हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्यांकडून शिवसेना पक्षातील खासदार बोलले जात आहे. यावरून आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आणखी एक नवा गौप्यस्फोट केला. “पंतप्रधान मोदींच्याच कृपेमुळेच शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. सेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आम्ही जाहीर करू, असा गौप्यस्फोट लाड यांनी केला आहे.
प्रसाद लाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेचे अजूनही वीस ते पंचवीस आमदार नाराज आहेत. ते आमच्यासोबत येण्यास तयार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणाले की, तळमळतंय, जळमळतंय. मात्र, आता त्यांनाच आपल्या पक्षातील खासदारांची तळमळ, जळजळ दूर करता आली नाही. मात्र, त्याचं चूर्ण आमच्याकडे आहे आणि आम्ही ते योग्यवेळी देऊ.
मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे. त्यांच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो. बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे आणि अजना संदर्भात जी भूमिका जाहीर केली होती. शिवसेनेची ती भूमिका आता बदलली आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुद्द जाहीर करणार आहेत का?, असा सवाल प्रसाद लाड यांनी केला.