सोलापूर प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यात काल हॉटेल मध्ये भेट झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दलसत्य समोर आले नसले तरी प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत या संदर्भात व्यक्त केले आहे.
कॉंग्रेस हा गाढव पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर असे तो करतो. निवडणुकीच्या काळात भेटीगाठी होणे हि साहजिक गोष्ट आहे. त्यामुळे या भेटीचे त्यांनी राजकारण करू नये असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे.
सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरातील एका हॉटेलमध्ये माजी केंद्री गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटायला गेले होते. त्यावेळी त्याच हॉटेल मध्ये प्रकाश आंबेडकर नाष्टाकरत असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांना समजले. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी आपला मोर्चा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे वळवला. त्याठिकाणी त्या दोघांमध्ये काहीतरी चर्चा देखील झाली. मात्र या चर्चचा तपशील उघड झाला नाही. मात्र प्रकश आंबेडकरांनी या भेटीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यात तिहेरी लढत होत आहे. तर १८ एप्रिल रोजी या ठिकाणी मतदान पार पडणार आहे.