धक्कादायक ! ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत…’ पोलिस मित्राच्या बायकोवर बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये ‘सद् रक्षणाय, खल निग्रहणाय’ या पोलीस दलाच्या घोष वाक्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका पोलिसाने सहकारी पोलीस मित्राच्या बायकोवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पोलीसाविरुद्ध पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण
काही दिवसांपूर्वी शहर पोलीस दलातील एका पोलिसाला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्याला उपचारांसाठी पोलीस मुख्यालयातील कोरोना उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. त्याच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा पोलीस सहकारी मित्राने याचा फायदा घेतला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई रवी मल्लिकार्जुन भालेकर हा २३ मेच्या मध्यरात्री १२ वाजता सहकारी मित्राच्या घरी गेला आणि त्याने मित्राच्या बायकोवर बलात्कार केला.

यावेळी त्याने सहकारी पोलीस मित्राच्या बायकोला माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत हा लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे सोलापूर शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला शहर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे व त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment