वंचित आणि एमआयएमच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात आज हैदराबाद येथे (२६ ऑगस्ट) रोजी बैठक होणार आहे .

लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मते मिळवल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम आघाडी विधानसभा निवडणूक लढवत आहे. दलित व मुस्लिम मतांच्या बेरजेवर काही विधानसभा मतदारसंघाचे समीकरण अवलंबून आहे.दरम्यान ‘एमआयएम’ने वंचित बहुजन आघाडीकडे ८० जागांची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीने ‘एमआयएम’सोबत चर्चा करण्यासाठी एक समिती तयार केली आहे.

सध्या औरंगाबाद मध्य विधानसभा जागेसह अन्य काही जागांवर ‘वंचित’ने दावा केला आहे. मात्र, ‘एमआयएम’ या जागा सोडण्यास तयार नाही. यामुळे या आघाडीत मतभेद निर्माण होऊ शकतात .

Leave a Comment