विनायक मेटेंच्या अपघाताबाबत पोलिसांनी दिली ‘ही’ मोठी माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे खोपोली येथे मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्गावर गाडीच्या भीषण अपघात निधन झाले. एका अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली होती. अपघातानंतर नवी मुंबईचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मेटे यांच्या कार चालकाचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला त्याच्या गाडीने धडक दिली. या अपघातात कारच्या समोरील भाग चक्काचूर झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विनायक मेटे यांच्या अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विनायक मेटे हे फोर्ड Endeavour (MH 01 DP 6364) या कारने प्रवास करत होते. चालक एकनाथ कदम हे विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांना घेऊन मुंबई बाजूकडे दुसऱ्या लेनने जात होते. पण कार चालकाचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला. या भीषण अपघातात कारच्या समोरील भाग चक्काचूर झाला आहे. चालकाला झोपेची डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

या अपघातात विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी रुग्णवाहिकेनं एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी दाखल केले. तर मेटे यांचा सुरक्षारक्षक पोलीस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने कारमधून बाहेर काढून त्यांना आयआरबी रुग्णवाहिकेने तात्काळ MGM हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

मेटेंचा मृत्यू ब्रेनइंज्युरीमुळे?

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विनायक मेटे यांच्या मृत्यूबाबत कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयच्या वरिष्ठ डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, विनायक मेटे यांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांना तपासण्यात आले. रुग्णालयात दाखल करताना त्यांना पल्स नव्हते. तर हार्टबिटही नव्हते. ईसीजीमध्ये विनायक मेटे यांचा रिपोर्ट फ्लॅट लाईनप्रमाणे आलेला होता. तर बिपी अर्थात ब्लड प्रेशरही नव्हतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.