबाद | कोरोनाच्या पर्शवभूमीवर जिल्हा प्रशासनाने ठरविलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या हॉटेल चालक, सलून, पान टपरी, सह विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यावर पोलिसांनी जोरदार कारवाई करीत थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या शहरात कोरोनाची स्थिती बघता कडक स्वरूपाचे नियम लागू आहेत. तरी देखील काही भागात हॉटेल, सह विविध दुकाने छुप्या पद्धतीने सुरू आहेत. अशा ठिकाणी पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. हर्सूल भागात फिरणाऱ्या काझी मुजजमिल, आरिफ अहेमद खान मोहम्मद अन्वर खान, आसिफ पठाण शब्बीर पठाण, उमर महोम्मद हुलेन चौधरी,शेख रशीद शेख काशीद शेख कासीम, यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे तर बेगमपुरा पोलीस ठाणे हद्दीतील बारापुल्लागेट जवळ संतोष बद्रीनारायन जैस्वाल वय-45 हे नियमांचे उल्लंघन करून सलून चालविताना मिळून आला तर मुजीब हबीब यार खान या किराणा दुकान चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सिडको पोलीस ठाणे हद्दीतील रोहिदास शामराव बनसोड वय-29 (गोकुळनगर, जाधववाडी) हा विनामस्क फिरताना आढळला तर शरद बाबासाहेब घोरपडे,विशाल वसंत अंबाडे, शेख फाईम शेख करीम, सह हॉटेल चालक आकाश काकासाहेब इंगोले 25 यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला तर जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमेश्वर विशवंभर कोठुळे, व्यंकटेश जितेंद्र सोनवणे हे नियमांचे उल्लंघन करून पान टपरी चालविताना मिळून आले तर पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात संतोष केशवराव लवटे वय-45 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील विविध भागांतील झालेल्या या कारवाई पाहता शहर पोलीस दल आता ऍक्शनमोड मध्ये आल्याचे पाहायला मिळत असून या कारवाया मुळे नियम मोडणाऱ्याचे चांगलेच धाबे दनांनल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा