फडणवीसांनी खऱ्या पैलवानासारखा मैदानात येऊन लढावे; प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. फडणवीस यांनी नुरा कुस्ती खेळू नये. खऱ्या पैलवानासारखा मैदानात येऊन फडणवीस यांनी लढावे असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. ते अहमदनगर येथे बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, विधानसभा अध्यक्षांना पेन ड्राईव्ह देणे म्हणजे नुरा कुस्तीचा भाग आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 125 तासांचे व्हिडीओ जनतेसमोर आणून ते मैदानी पैलवान आहेत की नुरा कुस्तीतील पैलवान आहेत, हे दाखवून द्यावं, खऱ्या पैलवानासारखा मैदानात येऊन फडणवीस यांनी लढावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अकोला येथे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीसांचे राजकारण म्हणजे गांडूचे राजकारण आहे अशी जळजळीत टीका केली होती. सभागृहात पेनड्राईव्ह दाखवणे हे शूरपणाचं नाही, तर गांडूपणाच्या राजकारणाचं लक्षण असल्याची घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. फडणवीस यांना मी फार शूर आणि लढाऊ राजकारणी समजत होतो. ते तलवार म्यानातून काढूत लढत बसतील. मात्र, सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवणे हे शूरपणा नाही असे त्यांनी म्हंटल होत.