हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार असल्याचे म्हंटले जात आहे. अर्थात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही आपण युतीबाबत सहमत असल्याचे म्हंटले आहे. मात्र, आता त्यांनी युतीबाबत एक महत्वाचे विधान केले असून त्यांनी उद्धव ठाकरेंना एक अट घातली आहे. “शिवसेनेसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही हार घालायला तयार आहे. पण त्यांना घेऊन तुम्ही या, अशी अट आंबेडकरांनी ठाकरेंना घातली आहे.
नाशिक येथे आज प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युतीबाबत अनेक महत्वाची विधानही केली. ते म्हणाले की, शिवसेनेवर आमचं लाईन मारण्याचं काम सुरु, व्हॅलेंटाईन डे पर्यंत काहीही होवू शकते. हे आताच सांगता येणार नाही. अजून आमची शिवसेनासोबत बोलणी सुरू आहे. त्यामुळे काही शब्द देता येणार नाही. आमची फक्त शिवसेनेसोबत एकत्र येण्याची बोलणी सुरू आहे, उद्धव ठाकरे यांचे म्हणणं आहे की, आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील सोबत घेऊ.
आम्ही उद्धव ठाकरे यांना म्हंटले आहे की, तुम्ही त्यांना घेऊन या. आम्ही हार घालू. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या सोबत बोलणं सुरू आहे. झाल्यावर बघू सध्या तरी शिवसेना आणि वंचित यांचे अजून नातं जमलेले नाही, असेही शेवटी आंबेडकरांनी म्हंटले.