लातूर प्रतिनिधी | एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना वंचित बहुजन आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्ह्णून जाहीर करा अशी मागणी महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली. लातूर येथे संपन्न झालेल्या बहुजन आघाडीच्या सत्ता संपासदन सभेत ते बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले की, आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासाहेब मुख्यमंत्री तर, ओबीसींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. बहुजन आणि वंचित समाज असाच ठाम पणे प्रकाश आंबेडकर यांच्या मागे उभा राहीला तर वंचित आघाडीचे आमदार आणि आणि खासदार मोठयाप्रमाणात निवडून येतील आणि प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, यावेळी प्रकाश आंबेडकर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. सध्या देशाचा पंतप्रधान हा हुकुमशाही चेहरा आहे. देशाला सहजीवन जगणारा, सहपद्धतीत मान्य करणारा चेहरा हवा आहे. त्यासाठीच आम्ही राजकीय भूमिका घेत आहोत. मात्र त्यांनी हिंगोलीचा वंचित आघाडीचा उमेदवार कोण? हे लवकरच सांगू व आघाडीचा निर्णय हा आरएसएसला संविधानिक चौकटीत आणण्याच्या आराखड्यावरच असल्याचे ते म्हणाले. यावेळी एमआयएमचे युसूफ पुंजानी, किशन चव्हाण, फेरोजलाला, जाधव, वसीम देशमुख, रवींद्र वाढे, ज्योतीपाल रणवीर, अॅड.रवी शिंदे आदींची उपस्थिती होती.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
साताऱ्याच्या पुरोगामी गादीवर प्रतिगामी बसलेत, आबेंडकरांचा उदयनराजेंवर घरातघुसून हल्लाबोल
प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये – शरद पवार
राज ठाकरे आघाडीत राहतील, छगन भुजबळ यांचे संकेत
प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा
व्हॅलेंटाइन डे सप्ताहाची आज पासून सुरवात, जाणुन घ्या प्रत्येक डे विषयी