दादा गटाचे मंत्री पवारांच्या भेटीला कशासाठी? प्रफुल पटेल यांनी सांगितली आतली बातमी

Sharad Pawar Praful Patel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडखोरी नंतर आज प्रथमच त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरवर गेले. अजित पवार यांच्या गटाने अचानक शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चाना उधाण आलं. तब्बल अर्धा तास मंत्र्यांनी पवारांशी चर्चा केली. परंतु अचानक शरद पवार यांची भेट घेण्यामागे नेमकं काय कारण होत? याबाबत पक्षाचे उपाध्यक्ष प्रफुल पटेल यांनी माहिती दिली आहे.

शरद पवार यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, आमचे दैवत शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही वायबी चव्हाण सेंटरवर आलो होतो. आमच्या सर्वांच्या मनात त्यांच्यासाठी आदर तर आहेच परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहण्यासाठी साहेबानी योग्य विचार करावा आणि येत्या काळात आम्हाला सर्वाना मार्गदर्शनही करावे अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. शरद पवारांनी आमच्या सर्वांचे म्हणणे शांतपणाने ऐकून घेतलं मात्र आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही असं पटेल यांनी म्हंटल.

आता आम्ही परत मागे जाणार आहोत. उद्यापासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उद्यापासून आपापल्या खात्याची जबाबदारी विधान सभेत पार पाडतील असेही प्रफुल पाटील यांनी सांगितलं. यावेळी अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे इत्यादी नेतेमंडळी उपस्थित होते.