हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली असून याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे? असं ट्विट करत प्रकाश आंबेडकर यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आंबेडकर यांची शंका खरी ठरून खरच एकनाथ शिंदे भाजप प्रवेश करतील कि आपला स्वतंत्र गट स्थापन करून भाजपला पाठिंबा देतात का हे पाहावं लागेल.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 23, 2022
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्याजवळ ३७ पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला आहे. तसेच आज ते राज्यपालांची भेट घेऊन आपल्या गटाचा भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील २ दिवस खूप महत्वाचे आहेत.