हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्यावतीने छापा टाकण्यात आला असून त्यामध्ये सरनाईक यांची तब्बल 11.36 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आहे. एनएसीएल घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईबाबत आपण न्यायालयात जाणार आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तीस दिवसांच्या आत न्यालयात अपीलही करणार असल्याची प्रतिक्रिया सरनाईक यांनी दिली.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्या ठाणे येथील मालमत्तेवर ईडीच्यावतीने आज छापा टाकण्यात आला या छापेमारीनंतर प्रताप सरनाईक यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात माझ्या राहत्या घरावर आणि जमिनीवर कारवाई ईडीने मला दिली. या विरुद्ध मी न्यायालयात दाद मागणार आहे.
या एनएससीएल म्हणजे काय? याचा अर्थ काय ते काय असते त्याचा आता मी तपास करणार आहे. तसेच भविष्यात सुद्धा ईडीच्यावतीने मला काही मागणी केली. प्रश्न विचारले तर त्यांना मी नक्कीच सहकार्य करणार आहे, अशी प्रतिक्रिया सरनाईक यांनी दिली.