५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका

भाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या समस्या सोडवायलाही येत जा असा खोचक संदेश राज ठाकरेंनी दिला.

‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ’ – शरद पवारांची अवस्था शोले चित्रपटातल्या जेलरसारखी; मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका

एकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ अशी झाली असून त्यांच्यासोबत आता कुणीच नाही असंही फडणवीस पुढे म्हणाले.

मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो – नितीन गडकरी

एवढी वर्ष काँग्रेसला सत्ता दिली असली तरी देशातील जनता मात्र गरीबच राहिली. काँग्रेसने आजपर्यंत देशाचा कोणताही विकास केला नाही यावर चिंतन करण्याची गरज आहे असं म्हणत मी फोकनाड नेता नसून जे बोलतो ते करून दाखवितो असं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी धामणगाव रेल्वे येथील जाहीर सभेत बोलतांना व्यक्त केलं.

मैदानात पैलवान नाही म्हणता, मग मोदींना दिल्लीवरून कशाला बोलावता ; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

आम्ही तुम्हाला मैदानात दिसत नाही कारण आम्ही तुमच्याशी नाही तर पैलवानांशी कुस्ती खेळतो असा पलटवारदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. अमित शहा हे नाव ५ वर्षांपूर्वी कुणी ऐकलं नाही आणि कुणी त्यांना पाहिलंही नव्हतं.

पवारांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहेच – दिलीप सोपल

“आजही मला शरद पवार यांच्याविषयी आदर असून ते माझे थोरले बंधू आहेत, त्यांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहे

येरवडयाची हवा खाऊन या, कसं वाटतंय बघा – ईडी प्रकरणावरून सदाभाऊ खोतांचा शरद पवारांना टोला

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारसभेत खोत बोलत होते. मंगळवेढा येथे बोलत असताना त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्यावर टीकास्त्र सोडले.

फसणवीस सरकारला हद्दपार करा – बाळासाहेब थोरात

सध्याची निवडणूक ही राज्यातील उमेदवारांची असून मोदींच्या नावावर मतं मागण्याचं काय कारण असा सवाल खर्गे यांनी विचारला. राज्यातील सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांचा पीक विमा, तरुणाईचा रोजगार प्रश्न याबाबत सरकार बोलणं टाळत असून घोषणांच्या जाहिरातबाजीत वास्तवाकडे दुर्लक्ष करण्याचं काम सरकार करत असल्याची टीकाही खर्गे यांनी केली.

मोदींची भक्ती करणाऱ्या माध्यमांतून महाराष्ट्राचं वास्तव कधी दाखवलं जाणार? – राहुल गांधी

जीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत असल्याचं राहुल पुढे म्हणाले.

पंकजा मुंडेंच्या सभेतील गोंधळाचं भाजप कनेक्शन?

पिंपरी चिंचवड प्रतिनिधि | भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे रविवारी पुणे दौर्‍यावर होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड येथील प्रचार सभेत गोंधळ झाला. पंकजा मुंडेंचे भाषण सुरु असताना नागरीकांमधून काही जणांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड परिसरात मराठवाड्यातून मोठा वर्ग आला अाहे. त्यांनी भाजपलाच मतं द्यावीत यासाठी जगताप यांनी … Read more

२७ पैशांची भिक? मतदानापूर्वी हा मेसेज होतोय बेक्कार व्हायरल 

टीम हॅलो महाराष्ट्र | आगामी विधानसभेसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूपच व्हायरल होत आहे. त्यात लोकांना आपले मत न विकण्याचा महत्त्वाचा संदेश दिला जात आहे. यात एका भिकाऱ्याचे उदाहरण दिले गेले आहे. त्यात तुम्ही भिकाऱ्याला २७ पैशांची भीक देतात का असा प्रश्न उपस्थित … Read more