भारतात येडा पंतप्रधान बसलाय – प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांचा येडा पंतप्रधान असा उल्लेख करत टीका केली आहे. जालना येथे बलुतेदार-आलुतेदार निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

सध्या आरएसएसवाले एक टीआरपी खूप वापरतात तो म्हणजे मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेऊन टाळी दिल्याचा. पण ट्रम्पने मोदीला दिलेल्या एका टाळीची किंमत भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोजावी लागणार असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय. चीन आणि अमेरिकेत व्यापारी युद्ध सुरु असून चीन आता अमेरिकेचा कापूस घेणार नसल्याचं पक्क आहे. अशात अमेरिका तो कापूस भारताला देइल आणि भारतातील कापूस उत्पासकांचे नुकसान होईल असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मोदींना लोकप्रियतेची चटक आहे. अमेरिकेसारखे देश याचा फायदा घेऊन त्यांचा व्यापार आपल्या देशात वाढवत आहेत. यासर्वाचा फटका इथल्या शेतकर्‍यांना बसणार आहे असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
[youtube https://www.youtube.com/watch?v=SjcKU-JeGQ8&w=560&h=315]