मोदीजी, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? आंबेडकरांचा बोचरा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना मोदी म्हणाले होते की लसीची एक मात्रा वाया गेली, तर कुणा तरी व्यक्तीला या रोगापासून आवश्यक असलेल्या संरक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे लसी वाया जाण्यास प्रतिबंध करण्याची आवश्यकता आहे, असेही मोदी यांनी म्हटले होते. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली आहे.

जगभरात लस वाटण्याऐवजी तुम्ही पहिला भारतीयांना लस का नाही दिली ? ज्या लोकांचा कोरोनाने तडफडून मृत्यू झाला त्याची जबाबदारी मोदींची आणि केंद्र सरकारची नाही का ? असे सवाल प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे उपस्थित केले आहेत.

मोदीजी तुम्हाला खूप उशीराने शहाणपण सुचलं आहे. लस वाया जाण म्हणजे एखाद्याचा जीव जाणं हे बरोबर आहे. जेव्हा सीरम आणि भारत बायोटेक लस बनवत होते तेव्हा तुम्ही त्याची नोंदणी का नाही केलीत? २१ जानेवारी पर्यंत का थांबलात? जेव्हा देशात लस तयार केली जात होती तेव्हा तुम्हा ती जगभरात वाटत होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment