राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी २० हजार कोटी द्या; अशोक चव्हाणांची नितिन गडकरिंना मागणी

नांदेड | राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी येत आहेत, काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी व त्यासोबतच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने होण्यासाठी २० हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने राज्यातील राष्ट्रीय महामार्गास द्यावा अशी … Read more

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते मैदानात; राज्यपालांची घेतली भेट

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्यापही राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी कुठलीही निर्णय घेतला नाही. जवळपास दीड महिना उलटून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद नियुक्तीचा राज्यपाल निर्णय घेत नसल्यानं शेवटी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आज आक्रमक … Read more

न्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई | कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. सायंकाळी मुंबईतील राजभवन येथे निवडक लोकांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पदाची शपथ दिली. राज्याचे मुख्य सचिव अजेय मेहता यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखविली. … Read more

जवाब दो! उत्तरप्रदेशातील साधूंच्या हत्येनंतर आता काँग्रेसचे भाजपाला जळजळीत १० सवाल

मुंबई । भारतीय जनता पक्ष बुलंदशहरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांडाबाबत ‘कानठळ्या बसवणारे मौन’ धारण करून बसला आहे. यातून त्यांचा दुतोंडीपणा आणि कोरोनासारख्या संकटकाळातही राजकारण करण्याची निंदनीय प्रवृत्ती चव्हाट्यावर आल्याची जळजळीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली आहे. पालघरच्या मॉब लिंचिंगच्या दुर्दैवी घटनेमध्ये २ साधूंसह तिघांची हत्या झाली होती. या … Read more

फडणवीस-राज्यपाल भेट; म्हणाले राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य परिस्थिती

मुंबई । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकावर टीका करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारीची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिलं आहे. यावेळी रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आपल्या वाहिनीवर सोनिया गांधींवर आक्षेपार्ह्य विधान केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होत. ही घटना म्हणजे मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण … Read more

यूपीत साधूंच्या हत्येनंतर उद्धव ठाकरेंनी केला योगी आदित्यनाथांना फोन; म्हणाले..

मुंबई । उत्तर प्रदेशामधील बुलंदशहर येथे दोन साधूंच्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर संपर्क साधत चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी साधूंच्या अमानुष हत्येवरुन चिंता व्यक्त करताना आम्ही तुमच्यासोबत असल्याचं सांगितलं आहे. सोबतच आमच्याप्रमाणे तुम्हीही कडक कायदेशीर कारवाई तसंच दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. … Read more

उत्तर प्रदेशातील साधुंच्या हत्येनंतर राजकीय प्रतिक्रियांना सुरुवात; कोण, काय म्हणाले?

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये दोन साधुंची हत्या प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेचं राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. प्रियांका गांधी यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या कायदे-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. … Read more

पालघरप्रमाणे यूपीतील साधूंच्या हत्येचं राजकारण करू नका! संजय राऊतांचा भाजपला टोला

मुंबई । उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या झाल्याचं वृत्त आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष हल्ला केला आहे. उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येचं पालघरप्रमाणे राजकारण करू नका. देश कोरोनाशी लढत आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करतीलच, असा उपरोधिक टोला राऊत यांनी ट्विटवरून भाजपला लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी लिहलं आहे, ”उत्तर प्रदेशातील … Read more

मोदीजी पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत- शिवसेना

मुंबई । मोदी यांनी पवारांना आपले गुरू म्हणून घोषित केलेच आहे व पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत हे दिसून आले आहे. सत्तेवर असणे वेगळे व राज्य चालविण्याचा अनुभव असणे वेगळे. त्यामुळे पवारांचा अनुभव याक्षणी महत्त्वाचा असून त्यांनी महाराष्ट्राबरोबरच इतर सर्वच राज्यांना केंद्राने मदत करावी असे सुचवले आहे. कोरोनामुळे वाढलेला खर्च आणि लॉकडाउनमुळे … Read more

लॉकडाऊन हळूहळू शिथिल झालंच पाहिजे – सुप्रिया सुळे

मुंबई । कॅफेमध्ये जाण्यासाठी किंवा मौजमजेसाठी नव्हे तर देश आणि राज्याला उभं करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी लॉकडाऊन शिथिल केलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधताना व्यक्त केलं. यावेळी राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य करतानाच नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणायची आहे. त्यामुळे अनलॉकिंग हळूहळू … Read more