वॉशिंग्टन । अमेरिकेच्या अलाबामा येथील एका आरोपीच्या घरी पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्यांना धक्काच बसला. या आरोपीच्या घरातून महिलांचे एकूण 400 अंडरगारमेंट्स सापडले. पोलिस आता शोध घेत आहेत की इतक्या अंडरगारमेंट्स त्याच्याकडे कोठून आल्या.
डेली मेलच्यारिपोर्टनुसार बलात्कार आणि चोरीचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिस 27 वर्षीय जॉन थॉमसला अटक करण्यासाठी पोलिस दाखल झाले होते. जॉन थॉमसवर बलात्काराचा प्रयत्न, चोरी, गंभीर गुन्हेगारी, पाळत ठेवणे, क्रेडिट कार्ड फसवणूक यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतकेच नाही तर पोलिसांच्या एका महिलेची काही पर्सनल छायाचित्रेही सापडली आहेत जी या आरोपीची सहकारी असल्याचे सांगितले जाते. पोलिस आता तपास करीत आहेत की, आरोपीने महिलांचे अंडरगारमेंट्स चोरले की विकत घेतले? अधिकाऱ्यांनी सांगितले की, थॉमसवर 2019 मध्येही महिलांचे अंडरगारमेंट्स चोरल्याचा आरोप झाला होता.
थॉमस हा एक चाणाक्ष गुन्हेगार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. जुलैच्या सुरुवातीला त्याने दरोडा आणि बलात्काराच्या उद्देशाने एका महिलेच्या घरात प्रवेश केला होता. मात्र, त्या महिलेने त्याला पकडले आणि दोघांमध्येही जोरदार भांडण झाले. तथापि, जॉन थॉमस पळून गेला. यानंतर पीडितेने पोलिसांना बोलावून संपूर्ण घटना सांगितली.
बिलाद्वारे आरोपीकडे पोहोचले पोलिस
पोलिसांना घटनास्थळावरून एक बिल सापडले, त्यावर आरोपीचे नाव लिहिलेले होते. अशा प्रकारे ते त्याच्याकडे पोहोचले. जॉन थॉमसला पोलिसांनी 10 जुलै रोजी अटक केली होती. चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याचवेळी महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे आणि तिने थॉमसवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.